कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2022 | mahaurja.com pm kusum yojana

"महाकृषि ऊर्जा अभियान"

अंतर्गत राज्यातील कृषिपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याची प्रधानमंत्री कुसुम-ब योजना..... योजना 90 ते 95% अनुदानाची... पर्यावरणपूरक हरित क्रांतीची !

सध्या राज्यात वीज संकट (Electricity Crisis) उभं राहिलं असल्याने अनेक शेतकऱ्यांची पिकं पाण्याअभावी जळून जात आहे. तुमची या कटकटीतून कायमची सुटका करुन घेण्यासाठी आम्ही एका योजनेची माहिती घेऊन आलो आहोत. केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली आहे. त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे. 

बियाणे, खते, इंजिनचा खर्च करूनही कधी निसर्गसाथ देत नाही. निसर्गाने साथ दिली, तर बाजारात पिकाला भाव मिळत नाही. याची दखल घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री कुसुम योजना 2022 सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना सौरऊर्जेवर करून त्यांच्या खर्चात कपात करणे तसेच त्यांना पाहिजे तेव्हा वीज उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.


शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर उर्जेवर चालणारे सौर पंप उपलब्ध करून देण्याच्या मुख्य उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल सिंचन पंपांचे सौर ऊर्जा पंपांमध्ये रूपांतर करणार आहे. देशातील शेतकरी जे डिझेल किंवा पेट्रोलच्या सहाय्याने कृषीपंप चालवतात, ते पंप आता या कुसुम योजना 2022 अंतर्गत सौरऊर्जेने चालवले जातील. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात डिझेल आणि पेट्रोलवर चालणारे देशातील 1.75 लाख पंप सौर पॅनेलच्या मदतीने चालवले जातील. तर चला आपण ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज कसा करावा, याची माहिती घेऊयात.

काय आहे प्रधानमंत्री कुसुम योजना 2022चा उद्देश?

तुम्हाला माहिती आहेच की भारतात अनेक राज्ये अशी आहेत की जिथे अनेक जिल्ह्यांत कायमचा दुष्काळ असतो. या दुष्काळी भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यल्प पावसामुळे नेहमीच नुकसान सहन करावे लागते. ही गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारने पंतप्रधान कुसुम योजना 2022 सुरू केली आहे. या योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून देणे, हा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलर पॅनलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्यायोगे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध होऊन त्यांची पिके पाण्याअभावी जळणार नाहीत. चोवीसतास व मोफत वीज मिळाल्याने शेतकरी चांगली पिके घेऊ शकतील.

🔴 योजनेची वैशिष्टये :

• पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्हयात आस्थापना, शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार. 

• शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP 5HP. 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौर पंप उपलब्ध होणार.

• सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभाथ्र्यांना 5% लाभार्थी हिस्सा.

• स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय.

योजनेचे नावमहाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजना
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र शासन व केंद्र शासन
लाभार्थीराज्यातील शेतकरी
उद्दिष्टशेतकऱ्यांना सोलर पंप पुरवणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

🔴 लाभार्थी निवडीचे ठळक निकष :

• शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी/नाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.

• पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी. 

•अटल सौर कृषी पंप योजना टप्पा 1 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार 

🔴 प्रधानमंत्री कुसुम योजने अंतर्गत अनुदान :- 

• 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC. 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DC वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय

• यात २.५ एकर क्षेत्र घारण करणाऱ्या शेतकऱ्यास स ३ HP, ५ एकर क्षेत्र धारण करणा या दोतक यास ५ HP व त्यापेक्षा जास्त क्षेत्र घारण करणाऱ्या शेतकऱ्यास ७.५ HP DC पंप आस्थापित करण्याचे नियोजन केले आहे.

• सौर कृषीपपाची किंमत रु. १.५६ लाख (3 HP), रु. २.२२५ लाख (५ HP), रु. ३.४३५ लाख (७.५ HP) एवढी किंमत असणार आहे.

• पंपाच्या किंमतीच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषीपंपाच्या किंमतीच्या १०% व अनुसूचीत जाती व जमातीच्या लाभार्थ्याकडून ५% या दराने लाभार्थी हिस्सा घेतला जातो.

• या योजनेंतर्गत केंद्र शासनाचे ३० टक्के वित्तीय सहाय्य व राज्य शासनाचे ६०/६५ टक्के अनुदान व लाभार्थ्यांचे १०/५ टक्के अनुदान लागणार.


🔴 महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम आवश्यक कागदपत्रे

१) ७/१२ उतारा (विहिर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.

२) आधारकार्ड प्रत.

३) रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.

४) पासपोर्ट आकाराचा छायाचित्र.

५) शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.


मी महाराष्ट्रात कुसुम योजनेसाठी अर्ज कसा करू शकतो?

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी खालील संकेतस्थळावर भेट दयावी.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) पोर्टलला भेट दिल्या नंतर उजव्या महाकृषि ऊर्जा अभियान या बॉक्स मध्ये “महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी” लिंक वर क्लिक करा किंवा खालील थेट लिंक वर क्लिक करा.

Https://Kusum.Mahaurja.Com/Solar/Beneficiary/Register/Kusum-Yojana-Component-B येथे क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

Post a Comment

Previous Post Next Post