अटा चक्की मशीन कशी विक्री करावी
चक्की मशीन ऑनलाइन कशी विकली जावी आणि त्याचा प्रकार
भारतीय समाजात खास करुन उत्तर भारतीय लोकांच्या अन्ना मधील महत्वाचा घटक म्हणजे गहू. जगात सर्वात जास्त उत्पादन होणाऱ्या धान्य ह्या मध्ये गव्हाचा तिसरा क्रमांक लागतो तर जगाच्या एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोक ह्याच सेवन करतात भारत सुध्दा ह्यात मागे नाही, त्याचे उत्पादन करणाऱ्या शीर्षस्थानी असणाऱ्या देशात आपला दुसरा क्रमांक लागतो. गव्हाचे उपयोग तसे बरेच आहेत हृदय विकारा पासून आपलं संरक्षण करते, कोलेस्टेरॉल चे प्रमाण शरीरात कमी ठेवते, शरीरात विषारी पदार्था चा अंमल कमी ठेवण्यास मदत करते, मधुमेहा पासून आपला बचाव करते, कैंसर, रक्तदाब, किडनी चे रोग, यकृत आणि आपली रोग प्रतिकारशक्ती ह्या सर्वांवर गुणकारी असतो गहू, अश्या ह्या गव्हाचे आपल्या अन्नात महत्वपूर्ण स्थान आहे.
जगात बर्याच ठिकाणी निरनिराळ्या प्रकारे गव्हाचा उपयोग होतो. गव्हाच्या पीठाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत.
मैदा :
- हे पीठ सर्व पीठांमध्ये सर्वाधिक वापरले जाते.
- हे गव्हाच्या कर्नलच्या एंडोस्पर्म नावाच्या बारीक भागापासून येते,
- हे कठोर आणि कोमल गव्हाच्या मिश्रणापासून बनविलेले आहे, म्हणूनच हा उद्देश सर्वांगीण आहे.
- या प्रकारचे पीठ सर्व प्रकारच्या बेकरी उत्पादनांसाठी सार्वभौमिकपणे वापरले जाऊ शकते – उदाहरण – यीस्ट ब्रेड, केक, कुकीज आणि पेस्ट्री.
पावाचे पीठ :
ब्रेड फ्लोअर प्रामुख्याने व्यावसायिक बेकिंग वापरासाठी दळले जाते, परंतु बर्याच किराणा दुकानात मिळू शकते. सर्व-हेतू पिठासारखे असले तरी त्यात ग्लूटेनचे प्रमाण जास्त आहे
केक फ्लोअर :
हे मऊ गव्हापासून मिसळलेले आणि बारीक रेशमी पीठ आहे आणि त्यात प्रथिने कमी असतात.
हे केक, कुकीज, फटाके, द्रुत ब्रेड आणि काही प्रकारचे पेस्ट्री ह्या सारखा माल तयार करण्यासाठी वापरला जाते
केक पीठामध्ये स्टार्चची टक्केवारी जास्त असते आणि ब्रेड पीठापेक्षा प्रोटीन कमी असते
पेस्ट्री फ्लोअर :
या प्रकारच्या पीठामध्ये गुणधर्म असतात जे मैदा आणि केक पीठाच्या दरम्यान असतात. हे सामान्यत: पेस्ट्री बनवण्यासाठी मऊ गव्हापासून बनवले जाते, परंतु कुकीज, केक्स, क्रॅकर्स आणि तत्सम बेक्ड उत्पादनांसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. त्यात केक पीठ आणि कमी स्टार्चपेक्षा प्रथिने सामग्री किंचित जास्त आहे.
रवा हे डुरम गव्हाचे खडबडीत ग्राउंड एन्डोस्पर्म आहे.
डुरम गहू गव्हाच्या सहा वर्गापैकी सर्वात कठीण प्रकार आहे आणि सर्व गहूमध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे, उच्च प्रतीचे पास्ता बनविण्यास ते आदर्श आहे आणि अमेरिकन आणि इटालियन दोन्ही उत्पादक वापरतात. हे अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेत तसेच अमेरिकेत डुरम गहू ब्रेडसाठी क्वचितच वापरला जातो.
डुरम फ्लोअर
डुरम पीठ रवा उत्पादनामध्ये एक उत्पादन आहे. हे सहसा चार बी जीवनसत्त्वे आणि लोहाने समृद्ध होते आणि नूडल्स तयार करण्यासाठी वापरला जातो.
