रमाई घरकुल योजना महाराष्ट्र 2021 Ramai awas yojana

 

रमाई घरकुल योजना महाराष्ट्र 2021 Ramai awas yojana


रमाई घरकुल योजना महाराष्ट्र 2021 | रमाई घरकुल आवास योजना | रमाई आवास घरकुल योजना 2021 अनुदान | Ramai awas yojana gramin | रमाई आवास घरकुल योजना अर्ज फॉर्म pdf

Ramai awas yojana gramin Maharashtra | रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लोकांसाठी ग्रामीण व शहरी भागासाठी ग्रामविकास व गृहनिर्माण विभागामार्फत घरकुल योजना राबवली जाते.

अनुसूचित जातीच्या व्यक्तींना त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे स्वतःच्या उत्पन्नातून चांगल्याप्रकारे पक्के घर बांधणे शक्य होत नाही. ग्रामीण भागातील बहुतांश लोक कच्या घरामध्ये राहतात. म्हणून राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या लोकांना त्यांचे राहणीमान उंचावण्याच्या व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून रमाई घरकुल योजना शासन निर्णय क्र. बीसीएच-२००८-प्र.क.३६/मावक-२ मंत्रालय विस्तार भवन मुंबई-३२ दिनांक १५ नोव्हेंबर, २००८ अन्वये लागू करण्यात आली.

रमाई घरकुल योजना महाराष्ट्र 2021 | रमाई घरकुल आवास योजना | रमाई आवास घरकुल योजना 2021 अनुदान | रमाई घरकुल योजना महाराष्ट्र मराठी | रमाई आवास घरकुल योजना अर्ज फॉर्म pdf । रमाई घरकुल योजना महाराष्ट्र लिस्ट । रमाई घरकुल योजना कागदपत्रे । रमाई आवास योजना यादी । iay.nic.in 2020-21 list maharashtra । Ramai awas yojana gramin

शासनाच्या दिनांक १३ एप्रिल, २०१६ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार इंदिरा आवास योजनेच्या नावात बदल करून 'प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (PMAY-G)' लागू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी निवड 'सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ SECC - २०११'  नुसार सूचना देण्यात आल्या आहेत. सदर योजनेअंतर्गत सन २०१९ पर्यंत ग्रामीण भागातील व सन २०२२ पर्यंत नागरी भागातील प्रत्येकाला पक्के घर देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

रमाई आवास घरकुल योजना 2021 अनुदान:

सामान्य न्याय व विशेष सहाय्य विभाग, दिनांक ३० सप्टेंबर, २०१६ शासन निर्णयानुसार रमाई (घरकुल) आवासयोजनेतंर्गत लाभार्थ्यांच्या अनुदानात सुधारणा करण्यात आली.

१. रमाई आवास योजनेंतर्गत (Ramai awas yojana gramin), प्रति घरकुल शौचालय बांधकामासह अनुदान साधारण क्षेत्र रु. १,३२,०००/- व नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी (शौचालय बांधकामासह) रु. १,४२,०००/- निश्चित करण्यात आले.

२. शौचालय बांधण्यासाठी लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या रु. १२,०००/- ची प्रतिपूर्ती, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून करण्यात येते.

३. रमाई घरकुल (आवास) योजनेसाठी शहरी भागातील (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत) वैयक्तिक लाभार्थ्यांकरीता प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) प्रमाणे लाभाची रक्‍कम वार्षीक उत्पन्न रु. ३ लाख पर्यंत असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रु. २.५० लाख अनुदान अनुज्ञेय आहे.

४. वरील प्रमाणे ग्रामीण व शहरी भागातील सुधारित अनुदान सन २०१६-१७ या आर्थिक वर्षा पासून लागू झाले. तसेच ज्या लाभार्थ्यांना यापुर्वी घरकुल मंजूर झाले आहे परंतु पहिला हप्ता सन २०१६-१७ मध्ये दिला आहे त्यांनाही सुधारित अनुदान अनुज्ञेय राहील.

५. पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर अभिसरणानुसार रमाई आवास योजनेकरिता नरेगा अंतर्गत जाब कार्डधारक लाभार्थी यांना ई-मस्टरव्दारे मजूरी देय राहील.

रमाई घरकुल योजना महाराष्ट्र 2021 इतर ठळक मुद्दे:

• रमाई घरकुल योजना महाराष्ट्र  (शहरी व ग्रामीण) योजनेचे मूल्यांकन करण्यासाठी मूल्यमापन समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती घरकुल निधी, योजनेतील त्रुटी, योजना राबविण्यात येणाऱ्या अडचणी व इतर बाबींचे मूल्यमापन व व्यवस्थापन करीत असते.

• रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळनेकरिता अनुसूचित जातींमधील जे अपंग लाभार्थी दारिद्र रेषेखालील नाहीत व ज्यांचे अपंगत्व ४०% पेक्षा अधिक आहे व वार्षिक उत्पन्न एक लाखा पर्यंत आहे, अशा अपंग लाभार्थ्यांना ते योजनेच्या इतर अटी पूर्ण करीत असल्यास त्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळवता येऊ शकतो.

रमाई आवास घरकुल योजना 2021 निवड/निकष/पात्रता:

राज्यातील सर्व मागासवर्गीयांना स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रमाई आवास योजना संपूर्णपणे सुधारित करण्याच्या प्रस्तावावर स्वतंत्रपणे कारवाई करण्यात आली. सद्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतच्या लाभार्थी निवडीबाबत मार्गदर्शक सूचना / निकष विचारात घेऊन त्यानुसार रमाई आवास योजनेसाठी करावयाच्या लाभार्थी निकष/निवडीबाबतच्या खालीलप्रमाणे सूचना सुधारित केल्या आहेत.

१. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गातील असावा.

२. लाभार्थ्याची महाराष्ट्र राज्यातील वास्तव किमान १५ वर्षाचे असावे.

३. लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.

४. लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण क्षेत्रासाठी रु. १.२० लाख एवढी राहील. त्याचप्रमाणे, नगरपरिषद क्षेत्रासाठी रु. १.५० लाख व महानगर पालिका क्षेत्र व मुबंई महानगर प्रदेश क्षेत्रासाठी रु. २ लाख एवढी लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे.

५. लाभार्थीने पूर्वी कोणत्याही घरकुल/आवास योजनेचा लाभ घेतला नसावा.

६. शासनाच्या धोरणानुसार शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण करून राहत असलेले व दिनांक ०१.०१.१९९५ रोजी त्यांचे घरकुल/निवास्थान अतिक्रमणाच्या जागेवर असल्यास आणि त्यांना संरक्षित झोपडीदार म्हणून संरक्षण प्राप्त असल्यास अशा लाभार्थींना या योजनेत सामाविष्ट केले जाते.

७. लाभार्थी 'सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ (SECC -२०११)' प्राधान्यक्रम यादीच्या (Generated Priority List) निकषा बाहेरील असावा. कारण प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (PMAY-G) लाभार्थी निवडीसाठी 'सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ (SECC -२०११)' प्राधान्यक्रम यादीतून (Generated Priority List) निवडण्यात येणार आहे.

रमाई घरकुल योजना 2021 निवड प्रक्रिया:

महाराष्ट्र शासन, सामान्य न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक ०९/०३/२०१० च्या शासन निर्णयानुसार रमाई घरकुल योजना २०२१ योजनेच्या लाभार्थी निवड प्रक्रियेबाबत सविस्तर सुधारित सूचना निर्गमित केल्या आहेत त्या खालीलप्रमाणे:

१. रमाई घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये Ramai awas yojana gramin अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेमार्फत करण्यात येते.

२. ग्रामसभेने निवड केलेल्या अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची अंतिम निवड 'घरकुल निर्माण समिती' करते. या समितीचे अध्यक्ष 'जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी' असतात.

३. लाभार्थी निवडीमध्ये अनुसूचित जाती संवर्गातील अपंग लाभार्थ्यांना किमान ३% घरकुले देणे बंधनकारक असते.

रमाई घरकुल योजना कागदपत्रे:

रमाई घरकुल योजना 2021 अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थीने सादर करवयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:

१. ७/१२ चा उतारा
२. घरपट्टी, पाणीपट्टी, वीज बिल यापैकी कोणतेही एक
३. जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
४. उत्पन्नाचा दाखला
५. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
६. मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड

रमाई आवास घरकुल घराचे क्षेत्रफळ:

घराच्या बांधकामाचे ग्रामीण भागासाठी Ramai awas yojana gramin चटई क्षेत्र २६९ चौ. फूट राहील व शहरी भागासाठी ३२३ चौ. फूट असेल. तेवढ्याच क्षेत्रासाठी शासकीय अनुदान देय राहिल. याशिवाय, लाभार्थी स्वतःच्या मालकीची जागा असेल तर त्यावर त्याच्या मर्जीनुसार अनुदान वापरून त्यावरील होणारा खर्च स्वखर्चाने जास्त क्षेत्राचे बांधकाम करू शकेल.

रमाई घरकुल योजना 2021 प्राधान्य क्षेत्र:

रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरे बांधताना खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम देण्यात येतात.

१. जातीय दंगलीमध्ये घराचे नुकसान (आगीमुळे व इतर तोडफोड) झालेली व्यक्ती. 
२. ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार पिडीत झालेल्या अनुसूचित जातीच्या पात्र व्यक्ती.
३. पूरग्रस्त क्षेत्र
४. घरात कोणीही कमावत नाही अशा विधवा महिला.

