डिजल पंप सब्सिडी योजना महाराष्ट्र 2022 : Diesel Pump Subsidy
Diesel Pump Subsidy Yojana | Diesel Pump Anudan Yojana | Diesel Pump Subsidy Yojana Maharashtra | Diesel Pump Anudan Yojana Maharashtra | डिजल पंप सब्सिडी योजना महाराष्ट्र | डिजल पंप अनुदान योजना महाराष्ट्र | Diesel Pump Subsidy Scheme
केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची सुरुवात करत असते त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्याच्या उज्वल भविष्यासाठी तसेच त्यांना शेती व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्नात असते त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव डिजल पंप सब्सिडी योजना आहे.या योजनेअंतर्गत शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना डिजल पंप खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते.
Diesel Pump Subsidy Yojana
राज्यातील बहुतांश शेतकरी शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी बोर, विहीर, शेततळे यांचा वापर करतात. त्यासाठी त्यांना बोर, विहीर, शेततळे यांमधून पाण्याचा उपसा करावा लागतो व त्यासाठी शेतकरी विद्युत पंपाचा वापर करतात परंतु विजेची अनियमितता तसेच लोडशेडींगमुळे शेतकऱ्यांना पाण्याचा उपसा करता येत नाही. दिवस लोड शेडींग करून रात्री वीज उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे पिकांना रात्री पाणी देण्यासाठी गेल्यावर रानटी जनावर त्यांच्यावर हल्ला करतात तसेच जीव जंतू जसे साप व विंचू शेतकऱ्यांना दंश करतात त्यामुळे त्यांच्या समोर पिकांना पाणी देण्यासाठी मोठी समस्या निर्माण होते. परिणामी शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागते.
तसेच राज्यातील बहुतांश शेतकरी कर्जबाजारी असून दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात. तसेच डिजल पंपाची किंमत पाहता ते खुप महाग असतात ज्याची खरेदी करने सर्वच शेतकऱ्यांना शक्य नसते. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने सर्व शेतकऱ्यांना डिजल पंप खरेदी करण्यासाठी डिजल पंप सब्सिडी योजनेची सुरुवात करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.
विशेष सूचना: आम्ही डिजल पंप सब्सिडी योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी शेतकरी असतील जे डिजल पंप सब्सिडी योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण डिजल पंप सब्सिडी योजना काय आहे, Diesel Pump Subsidy Yojana उद्दिष्ट काय आहे, Diesel Pump Subsidy Scheme वैशिष्ट्य काय आहेत, Diesel Pump Subsidy फायदे काय आहेत, Diesel Pump Subsidy Yojana Maharashtra पात्रता काय आहे, Diesel Pump Subsidy Yojana आवश्यक कागदपत्रे काय आहेत, Diesel Pump Subsidy Yojana अर्ज करायची पद्धत, डिजल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.
योजनेचे नाव | डिजल पंप सब्सिडी योजना |
विभाग | कृषी विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
लाभ | डिजल पंप खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य |
उद्देश | शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
डिजल पंप सब्सिडी योजनेचा उद्देश्य
Diesel Pump Subsidy Yojana Purpose
- राज्यातील विजेची अनियमितता तसेच लोडशेडींग पहाता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांना विहिरीतून, शेत तळ्यातून पाण्याचा उपसा करने शक्य होत नाही अशा कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.त्यामुळे शेतकऱ्यांना अशा समस्यांपासून वाचवण्याच्या उद्देशाने डिजल पंप सब्सिडी योजनेची सुरुवात करण्यात आली. जेणेकरून शेतकरी डिजल पंपाचा वापर करून आपल्या पिकांसाठी पाण्याचा उपसा करू शकतील.
- राज्यातील शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे.
- राज्यातील शेतकऱ्याचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
- राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारणे.
- राज्यातील शेतकऱ्याचे भविष्य उज्वल बनविणे.
- शेतकऱ्यांना पाण्याचा उपसा करण्यासाठी विजेवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे
- राज्यात विजेवर असणारा भार कमी करणे
- डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करण्यासाठी कोणावर अवललंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच त्यांना कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
डिजल पंप सब्सिडी योजनेची वैशिष्ट्ये
Diesel Pump Subsidy Features
- महाराष्ट्र शासनाद्वारे डिझेल पंप योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी डिझेल पंप खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी डिझेल पंप योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी डिझेल पंप योजना महत्वाची ठरेल.
- डिजल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकरी लाभ घेऊ शकतील.
- या योजनेअंतर्गत अनुदान राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल ज्यामुळे या योजनेत पारदर्शकता बनून राहील.
