हिंदुस्तान पेट्रोलियमची फ्रेंचायजी कशी मिळवायची?

 

हिंदुस्तान पेट्रोलियमची फ्रेंचायजी कशी मिळवायची?

भारतातील रस्त्यावर सध्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांच्या जीवनशैलीच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होत आहे. परिणामी, वाहनं चैनीच्या तुलनेत अधिक  गरज बनले आहे. गेल्या काही दशकांच्या तुलनेत आपल्या देशाच्या प्रत्येक व्यक्तीच्या इंधन वापरावर याचा मोठा परिणाम झाला आहे. या सर्वांमुळे पेट्रोल पंपाच्या मागणीची वाढ होत आहे.

इंधन ही अशा गरजांपैकी एक आहे की त्याची किंमत कितीही जास्त किंवा कमी झाली तरी लोक ते विकत घेतात आणि याच कारणास्तव, पेट्रोल पंप सुरू करणे ही एक अतिशय फायदेशीर बिजनेस कल्पना आहे. विशेषत: जेव्हा ते शहराच्या वर्दळीच्या भागात किंवा महामार्गांजवळ असते, तेव्हा एकूण नफ्याचे प्रमाण सर्वाधिक असते. इंधनाची गरज भागवण्याबरोबरच, रस्त्याच्या कडेला आपत्कालीन सहाय्य, टेलिफोन बूथ सुविधा, प्रगत प्रथमोपचार आणि स्वच्छतागृहाची सुविधा यासारख्या इतर सुविधा पुरवू शकत असल्यास, तुमच्या पेट्रोल स्टेशनवर ग्राहक आपोआप आकर्षित होतील.

आकडेवारीनुसार, तेलाच्या वापराच्या नोंदींमध्ये भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जे आपल्या देशाला या उद्योगातील संधींसाठी अत्यंत भरीव आणि वाढणारी बाजारपेठ बनवते. ज्यांना स्वत:चा बॉस बनायचे आहे आणि पुरेसा स्रोत आणि भांडवलासह स्वत:चा बिजनेस सुरू करायचा विचार आहे, त्यांच्यासाठी हे एक फायदेशीर आणि स्थिर क्षेत्र बनू शकते. 

तुम्हाला माहिती आहे का? एचपीसीएलचा भारतातील पेट्रोलियम पाईपलाईनचा दुसरा सर्वांत मोठा वाटा असून विविध पेट्रोलियम उत्पादनांसह 19602 पेक्षा जास्त पेट्रोल स्टेशनचे नेटवर्क आहे.

पेट्रोल पंप डीलरशिपसाठी एचपीसीएलची निवड का करावी?

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना 1952 मध्ये झाली आणि गेल्या 70 वर्षापासून ते ग्राहकांना सेवा देत आहे.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची उपकंपनी असल्याने, त्याने भारतीय बाजारपेठेतील सुमारे 25% हिस्सा काबीज केला आहे. गॅस आणि पेट्रोलियम क्षेत्रात, एकूण मालमत्ता मूल्य 1,89,906 कोटी रुपये आहे, हे भारतातील सर्वांत मोठ्या पेट्रोल डीलरशिपपैकी एक आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियमला त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमुळे महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचे स्थान आहे. खाली एचपीसीएलविषयी लक्षात घेण्यासारख्या काही मुख्य गोष्टी दिल्या आहेत.

  • एचपीसीएल फॉर्च्युन 500 आणि फोर्ब्स 2000 कंपनीच्या यादीमध्ये आहे.
  • एचपीसीएलचे उद्दीष्ट प्रत्येक ग्राहकांच्या गरजेनुसार उपायांसह गॅस आणि पेट्रोलियम उद्योगात बदल घडवून आणणे हे आहे.
  • एचपीसीएलची भारतात एकूण 19602 रिटेल पेट्रोलियम आउटलेट्स आहेत.
  • त्यांच्या फ्रँचायजी बिजनेसमध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन फक्त अत्यंत हुशार आणि कुशल लोकांशीच संबंध ठेवते.