रमाई घरकुल योजना 2021 लाभार्थी हिस्सा:

रमाई घरकुल योजनेमध्ये ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांना घराच्या बांधकामाच्या खर्चामध्ये लाभार्थीचा हिस्सा निरंक आहे. तर नगरपालिका क्षेत्र ७.५ टक्के व महानगरपालिका क्षेत्र १० टक्के एवढा आहे. मात्र, नगर पालिका व महानगर पालिका क्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला लाभार्थी हिस्सा भरण्याची आवश्यकता नाही.

लाभार्थी हिस्सा, संबंधित विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी लाभार्थी निवडीनंतर लाभार्थीकडून लाभार्थी हिस्स्याची रक्कम घेऊन विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी व लाभार्थी यांच्या संयुक्त नावे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्यात जमा करावयाचा असतो. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँक कामाचा प्रगती अहवाल विचारात घेऊन रक्कम वितरित केली जाते.

लाभार्थाने लाभार्थी हिस्सा भरल्याशिवाय घरकुल बांधकाम सुरु करण्यात येत नाही. मात्र लाभार्थी स्वतः घरबांधणी करीत असेल तर, त्यांनी केलेले श्रमदान ही मजुरी समजून त्यांच्याकडून हिस्सा घेण्यात सूट देण्यात येते.

रमाई घरकुल योजना 2021 लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करणे:

जिल्ह्यात असेलेली गावे, नगरपरिषदा आणि महानगरपालिका यांच्यातून लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते. ही लॉटरी विभागीय समाज कल्याण अधिकारी यांचे स्तरावर संगणकीय पद्धतीने काढली जाते. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून ती ठळक पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येते. अशी निवड झाल्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टय अंतर्गत घरे बांधण्यास परवानगी देण्यात येते.

रमाई घरकुल योजना 2021 अनुदान वितरण कार्यपद्धती:

अ) घरकुलाचे अनुदान घराचे बांधकाम सुरु करताना ५० टक्के.

ब) ५० टक्के निधीचे उपयोगित प्रमाणपत्र सादर केल्यानंतर ४० टक्के.

क) घराचा ताबा घेताना आणि सक्षम प्राधिकाऱ्यांनी पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर १० टक्के.

वरीलप्रमाणे अनुदान गृह निर्माण समिती अध्यक्ष आणि सदस्य सचिव यांच्या स्वाक्षरीने विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी व लाभार्थ्यांच्या नावे सुरु करण्यात आलेल्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येते.

रमाई घरकुल योजना महाराष्ट्र लिस्ट:

रमाई घरकुल योजना २०२१ - ग्रामीण लाभार्थींची ऑनलाईन यादी (रमाई घरकुल योजना महाराष्ट्र list) iay.nic.in gramin या ग्रामीण विकास मंत्रायल, भारत सरकारच्या संकेतस्थळावर भेट देऊन पाहता येते.

१. यादी पाहण्यासाठी https://pmayg.nic.in/netiay/home.aspx येथे भेट द्या.

२. त्यानंतर 'Awasoft' या पर्याय मध्ये 'Report' हा पर्याय निवडा.

३. त्यानंतर 'Physical Progress Report' या पर्याय मध्ये दुसरा पर्याय 'House progress against the target financial year' हा पर्याय निवडा.

४. नवीन उघडलेल्या पेजवर पहिल्या टॅबमध्ये वर्षे निवडा (२०१९-२०, २०२०-२१ इत्यादी).

५. यानंतर, दुसऱ्या टॅब मध्ये 'Ramai  Awas Yojana for SC' हा पर्याय निवडा.

६. त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका व गाव निवडा.

याप्रमाणे, रमाई घरकुल योजना, महाराष्ट्र गाव निहाय लाभार्थी यादी ऑनलाईन पाहता येते व pdf  स्वरूपात डाऊनलोड ही करता येते.

रमाई आवास घरकुल योजना अर्ज:

रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती व आवश्यक कागदपत्रांसहित संबंधीत ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगर पालिका कार्यालयामध्ये मध्ये अर्ज द्या. (अर्ज pdf  स्वरूपात खालीलप्रमाणे दिला आहे ) ग्रामीण क्षेत्रासाठी Ramai awas yojana gramin ग्रामसभेद्वारे रमाई आवास घरकुल योजनेअंतरर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते.

रमाई आवास घरकुल योजना फॉर्म pdf:

रमाई आवास घरकुल योजना (ग्रामीण) अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गामधील लाभार्थ्यांसाठी अर्ज नमुना pdf स्वरूपात डाऊनलोड करा.- Download Now.

हे देखील वाचा: घरकुल यादी २०२१ महाराष्ट्र (पंतप्रधान आवास यो

إرسال تعليق

أحدث أقدم