डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2022 : Swadhar Yojana
Swadhar Yojana
महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते.त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Swadhar Yojana आहे. स्वाधार योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी क्षेत्रानुसार अनुदान मिळणार आहे. हे अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल.
आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण स्वाधार योजना काय आहे, Swadhar Yojana उद्दिष्ट काय आहे, Swadhar Yojana वैशिष्ट्य काय आहेत, Swadhar Yojana फायदे काय आहेत, Swadhar Yojana पात्रता काय आहे, Swadhar Yojana आवश्यक कागदपत्रे काय आहेत, Swadhar Yojana अर्ज करायची पद्धत, स्वाधार योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या महाविद्यालयांची संख्या आणि त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे त्यामुळे राज्यातील शासकीय वसतिगृह कमी पडत चालली आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते व याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो पुष्कळ विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना दहावीनंतर विद्यालयात प्रवेश घेता येत नाही व त्यामुळे त्यांना स्वतःचे शिक्षण बंद करावे लागते.
त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना रहायची व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यात शिकणाऱ्या इयत्ता अकरावी,बारावी व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार आहे.
स्वाधार योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गातील इयत्ता अकरावी,बारावी पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान म्हणून रक्कम मंजूर करण्यात येते जी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात Transfer केली जाते.
| योजनेचे नाव | स्वाधार योजना |
| राज्य | महाराष्ट्र |
| विभाग | समाज कल्याण विभाग |
| योजनेची सुरुवात | २०१६-२०१७ |
| लाभार्थी | अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी |
| लाभ | शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा उद्देश्य
Swadhar Yojana Purpose
- महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी किंवा उच्चशिक्षणासाठी स्वतःचे घर सोडून दुसऱ्या शहरात राहतात त्यांना बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमार्फत आर्थिक मदत करण्यात येते. जेणेकरून त्यांना त्याचे शिक्षण पूर्ण करता येईल आणि त्याच्या दैनंदिन जीवनातील इतर खर्चात सुद्धा थोड्याफार प्रमाणात मदत करता येईल या उद्देश्याने सुरु करण्यात आली आहे.
- राज्यातील विद्यार्थ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे व त्यांचा सामाजिक व शैक्षणिक विकास करण्याच्या उद्देशाने स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे
- विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वावलंबी बनवून त्यांचा स्वतःच्या पायावर उभे करणे हा या योजनेचा उद्देश आहे

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची वैशिष्ट्ये
Swadhar Yojana Features
- स्वाधार योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे
- स्वाधार योजनेसाठी सर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन करण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थीं घरी बसून आपल्या मोबाईलच्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचा पैसा आणि वेळ दोघांची बचत होईल.
- या योजनेअंतर्गत देण्यात येणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
- स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठल्याच आर्थिक तंगी चा सामना करावा लागू नये या उद्देशाने सुरु करण्यात आलेली बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना खूप महत्वाची योजना आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ
Swadhar Yojana Benefits
- स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ६००००/- रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते.
- स्वाधार योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार अनुदान देण्यात येते.
- स्वाधार योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
- विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणाकडून कर्ज घ्यायची सुद्धा आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी आत्मनिर्भर बनतील.
- योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवू शकतील व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील तसेच शिक्षण पूर्ण करून स्वतःचा स्वरोजगार स्थापित करून शकतील व राज्यातील इतर बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करू शकतील.
स्वाधार योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान
Swadhar Yojana Subsidy
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नवबौद्ध या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे अनुदान देण्यात येईल.
खर्चाची बाब मुंबई शहर, मुंबई उपनगर,
नवी मुंबई, ठाणे, पुणे,
पिंपरी-चिंचवड, नागपूर
या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या
विद्यार्थ्यांना अनुदान रक्कमइतर महसूल विभागीय शहरातील व
उर्वरित क वर्ग महानगरपालिका
क्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना
अनुदान रक्कमउर्वरित ठिकाणी
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना
अनुदान रक्कमभोजन भत्ता ३२०००/- २८०००/- २५०००/- निवास भत्ता २००००/- १५०००/- १२०००/- निर्वाह भत्ता ८०००/- ८०००/- ६०००/- एकूण पत्ता ६००००/- ५१०००/- ४३०००/- वरील रक्कम व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष रुपये ५०००/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रति वर्ष २०००/- इतकी रक्कम देण्यात येईल.
स्वाधार योजनेसाठी आवश्यक पात्रता
Swadhar Yojana Eligibility
- अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नवबौद्ध विद्यार्थीच या योजनेसाठी पात्र असतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अटी
Swadhar Yojana Terms & Condition
- ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी किंवा पदविका परीक्षेत ६० टक्क्यापेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
- या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्के आवश्यक आहे.
- ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थी त्याच्या राहत्या जिल्याच्या बाहेर शिक्षण घेत असावा.
- विद्यार्थी ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी शिक्षण घेत नसावा.
- लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड ही त्याच्या गुणवत्तेनुसार करण्यात येईल.
- एखादा विद्यार्थी शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- विद्यार्थ्यांना स्वतःचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करणे आवश्यक आहे.
- जर एखादा विद्यार्थी शासकीय वसतिगृहात राहत असेल तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- विद्यार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे तसे जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जामध्ये खोटी,बनावट माहिती तसेच दिशाभूल करणारे पुरावे /कागदपत्रे देऊन लाभ घेतल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करीत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व विद्यार्थ्याला सदर योजनेकरीता अपात्र ठरवण्यात येईल व विद्यार्थ्याला सदर योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम (१२टक्के) व्याजासह वसूल करण्यात येईल.
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Swadhar Yojana Documents
- अर्जाचा नमुना
- विद्यार्थ्याचे दहावी पास प्रमाणपत्र (साक्षांकित प्रत)
- शाळा सोडल्याचा दाखला
- जन्माचा दाखला
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला विद्यार्थ्यांचा / विद्यार्थ्यांच्या वडिलांचा जातीचा दाखला.
- सन २०२१-२१ या आर्थिक वर्षात तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा / आई-वडील यांचा उत्पन्नाचा दाखला.
- विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला. विद्यार्थीचे ज्या राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते आहे त्या खात्याची झेरॉक्स प्रत.
- पालकाचे / आई-वडीलांचे सदर अर्जात नमूद केलेले घोषणापत्र.
- मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र किंवा शिफारस पत्र.
- विद्यार्थी BPL कुटुंब धारक असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर संबंधित महाविद्यालयाकडून बोनाफाईड दाखला सादर करावा.
- ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तिथून महाविद्यालय उपस्थिती प्रमाणपत्र.
- विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसल्याचे शपथपत्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
Swadhar Yojana Registration Process
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ज्या जिल्ह्याचा रहिवासी असेल तेथील जिल्ह्याच्या समाजकल्याण कार्यालयात जाऊन बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.

किंवा आम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज डाउनलोड करायचा आहे.
अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात जमा करायचा आहे.
अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
| Swadhar Yojana Form | येथे क्लिक करा |