एचपीसीएल रिटेल आउटलेट उघडण्याचे पात्रता निकष

एचपी पेट्रोल पंप डीलरशिप घेण्यासाठी तुम्हाला सर्वांतआधी पेट्रोल पंप परवाना मिळवणे आवश्यक आहे. एचपीसीएल रिटेल आउटलेट्सच्या डीलर-मालकीच्या साईटसाठी, हे परवाना शुल्क जवळपास पेट्रोलसाठी ₹ 1.18 प्रति किलोलीटर आणि डिझेलसाठी ₹ 1.16 प्रति किलोलीटर आहे. 

पात्र होण्यासाठी तुम्हाला प्रथम काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहेत, ते खाली दिले आहेत

  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. जर एखादा अनिवासी भारतीय पेट्रोल पंपासाठी अर्ज करत असल्यास, अर्ज करण्यापूर्वी त्याने किमान सहा महिने भारतात वास्तव्य केलेले असावे. 
  • अर्जदारासाठी वयोमर्यादा : 21 ते 55 वर्षे आहे
  • जन्मतारखेच्या पुराव्यासाठी अर्जदाराने दहावीच्या मार्कशिटची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराला ग्रामीण भागात पेट्रोल पंप उघडायचा असेल तर तो दहावी पास असणे आवश्यक आहे, तर शहरी भागासाठी तो बारावी पास असणे आवश्यक आहे.
  • स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांना वयोमर्यादा व किमान पात्रतेच्या निकषासाठी सवलत देण्यात आली आहे.

एचपीसीएल पेट्रोल पंप रिटेल आउटलेट डीलरशिपसाठी किमान जागेची आवश्यकता

पेट्रोल पंपाचे आउटलेट स्थापित करण्यासाठी मुख्य गोष्टींपैकी एक म्हणजे जमीन आहे. ती तुमची स्वतःची किंवा दीर्घकालीन भाडेपट्टीवर घेवू शकता. मात्र, वापरात असलेल्या जमिनीच्या मालकी हक्काची पडताळणी करण्यासाठी विक्री करार असो वा भाडेपट्टा दस्तऐवज असो, त्यासाठीची कागदपत्रे सोबत असायला पाहिजे. पेट्रोल पंपाच्या जागेमुळे त्याच्या नफ्यावर थेट परिणाम होतो. पेट्रोल पंपाच्या शाॅपचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

  • नियमित रिटेल आउटलेट्स शहरी आणि निमशहरी भागात आहेत. 
  • ग्रामीण भागात असलेले ग्रामीण रिटेल आउटलेट्स.

तथापि, शहरात किरकोळ विक्री केंद्र सुरू करण्यासाठी किमान जागेची आवश्यकता सुमारे 800 चौरस मीटर असेल. तर राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल पंप डीलरशिप सुरू करण्यासाठी किमान 1200 चौरस मीटर जागेची आवश्यकता असेल. तसेच जमिनीवर पाणी व विजेसाठी पुरेशी तरतूद असायला पाहिजे

एचपीसीएल पेट्रोल पंप फ्रेंचायजी प्राप्त करण्यासाठी कागदपत्रे आवश्यक

  • पत्त्याचा पुरावा.
  • जन्मतारखेच्या पुराव्यासाठी, तुम्हाला एकतर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा हस्तांतरण प्रमाणपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त मंडळे/विद्यापीठांकडून पदवी/मार्कशिट.
  • जमीन मूल्यांकन प्रमाणपत्रे.
  • डीमॅट स्टेटमेंटची प्रत .
  • पासबुकची प्रत, खात्याचे स्टेटमेंट आणि ठेवीच्या पावत्या.
  • म्युच्युअल फंड प्रमाणपत्रांची प्रत असल्यास.

