कृषी ड्रोन अनुदान योजना 2022 : मिळवा १० लाखांपर्यंत अनुदान

 

कृषी ड्रोन अनुदान योजना 2022 : मिळवा १० लाखांपर्यंत अनुदान





Krushi Drone Anudan Yojana | कृषी ड्रोन अनुदान योजना | Krushi Drone Subsidy Scheme | कृषी ड्रोन अनुदान योजना महाराष्ट्र | Krushi Drone Anudan Yojana Maharashtra | शेतकरी अनुदान योजना 2022 | Drone Shakti Scheme | कृषी योजना 2022 | How To Apply For Agriculture Drone Subsidy | Drone Scheme For Agriculture | Krushi Yojana Maharashtra 2022 | Drone Anudan Yojana

Krushi Drone Anudan Yojana

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असते त्या योजनांपैकी एक योजना krushi done anudan yojana आहे या योजनेअंतर्गत देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या शेत फवारणीसाठी उपयुक्त अशा ड्रोन खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून त्यांना शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल व शेतीची फवारणी ची कामे जलद गतीने करता येतील.

देशातील शेतकरी पीक संरक्षणासाठी शेतात फवारणी करतात त्यासाठी ते पाठीवरच्या पंपाचा वापर करतात तसेच फवारणी करताना शेतकऱ्यांजवळ कीटकनाशकांपासून संरक्षणासाठी काहीच सुविधा उपलब्ध नसतात त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना त्वचेचे आजार होतात काहींना विषबाधा होते व त्यामधील काही शेतकऱ्यांना दुर्दैवाने मृत्यू देखील होतो.या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र शासनाने शेत फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्याचा विचार केला आहे त्यासाठी ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे

शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनिक साधनांचा उपयोग करता यावा तसेच कृषी क्षेत्रात ड्रोन द्वारे फवारणीच्या वापरात वाढ व्हावी या उद्देशाने कृषी ड्रोन अनुदान योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहेआपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण कृषी ड्रोन अनुदान योजना काय आहे, krushi drone anudan yojana कोणासाठी आहे, कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे फायदे काय आहेत, krushi drone subsidy scheme पात्रता व अटी काय आहे, कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत,संपर्क क्रमांक, krushi drone anudan yojana अर्ज करायची पद्धत, कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत तरी इच्छुक आणि पात्र लाभार्त्यांनी या योजनेच्या लाभ अवश्य घ्यावा.

योजनेचे नावKrushi Done Anudan Yojana
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

कृषी ड्रोन अनुदान योजना उद्देश्य

krushi drone anudan yojana purpose

कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेत फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देऊन शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश्य आहे तसेच ड्रोन च्या साहाय्याने शेतात फवारणी केल्यामुळे पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या फवारणी पासून शेतकऱ्यांचे संरक्षण होईल व होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण टाळता येईल

कृषी ड्रोन अनुदान योजनेचे वैशिष्टये

Krushi Drone Anudan Yojana Feaures

  • कृषी ड्रोन अनुदान योजना संपूर्ण देशात सुरु करण्यात आली आहे.
  • ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार व कृषी पदवीधरांनाही ड्रोन च्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा होत असलेला प्रयत्न हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये आहे

कृषी ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक हे खालील संस्थेद्वारे राबविले जाणार आहे

  • कृषी विज्ञान केंद्रे
  • शेतकरी उत्पादन संस्था
  • कृषी विद्यापीठ
  • भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था
  • कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्थाकृषी ड्रोन अनुदान योजनेचे लाभ

    Krushi Drone Anudan Yojana Benefits

    • कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे
    • या योजनेअंतर्गत कृषी पदवीधरांना ५ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे
    • इयत्ता १०वी उत्तीर्ण व रिमोट तंत्राचे प्रशिक्षण असलेल्या ग्रामीण भागातील कोणत्याही युवकाला ४ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
    • कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या माध्यमातून शेती विषयक विविध कामे केली जाऊ शकतील
    • ड्रोन भाडेतत्वावर देऊन रोजगार निर्मिती करता येणं शक्य होईल

    कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम खालीलप्रमाणे

    • विद्यापीठे व सरकारी संस्था – १०० टक्के अनुदान (१० लाखांपर्यंत)
    • शेतकरी उत्पादक संस्था – ७५ टक्के अनुदान (७ लाख ५००००/- रुपये अनुदान)
    • शेतकरी उत्पादक संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास (प्रति हेक्टरी ६०००/- रुपये अनुदान)
    • संस्थांनी कृषी ड्रोन चे प्रात्यक्षिक राबविल्यास – ३०००/- रुपये अनुदान
    • अवजारे सेवा सुविधा केंद्रांना ड्रोन खरेदी करताना – ५० टक्के अनुदान (५ लाखांपर्यंत)
    • कृषी पदवीधारकाने अवजारे सेवा केंद्र सुरु केल्यास – ५ लाखांपर्यंत अनुदान

    कृषी ड्रोन अनुदान योजनेची पात्रता

    Krushi Drone Anudan Yojana Eligibility

    • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे
    • कृषी विज्ञान केंद्रे,शेतकरी उत्पादन संस्था,कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था,कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था इत्यादी या योजनेसाठी पात्र असतील

    कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या अटी

    Krushi Drone Anudan Yojana Terms & Conditions

    • अर्जदार कृषी पदवीधारक असल्यास कृषी पदवी सादर करणे आवश्यक
    • अर्जदाराने या आधी ड्रोन अनुदानाचा लाभ घेतला असेल तर त्याला पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

    कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत अर्जदारास खालील प्रकारे अटी मान्य असणे आवश्यक आहे

    Krushi Drone Anudan Yojana Maharashtra

    1. ड्रोन ची खरेदी किमतीची पुर्ण रक्कम भरुन खुल्या बाजारातुन ड्रोन व इतर उपकरणे ची खरेदी करण्यास संस्था तयार आहे.
    2. ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र स्थापनेकरीता बॉन्ड पेपरवर हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे, याची मला जाणीव आहे.
    3. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या माफक भाडेतत्वावर ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र सेवा-सुविधा पुरविण्यास आमची तयारी आहे.
    4. अनुदानाची रक्कम माझे आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाईल याची मला कल्पना आहे, त्याकरीता मी माझे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले आहे.
    5. मी ड्रोन व इतर उपकरणे खुल्या बाजारातुन माझ्या पसंतीने खरेदी करणार असल्याने ड्रोन व इतर उपकरणे गुणवत्तेची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील याची मला जाणीव आहे.
    6. तसेच यापुर्वी मी उपरोक्त प्रस्तावासाठी किंवा त्याच्या काही भागासाठी कोणत्याही शासकीय/निमशासकीय यंत्रणेकडून अनुदान/आर्थिक मदत घेतलेली नाही.
    7. ड्रोन व इतर उपकरणे खरेदीकरीता पुर्वसंमती मिळाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत औजारे/यंत्रांची खुल्या बाजारातुन खरेदी करणे आवश्यक आहे, अन्यथा प्रदान केलेली पुर्वसंमती रद्द होईल, याची मला जाणीव आहे.
    8. मला ड्रोन व इतर उपकरणे खरेदीकरीता पुर्वसंमती मिळाल्यानंतर ड्रोन व इतर उपकरणे खुल्या बाजारातुन खरेदी करताना संस्थेच्या बॅन्क खात्यातुन इलेक्ट्रॉनिक पध्दतीने(आर.टी.जी.एस. ईत्यादी)/धनादेश/धनाकर्षाद्वारे विक्रेत्यास रक्कम अदा करणे बंधनकारक आहे, याची मला जाणीव आहे
    9. ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र -सेवा-सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक अनुभव, प्रशिक्षीत, अनुभवी व पुरेसे मनुष्यबळ असणे, यंत्रसामुग्री व उपकरणे सुरक्षीत व सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक जागा व शेडची व्यवस्था असणे बंधनकारक राहील. सर्व यंत्रसामुग्री व उपकरणे संबंधीतांनी माफक भाडे तत्वावर उपलब्ध करुन त्यांच्या सेवा शेतक-यांना वेळोवेळी पुरविणे बंधनकारक राहील.
    10. संस्थेने ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र सेवा-सुविधा शेतक-यांना पुरविल्याबाबत आवश्यक अभिलेख ठेवणे व त्याचा नियमीत अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच, याबाबत तपासणीच्या वेळी सर्व यंत्रसामुग्री/उपकरणे व अभिलेख सादर करणे बंधनकारक राहील.
    11. सदर कार्यक्रमांतर्गत पुरविण्यात येणा-या यंत्रसामग्री व उपकरणे यांची नियमीत देखभाल व दुरुस्ती करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत लाभधारक संस्थेची राहील, संबंधीत सेवा-सुविधा केंद्रे व्यवस्थित चालविणे व वेळोवेळी त्यात सुधारणा करण्याची तयारी असणे आवश्यक राहील,
    12. Ministry of Civil Aviation ,CIB&RC यांचेकडील मार्गदर्शक सूचना प्रमाणे कार्यवाही करणे बंधनकारक राहील
    13. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या SOP प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक राहील.

    कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

    Krushi Drone Anudan Yojana Documents

    • आधार कार्ड/फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत
    • राशन कार्ड
    • रहिवाशी प्रमाणपत्र
    • ईमेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • पासपोर्ट साईज फोटो
    • बँक पासबुकाच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत / रद्द केलेला धनादेश
    • खरेदी करावयाच्या ड्रोन चे कोटेशन/विक्रेत्याची संपूर्ण माहिती
    • संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
    • अधिकृत रिमोट पायलट ट्रैनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व तपशील
    • कृषी पदवी
    • संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
    • संस्थेशी संबंधीत व्यक्तीच्या बॅन्क खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधीकृत केले असल्यास प्राधीकृत केल्याचे पत्र.
    • अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व तपशील (कागदपत्रे जोडण्यात यावी)
    • अर्जदार संस्था असल्यास संस्थेचा पुरावा
    • स्वयं घोषणापत्र
    • पूर्व संमतीपत्रकृषी ड्रोन अनुदान योजना अर्जात विचारण्यात येणारी माहिती

      १.अर्जदाराची माहिती:

      अर्जदाराचा प्रकार

      २.अर्जदार संस्थेचा पत्ता:

      ठिकाण
      गांव
      तालुका
      जिल्हा
      पिन
      फोन नंबर

      ३.संस्थेचा तपशील / अथवा ज्या व्यक्तीच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधिकृत केले आहे अशा व्यक्तीचा तपशील:

      व्यक्तीचे / संस्थेचे नाव
      संस्थेशी संबंध
      ठिकाण
      गांव
      तालुका
      जिल्हा
      पिन
      फोन नंबर
      आधार क्रमांक
      खाते असल्यास बँकेचे नाव
      बँक खाते क्रमांक
      बँकेचा IFSC कोड४.अर्जदार / संस्थेने धारण केलेल्या शेतजमिनीचा ७/१२ व ८-अ प्रमाणे तपशील:

      सर्वे/गट क्रमांक
      क्षेत्र

      ५.अनुदानावर खरेदी करावयाच्या औजार/उपकरणाचा तपशील:

      खरेदी करावयाच्या ड्रोन व इतर उपकरणे नाव व तपशील
      मॉडेल
      उत्पादकाचे / कंपनी चे नाव
      औजारे यंत्राची किंमत
      एकूण किंमत

      ६.अर्जदार संस्था ही या पूर्वी लाभ घेतलेली औजारे बँक धारक असल्यास त्या बाबत चा तपशीलसंस्थेचे नाव

      पत्ता
      अनुदान घेण्यात आलेले वर्ष
      संस्था सध्या कार्यरत आहे किंवा कसे

      ७.अर्जदार कृषी पदवी धारक असल्यास त्या बाबतचा तपशील

      अर्जदाराचे नाव
      उत्तीर्ण वर्ष
      विद्यापीठाचे नाव
      प्राप्त गुण

      ७.अर्जदार ग्रामीण नव उद्योजक असल्यास त्या बाबत चा तपशीलअर्जदाराचे नाव

      शैक्षणिक पात्रता (किमान १०वी पास)
      विद्यापीठाचे नाव
      प्राप्त गुण

      कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

      Krushi Drone Anudan Yojana Registration process

      अर्जदाराने संबंधित योजनेचा अर्ज डाउनलोड करून अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज कृषी आयुक्तालय निविष्ठा तसेच गुणनियंत्रक विभागातील अवजारे विभागाचे उपसंचालक किंवा तालुका कृषी अधिकारी यांचे जवळ सादर करावा.

    • 🛑ड्रोन अनुदान योजना फॉर्म PDF मध्ये – येथे पहा

      🛑 सूचना – येथे पहा

Post a Comment

Previous Post Next Post