गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2022 : Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana | Shetkari Apghat Vima Yojana | Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra | Gopinath Munde Shetkari Apghat Vima Scheme | Gopinath Munde Vima Yojana | Gopinath Mumde Shetkari Vima Yojana | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना | Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Form | शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना
केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची सुरुवात करते असते.त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनस्तर सुधारण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी व उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्नात असते त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते.आज आम्ही महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना अपघात विमा सुरक्षा देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनांची माहिती देणार आहोत ज्या योजनेचे नाव गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आहे.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana
शेती व्यवसाय करताना अंगावर वीज पडणे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याची कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काही शेतकऱ्यांना या अपघातामुळे अपंगत्व येते परिणामी कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या अशा मृत्यूमुळे किंवा अपंगत्वामुळे कुटुंबावर आर्थिक परिस्थिती निर्माण होते त्यामुळे अशा शेतकरी कुटुंबाला आर्थिक लाभ मिळावा या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची सुरुवात केली गेली आहे.
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्रय रेषेखाली स्वतःचे जीवन जगात असल्यामुळे त्यांना स्वतःचा विमा उतरवणे शक्य होत नाही आर्थिक परिस्थिती कमजोर असल्या कारणामुळे ते विम्याचा हफ्ता भरण्यासाठी असमर्थ असतात व अशा वेळी एखाद्या शेतकऱ्याचा शेतात काम करताना एखाद्या कारणामुळे अपघात झाल्यास त्याला इलाज करण्यासाठी पैसे नसल्या कारणामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते व अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana सुरु करण्याचा खूप मोठा निर्णय घेतला.
या योजनेअंतर्गत शेतकरी व त्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य त्यामध्ये आई वडील, शेतकऱ्याची पती / पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण २ जणांना या योजनेचा लाभ घेता येईल.
विशेष सूचना: आम्ही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी व्यक्ती असतील जे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
योजनेचे नाव | गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | कृषी विभाग |
योजनेची सुरुवात | २००५ |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
उद्दिष्ट | शेतकऱ्यांना विमा प्रदान करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे उद्दिष्ट्य
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Purpose
- शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांचा अपघात होतो परिणामी त्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येते परिणामी त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते या सर्व गोष्टींचा विचार करून अशा कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. जेणेकरून कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.
- शेतकऱ्याला सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याच्या उद्देशाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याला स्वतःच्या उपचारासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याचे भविष्य उज्वल बनविणे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे वैशिष्ट्य
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2022 Features
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.
- राज्यातील शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याच्या निशुल्क उपचारासाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.
- या योजनेत आकारण्यात येणारी विम्याची रक्कम अत्यंत कमी आहे.
- या योजनेअंतर्गत आकारण्यात येणारी विम्याची रक्कम ३२.२३ रुपये आहे जी शासनामार्फत दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीत भरण्यात येते त्यामुळे शेतकऱ्याला विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही.
- गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून शेतकऱ्याला अर्ज करताना कोणत्याच अडचणींचा सामना करावा लागू नये.
- या योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य DBT च्या साहाय्याने लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केले जाते.
- महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वर्षे वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्याच्या कुटुंबातील विहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेले कोणताही १ सदस्य त्यामध्ये आई वडील,लाभार्थीचे पती / पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही १ व्यक्ती असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास व ते सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे लाभार्थी
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Beneficiary
राज्यातील शेतकरी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Benefits
- एखाद्या शेतकऱ्याचा शेतीची कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे २ डोळे अथवा २ अवयव निकामी झाल्यास रुपये २ लाख रक्कम नुकसान भरपाई देण्यात येते.
- शेतीची कामे करताना अपघात झाल्यास अपघातामुळे १ डोळा व १ अवयव निकामी झाल्यास रुपये १ लाख नुकसान भरपाई देण्यात येते.
- शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत विम्याचा हफ्ता भरण्याची आवश्यकता नाही कारण महाराष्ट्र शासन विम्याची रक्कम स्वतः भरते.
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी आत्मनिर्भर बनतील.
- शेतीची कामे करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकार कडून २ लाखांचे आर्थिक सहाय्य कुटुंबाला देण्यात येते त्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.
- शेतीची कामे करताना शेतकऱ्याला अपंगत्व आल्यास त्याला शासनाकडून १ लाखांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी आत्मनिर्भर बनतील.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी पात्रता
Gopinath Munde Yojana Eligibility
अर्जदार शेतकरी आणि त्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे मूळ निवासी असणे आवश्यक आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या अटी
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Terms & Conditions
- फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- फक्त शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदाराने शेतकऱ्याने शासनाच्या इतर कोणत्या अपघातग्रस्त योजनेचा लाभ घेतला असेल तर तो शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ७५ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत समाविष्ट अपघाती कारणे
Gopinath Munde Apghat Vima Yojana
खाली दिलेल्या वेगवेगळ्या कारणामुळे शेतकऱ्यांना अपंगत्व किंवा मृत्यू ओढवल्यास या योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंत आर्थिक मदत केली जाते तसेच अपघाताच्या स्वरूपानुसार विमा रक्कम मंजूर केली जाते.