एचपी पेट्रोल पंप अर्ज व शुल्क

अर्जदार एचपीसीएल रिटेल आउटलेटसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज करू शकतो.

  • ऑफलाईन सबमिशनसाठी : अर्जदाराने दिलेल्या नमुन्यातील डीलरशिपसाठी प्रतिज्ञापत्रासह विहित अर्ज भरणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन सबमिशनसाठी : अर्ज करण्यासाठी अर्जदाराने वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी पर्यायावर क्लिक करा आणि अर्ज नोंदणीसाठी आवश्यक सर्व तपशील द्या आणि सबमिटवर क्लिक करा.
  • अर्जासोबत अर्जदाराने एचपीसीएलच्या बाजूने डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात नाममात्र शुल्क भरणे आवश्यक आहे.
  • ग्रामीण एचपीसीएल रिटेल आउटलेटसाठी, ₹ 1,100 अर्ज शुल्क भरावे लागेल आणि एससी/एसटी अर्जदारांसाठी हे शुल्क ₹ 150 आहे.
  • रेग्युलर एचपीसीएल रिटेल आउटलेटसाठी ₹ 11,000 अर्ज शुल्क भरावे लागेल आणि एससी/एसटी प्रवर्गासाठी शुल्क फक्त ₹ 1,500 आहे.

एचपीसीएल पेट्रोल पंप गुंतवणूक खर्च

एचपीसीएल पेट्रोल पंप आउटलेट उभारण्यासाठी जमिनीची किंमत, भूखंडाचा आकार आणि ग्राहकांच्या गरजा भागवण्यासाठी विकसित कराव्या लागणाऱ्या सुविधा या अनुषंगाने भांडवली गुंतवणूक आवश्यक आहे. गुंतवणुकीच्या गरजांचे दोन प्रकार आहेत. 

  • पहिला ब्रँड सिक्युरिटीच्या स्वरूपात आहे : एकदा अर्ज मंजूर झाल्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम फ्रँचायजी मिळवण्यासाठी ब्रँड सिक्युरिटीच्या स्वरूपात गुंतवणूक आवश्यक असते.
  • नियमित एचपीसीएल आउटलेटसाठी ₹ 1.25 लाखांची गुंतवणूक आवश्यक आहे.
  • ग्रामीण एचपीसीएल आउटलेटसाठी ती जवळपास ₹ 1.12 लाख आहे.
  • दुसरा खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी : बिजनेस चालवण्यासाठी, रोजचा परिचालन खर्च भागवण्यासाठी लागणारा निधी हा प्रत्येक आउटलेटपासून ते आउटलेटपर्यंत भिन्न असतो.
  • एचपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केल्याप्रमाणे हे फंड लिक्विड स्वरूपात किंवा शेअर्स, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, म्युच्युअल फंड आदी स्वरूपात असू शकतात.

एचपी पेट्रोल पंप डिलरशिप संपर्क क्रमांक आणि अन्य तपशील

  • कंपनीचे संपूर्ण नाव: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
  • उद्योग: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
  • स्थापना वर्ष : 1974
  • अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी : श्री. मुकेश कुमार सुराणा 
  • मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र, भारत
  • मूळ कंपनी: तेल आणि नैसर्गिक वायू कॉर्पोरेशन
  • एचपी डीलरशिप संपर्क क्रमांक : 1800 233 3555  

निष्कर्ष

पेट्रोल गरज बनली असून पेट्रोलियम बिजनेसला नेहमीच मोठी मागणी राहिली आहे आणि यापुढेही ती अशीच राहील. पेट्रोल पंप डीलरशिप फायदेशीर आहे. कारण, बिजनेस चालवण्यासाठी तुम्हाला रॉयल्टी फी किंवा कमिशन द्यावे लागत नाही आणि  कोणीही ग्राहकाच्या अनुभवाला अधिक आरामदायक आणि खास बनवण्यासाठी नेहमीच अतिरिक्त सेवा संकलित करू शकते. आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे ब्रँड नावाची प्रतिष्ठा, हिंदुस्तान पेट्रोलियम निःसंशयपणे बाजारातील अव्वल खेळाडूंपैकी एक मानला जातो. तर अशी डीलरशिप नेहमीच चांगला नफा कमवून देणारा बिजनेस ठरू शकते.  

