ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 : Tractor Subsidy Scheme

 

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 : Tractor Subsidy Scheme


Tractor Subsidy Scheme | Tractor Anudan Yojana | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र | Tractor Subsidy Scheme Maharashtra | ट्रॅक्टर सबसिडी योजना | शेती अवजारे अनुदान | ट्रॅक्टर अवजारे | online tractor subsidy application | ट्रॅक्टर अवजारे अनुदान | ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र | Tractor Anudan Yojana Maharashtra

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव ट्रॅक्टर अनुदान योजना आहे.या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच शेती अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान देते.

Tractor Subsidy Scheme

राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत.ते शेतीसाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करत असतात त्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये त्यांना खूप सारे कष्ठ करावे लागतात.आर्थिक स्थिती कमजोर असल्या कारणामुळे ते आपल्या शेतात आधुनिक यंत्रांचा वापर करण्यास असमर्थ असतात या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने ट्रॅक्टर अनुदान योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.

महाराष्ट्र सरकार कृषी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत आहे कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाकडून दरवर्षी Maha DBT Portal च्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवले जातात त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची योजना जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची आहे ती म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून कृषी अवजारांवर / यंत्रावर अनुदान उपलब्ध करून दिले जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खालील गोष्टींवर सरकारकडून अनुदान दिले जाते तसेच यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

योजनेचे नावTractor Subsidy Scheme
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागकृषी विभाग
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभटॅक्टर खरेदीसाठी आर्थिक मदत
उद्देशशेतकऱ्यांना कृषी यांत्रिकी करणाचा लाभ पोहोचणे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाईन
Tractor Subsidy Scheme

ट्रॅक्टर अनुदान योजना उद्दिष्ट

Tractor Subsidy Scheme Purpose

  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असते पुष्कळ शेतकरी असे आहेत जे अजून पारंपरिक पद्धतीने शेती करतात अशा पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या शेतीला पुष्कळ वेळ लागतो म्हणून राज्य शासनाने शेतकऱ्यांची शेती विषयक कामे आधुनिक पद्धतीने आणि अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे.
  • ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमीन सुधारणा औजारे / यंत्र, पूर्वमशागत औजारे, आंतर मशागत यंत्र, पेरणी व लागवड यंत्रे, पीक संरक्षण यंत्र, काढणी व मळणी अवजारे इत्यादी शेतीची कामे जलद गतीने करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य करण्यात येते.
  • कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकी करणाचा लाभ पोहोचणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजनेचे वैशिष्ट्ये

Tractor Anudan Yojana Maharashtra

  • ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र राज्यातील शेकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयुक्त अवजारे विकत घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार शेतकरी घरी बसून आपल्या मोबाईलच्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदार शेतकऱ्याला कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान

Maharashtra Tractor Subsidy Scheme

  • ट्रॅक्टर
  • पॉवर टिलर
  • ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे
  • बैल चलित अवजारे / यंत्र
  • मनुष्य चलित यंत्र / अवजारे
  • प्रक्रिया संच
  • काढणी पश्‍चात तंत्रज्ञान
  • फलोत्पादन यंत्र / अवजारे
  • वैशिष्ट्यपूर्ण यंत्र / अवजारे
  • स्वयंचलित यंत्रे

ट्रॅक्टर अनुदान योजना फायदे

Tractor Subsidy Scheme Benefits

  • शेतीची कामे कमी वेळात जलद गतीने लवकर होण्यासाठी मोठी मदत होईल.
  • राज्य शासनाकडून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाते.
  • राज्य शासनाकडून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत शेतकरी स्वतःच्या आवडीचा ट्रॅक्टर खरेदी करू शकतो.
  • अनुदान योजनेमुळे शेतकऱ्याला बँकांकडून किंवा संस्थांकडून कमी व्याजदरात कर्जाची सुविधा देखील दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत देशातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • महिला शेतकऱ्यांना या योजनेसाठी प्राथमिकता दिली जाते.
  • शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
  • या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता/अटी

Tractor Subsidy Scheme Maharashtra Terms & Condition

  • एका शेतकऱ्याला फक्त एकाच ट्रॅक्टर चा लाभ घेता येईल.
  • शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती वर्गामधील असणे आवश्यक त्यासाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक
  • या योजनेचा फायदा केवळ एकच औजारासाठी देण्यात येईल म्हणजे राज्य शासनाद्वारे देण्यात येणारे अनुदान फक्त एकाच औजारासाठी देण्यात येईल उदाहरणार्थ ट्रॅक्टर अवजारे / यंत्र इत्यादी.
  • शेतकऱ्याचे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक
  • लाभार्थी कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीकडे जर ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर चलित औजारासाठी लाभार्थी व्यक्ती पात्र मानण्यात येईल परंतु त्यासाठी ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक असेल.
  • जर एखाद्या लाभार्थी व्यक्तीने औजारासाठी लाभ घेतला असेल  परंतु त्याच औजारासाठी किमान १० वर्षे तरी अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल.
  • एखाद्या शेतकऱ्याने या आधी जर एखाद्या कृषी अनुदानाचा लाभ घेतला असल्यास त्याला ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन असणे आवश्यक आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे

Tractor Subsidy Scheme Documents

  • आधार कार्ड
  • ७/१२ उतारा ८ अ दाखला
  • अर्जदार अनुसूचित जाती जमाती चा असल्यास जात प्रमाणपत्र
  • अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
  • स्वयंघोषणापत्र
  • राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक.
  • पूर्व संमती पत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • जो आवजार खरेदी करायचा आहे त्या अवजाराचे कोटेशन.
  • केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला अवजार तपासणी अहवाल

ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Tractor Anudan Yojana Maharashtra Online Registration Process

पहिले चरण

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर नवीन अर्ज नोंदणी (New Registration) वर क्लिक करावे लागेल.
Tractor Subsidy Scheme home page
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यात तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती जसे कि तुमचे संपूर्ण नाव,मोबाईल क्रमांक, ईमेल, पासवर्ड, इत्यादी टाकून रजिस्टर या बटनावर क्लिक करावे.
Tractor Subsidy Scheme Registration
  • अशा प्रकारे तुमचे रेजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

दुसरे चरण

  • आता तुम्हाला लॉगिन वर क्लिक करून पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
Tractor Subsidy Scheme Log In
  • Login झाल्यावर My Scheme वर क्लिक करून ट्रॅक्टर अनुदान योजना २०२२ – २०२३ या पर्यायावर क्लिक करून Apply बटन वर क्लिक करावे.
  • आता एक नवीन पेज उघडेल त्यात या योजनेचा अर्ज असेल त्या अर्जामध्ये तुम्हाला विचारले सर्व माहिती भरायची आहे आणि योग्य ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि Apply बटणावर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

Tractor Subsidy Scheme Offline Application Process

  • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्राच्या जिल्हा कार्यालय जावे लागेल.
  • जिल्हा कार्यालयात कृषी विभागात कृषी अधिकाऱ्यांकडून ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोड़ून सादर अर्ज अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post