सुकन्या समृद्धी योजना मराठी 2022 : Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana | Sukanya Samriddhi Yojana in Marathi | Sukanya Samriddhi Yojana Maharashtra | सुकन्या समृद्धि योजना मराठी माहिती | sukanya samriddhi yojana interest rate | sukanya yojana in marathi | suknya yojna details | sukanya yojana details in marathi | sukanya samriddhi yojana information in marathi | सुकन्या योजना माहिती
केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक व पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवी च्या खूप साऱ्या फायदेशीर योजना राबविल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे
या योजनेनुसार आई वडील आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात व मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळते.
Sukanya Samriddhi Yojana Marathi
सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार द्वारा 22 जानेवारी 2015 साली माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “बेटी बचाओ बेटी पढाओ” या अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेली मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ही केंद्र सरकारची सर्वात कमी गुंतवणुकीची विशेष करून मुलींसाठी बचत योजना आहे मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर बचत योजना आहे.
या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना, सुकन्या समृद्धि खाते किंवा Sukanya Wealth Account या नावाने देखील ओळखले जाते.
मुलींचे आई-वडील एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्या बँक किंवा पोस्ट खात्याला सुकन्या समृद्धी योजना असे म्हणतात.
सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान २५०/- रुपये व अधिकतम १.५ लाख गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेता येतो.
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यापासून ते मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट मुलीच्या आई-वडिलांना दिली जाते.
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्या पासून फक्त १५ वर्षापर्यंत त्या खात्यात तुम्हाला पैसे भरायचे असतात पुढील 15 ते २१ वर्षापर्यंत या खात्यात पैसे भरायची गरज नसते या योजनेत ३५.२७ टक्के तुमची गुंतवणूक असते आणि ६४.७३ टक्के रक्कम व्याजाच्या स्वरूपात दिली जाते. कमी गुंतवणुकीच्या योजनांपैकी ही एकमेव अशी योजना आहे ज्यात तुम्ही फक्त 250/- रुपये गुंतवणूक करून त्याचा चांगला परतावा मिळू शकता.
नवीन अपडेट
आधी एका परिवारातील फक्त २ मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येत होता परंतु आता नवीन अपडेट अनुसार एकाच परिवारातील 3 मुली सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
विशेष सूचना: आम्ही सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी गरीब कुटुंबे असतील जे सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण सुकन्या समृद्धी योजना काय आहे, Sukanya Samriddhi Yojana उद्दिष्ट काय आहे, Sukanya Samriddhi Yojana Marathi वैशिष्ट्य काय आहेत, Sukanya Samriddhi Yojana Maharashtra फायदे काय आहेत, Sukanya Samriddhi Yojana in Marathi पात्रता काय आहे, Sukanya Samriddhi Yojana आवश्यक कागदपत्रे काय आहेत, Sukanya Samriddhi Yojana अर्ज करायची पद्धत, सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.
योजनेचे नाव | Sukanya Samriddhi Yojana Marathi |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार / पंतप्रधान नरेंद्र मोदी |
विभाग | महिला व बाल विकास विभाग |
कधी सुरू केली | 22 जानेवारी 2015 |
लाभार्थी | कुटुंबातील लहान मुली |
लाभ | आर्थिक सहाय्य |
उद्देश | मुलींच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे |
अर्ज करण्याची पद्धत | पोस्टाच्या माध्यमातून |
सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश्य
Sukanya Samriddhi Yojana Purpose
- मुलीचे शिक्षण,आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारण्याच्या उद्देशानं सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मुलींना भविष्यात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने या योजनेची शुरुवात करण्यात आली आहे.
- मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मुलींना भविष्यात सन्मानाने जगता यावे या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
- राज्यातील मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे
- भविष्यात मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये
Sukanya Samriddhi Yojana Features
- राज्यातील मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
- या योजनेचा कालावधी खाते उघडल्यापासून मुलीचे वय २१ वर्ष होईपर्यंत निर्धारित केला गेला आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी मुलीचे वय २१ वर्षे होईपर्यंत केला गेला असला तरी सुरुवातीच्या फक्त १५ वर्षांपर्यंतच योजनेअंतर्गत पैसे जमा करायचे आहेत.
- मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण होण्याअगोदरच जर मुलीचे लग्न झाले तर त्या मुलीला सुकन्या समृद्धी योजनेतुन रद्द केले जाईल व व सदर खाते बंद केले जाईल व या योजनेचा लाभ मुलीच्या पालकांना घेता येणार नाही.
- या योजनेअंतर्गत जमा रकमेवर टॅक्स भरावा लागत नाही.
- मुलीचे वय २१ वर्षे होऊन गेल्यावर सुद्धा जर लाभार्थी सुकन्या समृद्धी योजनेच्या बचत खात्यातून पैसे काढत नसेल तर त्या जमा रकमेवर सुद्धा व्याज दिले जाईल.
- मुलीचे वय १८वर्ष पूर्ण झाल्यावरच मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तसेच तिच्या आरोग्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून फक्त ५० टक्के रक्कम काढता येईल.
- सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान २५०/- रुपये भरणे आवश्यक आहे तसे न केल्यास सदर खाते बंद केले जाईल व खाते पुन्हा सुरू करण्यासाठी जितकी वर्षे खाते बंद असेल त्या प्रत्येक वर्षाला ५०/- रुपये दंड आकारून खाते पुन्हा सुरू केले जाईल.
- सुकन्या समृद्धी योजना १०० टक्के सुरक्षित योजना मानली जाते.
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा एखाद्या कारणामुळे मृत्यू झाल्यास जमा रक्कम व्याजा सकट लाभार्थ्याच्या पालकांना दिली जाते.
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे
Sukanya Samriddhi Yojana Benefits
- सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलीचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत होते.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास चांगला व्याजदर मिळतो.
- सुकन्या समृद्धी योजना एक अत्यंत कमी गुंतवणूक बचत योजना आहे.
- या योजनेत सरकारकडून पैशाची हमी दिली जाते.
- या योजनेत पैसे बुडण्याची शक्यता नाही.
- मुलीचे शिक्षण, मुलीचे आरोग्य, मुलीचे लग्न व तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक उत्तम बचत योजना आहे.
- देशातील प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ घेता येतो.
- कुटुंबातील प्रत्येक मुलीला सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो.
- कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून लाभ घेता येतो.
- जमा रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज दर मिळते.
- या योजनेचा कालावधी २१ वर्षाचा असला तरी लाभार्थ्याला फक्त १५ वर्षापर्यंत पैसे भरावे लागतात पुढील १५ ते २१ वर्षे पैसे भरावे लागत नाहीत.
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून फक्त १००/- रुपये प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करून सदर मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरवला जातो ज्यामुळे पालकाचा अपघात अथवा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या वारसाला किमान ३००००/- रुपये ते ७५०००/- रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
- आम आदमी विमा योजनेअंतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेअंतर्गत सदर मुलीला ६००/- रुपये शिष्यवृत्ती प्रति ६ महिने आठवी नववी दहावी अकरावी व बारावी इयत्तेत शिक्षक असताना दिली जाते.
- अनाथ मुलीला दत्तक घेतल्यास देखील सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
सुकन्या समृद्धी योजनेचे नुकसान
Sukanya Samriddhi Yojana Disadvantages
- या योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचा कालावधी खुप मोठा म्हणजे 21 वर्षाचा असतो.
- या योजनेअंतर्गत सध्या दिला जाणारा व्याजदर 7.6 टक्के आहे त्यामुळे खुप वर्ष गुंतवणूक करून सुद्धा कमी लाभ दिला जातो जो म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट मधे गुंतवणूक करून मिळणाऱ्या लाभापेक्षा पेक्षा कमी आहे.
- या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलीचे लग्न तिच्या 21 वर्षाच्या आत झाल्यास मुलीला या जोजनेचा लाभ घेता येत नाही व तीला या योजनेमधून रद्द केले जाते.
- या योजनेअंतर्गत अधिकतम गुंतवणूक 1.5 लाख आहे परंतु या पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास जास्त रकमेवर व्याज दिले जात नाही.
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व अटी
Sukanya Samriddhi Yojana Eligibility
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व अटी खालीलप्रमाणे आहेत.
- मुलीच्या जन्मापासून ती १० वर्षाची होईपर्यंत या कालावधीत सुकन्या समृद्धी योजना खाते उघडणे गरजेचे आहे म्हणजेच सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ फक्त १० वर्षाखालील मुलींनाच घेता येईल.