ताजे अपडेट्स, न्यूज ब्लॉग्ज आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय (एमएसएमई), व्यवसाय टिप्स, आयकर, जीएसटी, सॅलरी आणि अकाउंटिंगशी संबंधित लेखांसाठी Khatabook ला फाॅलो करा.


वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: पेट्रोल पंप बिजनेस सुरू करायला किती गुंतवणूक आवश्यक आहे?

उत्तर:

भारतात पेट्रोल पंप बिजनेस सुरू करण्यासाठी लागणारी एकूण गुंतवणूक महानगरांसाठी सुमारे ₹ 25 ते ₹ 30 लाख रुपये आणि ग्रामीण किंवा गावभागासाठी ₹ 12 ते ₹ 14 लाख रुपये इतकी आहे.

प्रश्न: पेट्रोल पंप बिजनेस सुरू करण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे कोणती मूलभूत कौशल्ये आवश्यक आहेत?

उत्तर:

पेट्रोल पंप बिजनेस सुरू करण्यासाठी त्या व्यक्तीला कर्मचाऱ्यांच्या टीमचे मॅनेजमेंट आणि ऑपरेशनल कौशल्य जमायला पाहिजे.

प्रश्न: पेट्रोल पंप उभारण्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा आकार किती आहे?

उत्तर:

भारतात पेट्रोल पंपाचा बिजनेस सुरू करण्यासाठी लागणारी जमीन जवळपास 800 चौरस मीटर ते 1200 चौरस मीटरच्या दरम्यान असते.

प्रश्न: मी एचपी पेट्रोल पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करू?

उत्तर:

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही https://www.hindustanpetroleum.com या साईटला भेट द्या.

प्रश्न: मी पेट्रोलचा बिजनेस कसा सुरू करू?

उत्तर:

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गुंतवणुकीचे ठिकाण व इतर घटकांच्या आधारे विश्लेषण करा. भारतात पेट्रोल पंप सुरू करण्याचा प्रारंभिक ऑपरेटिंग खर्च काढा. पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे निकष पूर्ण करा. विहित शुल्कासह अर्ज सादर करा. अर्जदाराने पेट्रोल पंप डीलरशिपसाठी पात्रतेचे सर्व निकष पूर्ण केले पाहिजेत.

प्रश्न: मी माझा पेट्रोल पंप परवाना ट्रान्सफर करू शकतो का?

उत्तर:

कोणीही पेट्रोल पंप परवाना अन्य कोणालाही ट्रान्सफर करू शकत नाही. तुम्ही ट्रान्सफर करू इच्छित असल्यास, फ्रँचायजीशी संबंधित कागदपत्रांना सरेंडर करणे आवश्यक आहे किंवा तुम्हाला फ्रँचायजीमधून स्वत:ला माघार घ्यावी लागेल.

प्रश्न: भारतातील सर्वोत्तम इंधन कंपन्या कोणत्या?

उत्तर:

भारतातील काही शीर्ष इंधन कंपन्या खाली दिल्या आहेत:

  • हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड 
  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 
  • शेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
  • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 
  • भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

प्रश्न: भारतात पेट्रोल पंपचा मालक होणे फायद्याचे आहे?

उत्तर:

भारतात, पेट्रोल पंप सुरू करणे ही एक उच्च-गुंतवणूकीची बिजनेस कल्पना आहे. तरीही, हे अतिशय फायदेशीर आहे. पेट्रोल पंप मालक कमिशनच्या दरातून ₹ 1 ते ₹ 2 या दरम्यान सहज नफा कमवू शकतो.

Post a Comment

Previous Post Next Post