- शेतकऱ्यांना आता विजेवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
- डिजल पंप सब्सिडी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरु शकते.
- डिझेल पंप योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदाराला अर्ज करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
- डिझेल पंप योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली असल्याकारणामुळे अर्जदार अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची सर्व स्थिती वेळोवेळी आपल्या मोबाईल च्या सहाय्याने जाणून घेऊ शकतो.
डिझेल पंप अनुदान योजनेचे लाभार्थी
Disel Pump Anudan Yojana Beneficiary
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी डिझेल पंप अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
डिजल पंप सब्सिडी योजनेचा लाभ
Diesel Pump Subsidy Yojana Benefits
- डिजल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत डिजल पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते.
- डिजल पंप सब्सिडी योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकऱ्यांना लोडशेडिंग तसेच विजेच्या अनियमितते सारख्या समस्यांपासून मुक्तता मिळेल.
- डिजल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत लोडशेडिंग मुळे पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल व त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल
- ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विजेची सुविधा नाही अशा शेतकऱ्यांना Diesel Pump Subsidy Yojana फायद्याची ठरणार आहे.
- राज्यातील शेकऱ्यांचे भविष्य उज्वल बनेल.
- लोडशेडिंग असल्यावर सुद्धा शेतकरी डिजल पंपाच्या सहाय्याने आपल्या पिकांसाठी पाण्याचा उपसा करू शकतील.
- डिझेल पंप अनुदान योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल.
- राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- या योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- डिझेल पंप अनुदान योजनेच्या सहाय्याने शेतकरी डिझेल पंप खरेदी करू शकतील त्यामुळे शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच राज्यातील इतर नागरिक शेती करण्यासाठी प्रेरित होइल.
- विजेच्या वाढत्या दर पासून शेतकऱ्याची सुटका होईल.
डिजल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान
Diesel Pump Subsidy
डिजल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतातील पिकांसाठी विहीर,शेततळे तसेच बोअरवेल यांमधून पाण्याचा उपसा करण्यासाठी डिजेल पंप खरेदीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येते.
डिजल पंप सब्सिडी योजनेसाठी आवश्यक पात्रता
Diesel Pump Subsidy Yojana Eligibility
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
डिजल पंप सब्सिडी योजनेच्या अटी
Diesel Pump Anudan Yojana Terms & Condition
- डिजल पंप सब्सिडी योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच घेता येईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना डिजल पंप सब्सिडी योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- डिजल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत डिजल पंप घेण्यासाठी शासनाकडून 50 टक्के अनुदान देण्यात येते. परंतु उर्वरित 50 टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतः कडील जमा करने आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांकडे शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेल, विहीर किंवा शेततळे असणे अनिवार्य आहे.
- एका शेतकऱ्याला फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- शेतकऱ्याने या आधी जर शासनाच्या कोणत्या पंप योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांच्या शेत जमिनीत सह हिस्सेदार असल्यास अर्ज सोबत त्याचे ना हरकत प्रमाण पत्र जोडणे आवश्यक आहे.
डिजल पंप सब्सिडी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Diesel Pump Subsidy Yojana Document List
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
- 7/12, 8अ
- स्वयं घोषणापत्र
- डिजल पंपाचे कोटेशन तसेच केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी दाखला
- शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचा असल्यास प्रमाणपत्र
डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
Diesel Pump Subsidy Scheme
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा शेतकरी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे न भरल्यास
- अर्जात चुकीची माहिती भरल्यास
- अर्जदाराने या आधी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत डिझेल पंपाचा लाभ मिळवला आल्यास या योजनेअंतर्गत केलेला अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात विहीर, शेततळे किंवा बोअरवेल नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार सर्व अटी आणि शर्तींची पूर्तता करत नसल्यास सदर अर्ज रद्द केला जाईल.
डिजल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
Diesel Pump Subsidy Yojana Apply Online
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर आधार कार्ड किंवा Username च्या सहाय्याने लॉगिन करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला अर्ज करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण मध्ये बाबी निवडा बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला या योजनेचा अर्ज दिसेल त्यात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला जतन करा या बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन (Net Banking / Dabit Card / UPI / Wallet) च्या माध्यमातून २३/- रुपये भरावे लागतील.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
डिजल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
Diesel Pump Anudan Yojana Registration
अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल.
कृषी विभागात जाऊन डिझेल पंप अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज त्याच कार्यालयात जमा करावा लागेल.
अशा प्रकारे तुमची डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Join |
Diesel Pump Subsidy Yojana Portal | Click Here |
Diesel Pump Anudan Yojana Helpline Number | ०२२-४९१५०८०० |