- जर एखाद्या कुटुंबात २ मुली असतील आणि दोन्ही मुलींना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सुकन्या योजनेच्या २ खाती उघडून याचा लाभ घेता येईल.
- मातेच्या दुसऱ्या प्रसूती वेळी जर जुळ्या किंवा तिळ्या मुली झाल्यास त्यांना ही सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.
- सुकन्या समृद्धी योजना खात्यात रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा कोअर बँकिंग सिस्टम च्या साह्याने पैसे भरता येतात.
- मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट पालकांच्या स्वाधीन केली जाते व सदर खाते बंद केले जाते.
- मुलीचे नाव न ठेवले गेले असल्यास आईच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना खाते उघडता येते ते पुढे जाऊन बदलून मुलीच्या नावावर करता येते.
- फक्त मुलींना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.
खालील परिस्थितीत सुकन्या समृद्धी योजना खाते बंद करता येईल
Sukanya Samriddhi Yojana Discontinued
- सुकन्या समृद्धी खाते उघडून ५ वर्षे पूर्ण झाल्यावर सदर खाते बंद करता येईल.
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास सदर खाते बंद करता येईल.
- लाभार्थी मुलीच्या पालकाचा मृत्यू झाल्यास सदर खाते बंद करता येईल.
- लाभार्थ्याला एखादा आजार झाल्यास सदर खाते बंद करता येईल.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Sukanya Samriddhi Yojana Documents Required
- मुलीच्या जन्माचा दाखला
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रेशन कार्ड
- विज बिल
- मुलीच्या आई-वडिलांचा फोटो रहिवासी प्रमाणपत्र
कागदपत्रांमध्ये काही कागदपत्रे हे मुलीच्या आईवडिलांचे असणे आवश्यक आहे जर मुलीचे आई-वडील नसतील तर अशा परिस्थितीत मुलीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्रे असणे आवश्यक असेल.
सुकन्या समृद्धी योजनेचे जुने व्याजदर
Sukanya Samriddhi Yojana Post Office Calculator
वर्ष | व्याजदर |
03.12.2014 TO 31.03.2015 | 9.1 |
01.04.2015 TO 31.03.2016 | 9.2 |
01.04.2016 TO 30.09.2016 | 8.6 |
01.10.2016 TO 31.03.2017 | 8.5 |
01.04.2017 TO 30.06.2017 | 8.4 |
01.07.2017 TO 31.12.2017 | 8.3 |
01.01.2018 TO 30.09.2018 | 8.1 |
01.10.2018 TO 30.06.2019 | 8.5 |
01.07.2019 TO 31.03.2020 | 8.4 |
01.04.2020 TO 30.12.2021 | 7.6 |
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दिला जाणारा व्याजदर
Sukanya Samriddhi Yojana Interest Rate
सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात २०१५ साली केली गेली त्या वेळी व्याजदर ९.१ टक्के होता. वर्तमान स्तिथीमध्ये हाच व्याजदर कमी होऊन ७.६ टक्के आहे म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढ-उतारावर सदर व्याजदर अवलंबून असतो.
सुकन्या समृद्धी योजनेच्या रकमेचे कॅल्क्युलेशन खालील प्रकारे केले जाते.
Sukanya Samriddhi Yojana Calculator
Year | Opening Balance | Deposit | Interest | Closing Balance |
1 | 0 | 5000 | 380 | 5380 |
2 | 5380 | 5000 | 789 | 11169 |
3 | 11169 | 5000 | 1229 | 17398 |
4 | 17398 | 5000 | 1702 | 24100 |
5 | 24100 | 5000 | 2212 | 31312 |
6 | 31312 | 5000 | 2760 | 39071 |
7 | 39071 | 5000 | 3349 | 47421 |
8 | 47421 | 5000 | 3984 | 56405 |
9 | 56405 | 5000 | 4667 | 66071 |
10 | 66071 | 5000 | 5401 | 76473 |
11 | 76473 | 5000 | 6192 | 87665 |
12 | 87665 | 5000 | 7043 | 99707 |
13 | 99707 | 5000 | 7958 | 112665 |
14 | 112665 | 5000 | 8943 | 126607 |
15 | 126607 | 0 | 9622 | 136230 |
16 | 136230 | 0 | 10353 | 146583 |
17 | 146583 | 0 | 11140 | 157723 |
18 | 157723 | 0 | 11987 | 169710 |
19 | 169710 | 0 | 12898 | 182608 |
20 | 182608 | 0 | 13878 | 196487 |
21 | 196487 | 0 | 14933 | 211420 |
सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरवर्षी ५०००/- रुपये गुंतवणूक केल्यास १४ वर्षांनी ७.६ टक्के व्याज दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने १२६६०७/- इतकी रक्कम मिळेल तर २१ वर्षाला एकूण २११४२०/- रुपये मिळतील.
