पंतप्रधान सुरक्षा विमा योजना मराठी Suraksha Bima Yojana In Marathi

 

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना मराठी Suraksha Bima Yojana In Marathi


Pradhan mantri suraksha bima yojana | Suraksha Bima Yojana In Marathi प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती | पंतप्रधान सुरक्षा विमा योजना pmsby scheme details in marathi

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ही एक विमा संरक्षण असणारी केंद्रपूरस्कृत विमा Insurance योजना आहे. २०१५ च्या भारताच्या अंदाजपत्रकात (India Budget 2015-16) तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेचा उल्लेख केला होता. ९ मे, २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे पंतप्रधान सुरक्षा विमा आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा या दोन विमा योजना एकत्रितपणे जनतेसाठी जाहीर केल्या.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना Suraksha Bima Yojana In Marathi | pmsby scheme details in marathi | प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती | पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेची पात्रता । पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ/फायदा काय आहे । पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा हेल्पलाईन क्रमांक । प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ऑनलाईन फॉर्म मराठी Online Downloads

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा उद्देश:

आजच्या काळात देशातील प्रत्येक नागरिकाचा विमा Insurance असणं आवश्यक आहे. मात्र जास्त प्रीमियम असल्याने विमा काढणे प्रत्येकालाच परवडले असं नाही. यामुळे देशातील गरीब आणि आर्थिक दुर्बल नागरिकांचा विचार करून ही योजना सुरू करण्यात आली.

भारताच्या फक्त २०% लोकांपाशी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा विमा आहे. या योजनेचा उद्देश देशातील विमा पोलिसी धारकांची संख्या वाढविणे हा होय. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरीक महिना फक्त रु. १/- एवढा प्रिमियम भरून रु. २ लाख पर्यंतचा लाभ घेऊ शकतो.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेची पात्रता:

• देशातील प्रत्येक १८ ते ७० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील.

 विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक महत्वाचा घटक आहे.

 लाभार्थीचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.

 कोणत्याही बँका, पोस्ट खाते व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या (एलआयसी इ.) यांच्या सहयोगाने या योजनेचेचा लाभ घेता येतो.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचे ठळक मुद्दे/बाबी:

 एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकेल. 

 लाभार्थीच्या बचत खात्या मधून विम्याची रक्कमप्रति वर्षी रु. १२-/+ सेवाकर ऑटो डेबिट केली जाते.

 हप्त्याचा कालावधी दर वर्षी १ जून ते ३१ मे असा असतो.

 ही योजना एक वर्षासाठी विमा संरक्षण देते. त्या त्यानंतर त्यास एका वर्षाने नुतनीकरण करावे लागते.

• विमाहप्ता रु. १२/- प्रती व्यक्ती प्रती वर्ष राहील व बँक बचत खात्यात परस्पर नावे टाकला जाईल.

 विमा धारकाने वय वर्षे ७० पूर्ण केल्यावर व बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता टाकण्यास पुरेशी शिल्लक नसेल किंवा बँक खाते बंद केले तर विमा संरक्षण संपुष्टात येईल.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ/फायदा काय आहे?

अपघाती मृत्यू

नैसर्गिक आपत्ती किंवा खूनामुळे झालेला मृत्यू रुपये २ लाख एवढी रक्कम बिमित आहे.

स्थायी अपंगत्व

दुर्घटना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे दोन्ही डोळ्यांची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी / दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी होणे / एक डोळा आणि एका हात किंवा एक पाय निकामी होणे- रुपये २ लाख.

स्थायी आंशिक अपंगत्व

एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी किंवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे - रुपये १ लाख.

लाभात कोणत्या गोष्टींचा समावेश नाही:

या योजने अंतर्गत आत्महत्येच्या प्रयत्नांमुळे आत्महत्या झाल्यास विमा उतरवलेले व्यक्ती मरण पावले असल्यास किंवा आत्म्यहत्यच्या प्रयत्न केल्यामुळे स्थायी अपंगत्व किंवा स्थायी आंशिक अपंगत्व आल्यास व तसे सिद्ध झाल्यास तर योजनेअंतर्गत त्याला कोणताही फायदा मिळत नाही.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ/फायदा कसा घ्यावा?

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ/फायदा घेण्यासाठी तुमच्या चालू असेलल्या बचत बँक खात्यातून घेता येतो. त्यासाठी तुम्ही  https://www.jansuraksha.gov.in/Forms-PMSBY.aspx वेबसाइटवरुन फॉर्म डाउनलोड करू शकता. एकदा डाउनलोड केल्यानंतर फॉर्म फॉर्म भरून ते आपल्या बँकेमध्ये भरा. बँक आपल्या अर्जावर प्रक्रिया करेल, त्यानंतर आपल्या खात्यातून प्रीमियमची रक्कम दरवर्षी कमी केली जाईल आणि तुमचं विमा संरक्षण सुरु होईल. तसेच, पोस्ट खाते व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या (एलआयसी इ.) माध्यमातून योजनेचा लाभ घेऊ शकता.

हक्क/दावा सांगण्यासाठी खालील मुद्द्यांचे अनुसरण करा:

आपण या योजनेचा ( pradhan mantri suraksha bima yojana) फायदा घेतलेल्या आपल्या बँकेमध्ये दावा करा. पॉलिसी क्लेम फॉर्म भरा आणि संबंधित कागदपत्रांसह फॉर्म आपल्या बँकेस सादर करा. दुर्घटना किंवा दस्तऐवजांमध्ये गुन्हेगारी कारणामुळे मृत्यू किंवा अपंगत्वाशी संबंधित पोलिसांचा समावेश आहे. तथापि, जर मृत्यू किंवा अक्षमता गैर-गुन्हेगारी कारणास्तव असेल तर दाव्याची तपासणी करण्यासाठी हॉस्पिटल रेकॉर्ड आवश्यक असेल. अर्जाचा फॉर्म बँकेद्वारे प्रक्रियेत आणला  जाईल.  अपंगत्वाच्या बाबतीत, खात्री झालेल्या व्यक्तीच्या बँक खात्यात आणि मृत्यूच्या बाबतीत, ती नॉमिनीच्या बँक खात्यात पाठविली जाईल.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा हेल्पलाईन क्रमांक:

आपण याची माहिती टोल फ्री क्रमांकाद्वारे ही मिळवू शकता प्रत्येक राज्यानुसार टोल फ्री क्रमांक दिले आहेत. तसेच एक राष्ट्रीय टोल फ्री नंबर देखील आहे.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना महाराष्ट्रासाठीचा टोल फ्री क्रमांक:

महाराष्ट्र बँक - १८००-१०२-२६३६
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक: १८००-१८०-११११ /१८००-११०-००१
पंत्रप्रधान सुरक्षा विमा योजना संकेतस्थळ/वेबसाईट:
https://www.jansuraksha.gov.in

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ऑनलाईन फॉर्म मराठी Online Downloads:

Pradhan Mantri Jeevan Bima yojana Application form in marathi pdf - Download

Pradhan Mantri Suraksha Bima yojana claim form marathi pdf - Download

वाचकमित्रहो, पंत्रप्रधान सुरक्षा विमा योजना ही क अतिशय स्वस्त विमा योजना आहे, जी बँक खाते असलेल्या प्रत्येक व्यक्तीद्वारे सहजपणे मिळविली जाऊ शकते. म्हणून, या योजनेचा प्रत्येकाने लाभ घ्या आणि ही माहिती इतरांसोबत देखील शेअर करा.

إرسال تعليق

أحدث أقدم