- अंगावर वीज पडून मृत्यू होणे
- नैसर्गिक आपत्ती
- पूर
- सर्पदंश
- विंचू दंश
- वाहन अपघात
- रस्त्यावरील अपघात
- विजेचा शॉक लागून मृत्यू
- रेल्वे अपघात
- पाण्यात बुडून मृत्यू
- जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा
- खून
- उंचावरून पडून झालेला अपघात
- नक्षलवाद्यांकडून हत्या
- हिंस्त्र जनावरांनी चावल्यामुळे मृत्यू किंवा जखमी होणे.
- दंगल
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यास खालील कारणासाठी लाभ घेता येणार नाही
Gopinath Munde Scheme
- नैसर्गिक मृत्यू
- विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व
- आत्महत्येचा प्रयत्न
- आत्महत्या
- स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेणे
- गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
- अमली पदार्थाच्या सेवनामुळे झालेला अपघात
- भ्रमिष्टपणा
- बाळंतपणातील मृत्यू
- शरीरांतर्गत रक्तस्त्राव
- मोटार शर्यतीतील अपघात
- युद्ध
- सैन्यातील नोकरी जवळच्या लाभार्थ्यांकडून / वारसाकडून खून
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आवश्यक कागदपत्रे
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Documents
- दावा अर्ज
७/१२
अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक - बँकेचे नाव
- बचत खाते क्रमांक
- शाखा
- आय एफ एस सी कोड
- शिधापत्रिका
- एफ आय आर
- एखादा अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
- अकस्मात मृत्यूची खबर
- इंनक्वेस्ट पंचनामा
- वाहन चालविण्याचा वैध परवाना
- मृत्यू दाखला
- अपंगत्वाचा दाखला
- घोषणापत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- वयाचा दाखला (जन्माचा दाखल किंवा शाळा सोडल्याचा दाखल)
- अपघात घटनास्थळ पंचनामा
- पोष्ठ मार्टेम रिपोर्ट
- वारासदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
- कृषी अधिकारी पत्र
- औषधोपचाराचे कागदपत्र
- डिस्चार्ज कार्ड
शेतकरी विमा योजना अंतर्गत अपघाताच्या घटनेच्या स्वरूपानुसार पुराव्यादाखल सादर करावयाची कागदपत्रे
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana
अपघाताचे स्वरूप | आवश्यक कागदपत्रे |
रस्ता रेल्वे अपघात | इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना |
पाण्यामध्ये बुडून मृत्यू | इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतिपूर्ती बंधपत्र आवश्यक |
जंतुनाशके किंवा अन्य कारणामुळे विषबाधा | इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल) |
विजेचा धक्का अपघात | इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल |
वीज पडून मृत्यू | इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल |
खून | इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल), दोषारोप पत्र |
उंचावरून पडून झालेला अपघात | इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल पोलीस अंतिम अहवाल |
सर्पदंश / विंचूदंश | इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल वैद्यकीय उपचारापूर्वीच निधन झाल्याने पोस्ट मॉर्टेम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्याकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक. |
माक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या | इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल नक्षलवादी हत्येसंदर्भातील कार्यालयीन कागदपत्र |
जनावरांच्या चावण्यामुळे रेबीज होऊन मृत्यू | औषधोपचाराची कागदपत्रे |
जनावरांच्या हल्ल्यात / चावण्यामुळे जखमी होऊन मृत्यू | इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल |
जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणे | क्षतिपूर्ती बंधपत्र आवश्यक |
दंगल | इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल दंगलीबाबतची कार्यालयीन कागदपत्रे |
अन्य कोणतेही अपघात | इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल पोलीस अंतिम अहवाल |
अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे | १. अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे करणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी २. प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र / जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र. |
सूचना
वरील कागदपत्र मूळ किंवा राजपत्रित अधिकारी यांनी साक्षांकित केलेले अथवा स्वयंसाक्षांकीत असल्यास ग्राह्य धरण्यात येईल.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावा सादर करण्याचा कालावधी
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2021
अपघात झालेल्या शेतकऱ्याचा दावा अर्ज विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतर देखील 90 दिवसांपर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येतो.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Application Process
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयात कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेलं आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा
अशा प्रकारे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी दावा अर्ज करण्याची पद्धत
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Claim Process
एखाद्या शेतकऱ्याचा अपघात झाल्यानंतर सदर योजनेअंतर्गत दावा करण्यासाठी शेतकऱ्याला किंवा त्याच्या वारसाला नजीकच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अपघातानंतर 45 दिवसांच्या आत दावा अर्ज सादर करावा लागेल तसेच दावा अर्ज सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील.
अधिकाऱ्यांकडून सदर दाव्याची तपासणी करून लाभ दिला जाईल.
शासनाची अधिकृत वेबसाईट | Click Here |
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Form PDF | Click Here |
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Helpline | 1800-233-3533 |
Telegram Group | Join |