गव्हाचे पीठ सर्व पीठांमधे सर्वात सामान्य आहे. आपल्या जवळ जवळ सर्व जेवणात याचा समावेश होतो . गव्हाचे पीठात फॉलिक आम्ल , जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6 आणि बी कॉम्प्लेक्स आणि मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त सारख्या अनेक खनिज पदार्थांचा समृद्ध स्रोत आहे.
आपल्या देशात चपाती मध्ये गव्हाचा प्रचंड प्रमाणात वापर केला जातो. चपाती काही ठिकाणी तिला रोटी किवा पोळी ही म्हणतात. गहू व त्यापासुन निघणार त्याच पीठ यापासून बनते ती चपाती.
गव्हाचे पीठ काही लोक बाहेर चक्की वर टाकतात तर काही लोक आयत गव्हाचे तयार बंद पाकीट आणतात…
जी लोक बाहेर चक्की वर पीठ करायला देतात त्यांना त्यांनी दिलेले पूर्ण गव्हाचे पूर्ण पीठ मिळाले का हा एक मोठा प्रश्न आहे? ह्याचे उत्तर प्रत्येकाने आप आपल्या अनुभवा प्रमाणे द्यावे.. आपण पीठ ज्याच्याकडे करायला दिल आहे त्या कडील स्वच्छता, भेळ मिसळचा अनुभव हा सर्वाना कमी जास्त प्रमाणात असतोच..
दुसरा पर्याय म्हणजे तयार बंद पीठच पाकीट, अस बोलाल जात जे आपण उगवतो तेच आपण खातो. तयार बंद पीठ बाजारात तस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे पण ते कोणत्या गव्हाचे आहे? किती जून आहे? ह्याची उत्तर कोणाला माहित नसतात. अस बोलतात आयत्या पीठाच्या चपात्या लुसलुशीत होत नाही त्या फुगत नाही. ह्या वर ही प्रत्येकाचे आप आपले अनुभव असतिल..
जुन्या काळात बायका ओव्या गात जात्यावर गहु भरडत.. आज काही आपण तस करू शकतं नाही पण काळाच्या ओघात जात्याची जागा आज मशीनी नी घेतली…
आज आपण आत्मनिर्भरता स्विकारली आहे.. बाहेर अनोळखी माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या घरात आपली स्वताची पीठ करायची मशीन घेण्याकडे लोकांचा भर असायला हवा .
घरात स्वतःची मशीन असण्याचे फायदे –
1) स्वतःच्या घरात स्वतःची मशीन असल्याने आपण आपल्याला हवं तेव्हा आपल्या सवडीने पीठ काढू शकतो
2) पीठ बाहेर दिल्यावर ते घरी पुन्हा आणण्यासाठी आपल्याला ती जड पिशवी उचलावी लागते हा त्रास आपली मशीन असल्यावर आपल्याला होणार नाही
3) पावसाळ्यात पीठ बाहेर करायला दिल की ते घरी आणे पर्यत ओल होण्याची भीती असते हा ही प्रश्न आपली मशीन असल्यावर सोडवायला जाईल
4)पीठ काढायची मशीन ही एक वेळ केलेली गुंतवणूक आहे.. जास्त काळ तिचा उपयोग तुम्ही करू शकता त्यामुळे ती तुम्हाला नफ्यात नेते
5)मशीन मध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने ती तीचे काम चोख आणि पटकन करते
6)काही मशीन ह्या ऑटो क्लीन असल्याने तिथे स्वच्छते ची जास्त गरज पडत नाही
7) आपण स्वत पीठ केल्याने कोणत्याही प्रकारची भेळ मिसळ होणार नाही. किवा दुसर्याचे गहु आपल्याला आपले गहू दुसर्याला हा ही प्रकार होत नाही.
आपण ह्या मशीन चे 3 मुख्य अश्या विभागणी करू शकतो
1) कमर्शियल चक्की मशीन
2) डोमेस्टिक चक्की मशीन
3) घर घटी चक्की मशीन
1) कमर्शियल चक्की मशीन –
ह्या प्रकारच्या मशीन मध्ये अंदाजे
3 हार्स पावॅर – 150 हार्स पावॅर ऊर्जा वापर होतो
काही स्वयंचलित तर काही अर्धी स्वयंचलित असतात
वोल्टेज चा वापर वापर ही अंदाजे 220 वोल्ट ते 440 वोल्ट पर्यंत होतो
2) डोमेस्टिक चक्की मशीन –
ह्या प्रकारच्या मशीन मध्ये अंदाजे
0 H. P – 4 H. P ऊर्जा वापर होतो
ह्या प्रकारच्या मशीन शक्यतो स्वयंचलित असतात तर काही अर्धी स्वयंचलित असतात
वोल्टेज चा वापर वापर ही अंदाजे 220 वोल्ट ते 240 वोल्ट पर्यंत होतो
3) घर घटी चक्की मशीन
ह्या प्रकारच्या मशीन मध्ये अंदाजे
1 H. P – 5 H. P ऊर्जा वापर होतो
ह्या प्रकारच्या मशीन शक्यतो स्वयंचलित असतात
वोल्टेज चा वापर वापर ही अंदाजे 220 वोल्ट पर्यंत होतो
(वर दिलेली महिती बदलूही शकते)
नेट वर बर्याच प्रकारच्या मशीन उपलब्ध आहेत त्या ही आपल्यालाला परवडतील अशा दरात
काही महिला हयाचा वापर करून आपला उदयोग ही चालू करु शकतात
अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे म्हणजेच गव्हाचे पीठ ही माणसाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक आहे.
त्यामुळे आपण घरच्या घरी पीठ काढण्याचा उद्योग सुरू करू शकतो.
हा उद्योग सुरू करण्यासाठी काही खास प्रशिक्षणची गरज नाही कोणतीही सामान्य गृहिणी हा उद्योग सुरू करू शकते
ह्या व्यवसायात भाग घेण्यासाठी सुरुवात करण्यासाठी चा तुमचा विचार ठरवतो की तुम्ही कोणत्या स्तरावर तुमचा उद्योग घेऊन जाणार…
जर तुम्हाला छोट्या स्तरावर आपला व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्हाला घर घटीं किवा डोमेस्टिक चक्की मशीन पासून सुरुवात करावी लागेल. ज्याची कीमत मशीन तुम्ही घेत असलेल्या कंपनी वर ठरते तरी अंदाजे 30,000 ते 35,000 रुपये पर्यन्त खर्च येऊ शकतो त्या शिवाय विजेचं बिल ह्याच ही खर्च होणार
आपण आपला व्यवसाय घरच्या घरी सुरू केल्याने घर भाडे लागत नाही व आपले व्यवसाय सुरू होतो .
मशीनीचा वापर कसा करावा??
पीठ करण्याची मशीनीचा वापर हा तिच्या प्रकारावर अवलंबून असतो काही मशीन आपण इंस्टॉल करतो तर काही प्री फिट असतात.
काही मशीन ह्याना खूप जागा लागते तर काही ना खूप कमी जागा घेतात
काही मशीन जास्त कचरा करत नाही तर काही करतात
एक मशीन दुसर्या मशीन पेक्षा वेगळी असते
तरी आपण काही सामान्य गोष्ठी समजून घेऊ
1) गव्हाचे धान्य एका भांड्यात घ्या, त्यात कोणत्याही दगड आणि वाळूच्या कण नाही ना ह्याची खात्री करा.
2) संपूर्ण धान्य खोलीच्या तापमानात अनिश्चित काळासाठी ठेवेल. गव्हाच्या 1 कप मधुन 1 3/4 कप पीठ तयार होऊ शकते (अंदाज़े)
3) हॉपरमध्ये गहू घाला
4) मशीन चालू केल्यावर आवाज येऊ लागेल, हॉपरमध्ये गहू टाकल्या ने त्याचे पीठ होणे आपोआप चालू होईल
5) आपल्या कडे असलेले सर्व धान्य आपण त्या हॉपर च्या सहाय्याने टाकून मशीन थांबण्याची वाट पहायची
6) मशीन थांबल्यावर मेन डोर आणि स्लाइड च्या बाहेर आपल पीठ काढायचे.
(तुम्ही घेत असलेल्या मशीन च्या मैन्युअल बुक मध्ये संपूर्ण प्रक्रिया लिहलेली असते तुम्ही त्या हिशोबाने तुमची मशीन वापरू शकता वर दिलेली माहिती एक नमूना आहे)