तुम्ही जितकी जास्त रक्कम सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत गुंतवणूक कराल तितका जास्त परतावा तुम्हाला २१ वर्षानंतर मिळेल.
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांच्या यादी
Sukanya Samriddhi Yojana Bank List
खालीलीपैकी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत सुकन्या समृद्धी बँक खाते उघडता येते.
- इंडियन ओवसीज बँक Indian Overseas Bank
- इंडियन बँक Indian Bank
- आईडीबीआई बँक IDBI Bank
- आईसीआईसीआई बँक ICICI Bank
- देना बँक Dena Bank
- कॉर्पोरेशन बँक Corporation Bank
- सेंट्रल बैंक ऑफ इंडिया Central Bank of India
- केनरा बँक Canara Bank
- बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra
- बँक ऑफ इंडिया Bank of India
- बँक ऑफ बड़ौदा Bank of Baroda
- एक्सिस बँक Axis Bank
- आंध्रा बँक Andhra Bank
- इलाहाबाद बँक Allahabad Bank
- भारतीय स्टेट बँक State Bank Of India
- स्टेट बँक ऑफ मैसूर State Bank of Mysore
- स्टेट बँक ऑफ हैदराबाद State Bank of Hyderabad
- स्टेट बँक ऑफ त्रावणकोर State Bank of Travancore
- स्टेट बँक ऑफ बीकानेर आणि जयपुर State Bank of Bikaner and Jaipur
- स्टेट बँक ऑफ पटियाला State Bank of Patiyala
- विजया बँक Vijaya Bank
- यूनाइटेड बँक ऑफ इंडिया United Bank of India
- यूनियन बँक ऑफ इंडिया,
- यूको बँक Uco Bank
- सिंडिकेट बँक Syndicate Bank
- पंजाब नेशनल बँक Panjab National Bank
- पंजाब एंड सिंध बँक Panjab and Sind Bank
- ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स Oriental Bank of Commerce
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँकेत अर्ज करण्याची व खाते उघडायची पद्धत
Sukanya Samriddhi Yojana Application Process
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाउनलोड करायचा आहे किंवा आपल्या जवळच्या शाखेच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- सदर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी आणि सदर अर्ज बँकेत जमा करावा.
- बँकेकडून जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
- त्यानंतर सुकन्या योजनेचे खाते उघडण्यासाठी कमीत कमी २५०/- रुपये जमा करावे लागतील.
- पैसे जमा केल्यावर लाभार्थ्यांना बँकेकडून एक पासबुक दिले जाईल ज्यामध्ये खातेदाराला १५ वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतील.
- अशा प्रकारे बँकेच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज करण्याची व खाते उघडायची पद्धत.
Sukanya Samriddhi Yojana Registration By Post Office
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाउनलोड करायचा आहे किंवा आपल्या जवळच्या शाखेच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- सदर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी आणि सदर अर्ज पोस्टात जमा करावा.
- पोस्टाकडून जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
- त्यानंतर सुकन्या योजनेचे खाते उघडण्यासाठी कमीत कमी २५०/- रुपये जमा करावे लागतील.
- पैसे जमा केल्यावर लाभार्थ्यांना पोस्ट ऑफिस मधून एक पासबुक दिले जाईल ज्यामध्ये खातेदाराला १५ वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतील.
- अशा प्रकारे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.
Telegram Group | |
Sukanya Samriddhi Yojana Official Website | क्लिक करा |
सुकन्या समृद्धी योजनेसाठी पोस्टाचा अर्ज | क्लिक करा |
सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज | क्लिक करा |
सुकन्या समृद्धी योजनेचा शासन निर्णय | क्लिक करा |
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
Q 1. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत कमीत कमी किती रक्कम भरावी लागते?
Ans: सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत प्रतिवर्षी कमीत कमी २५०/- रुपये भरावे लागतात.
Q 2. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत जास्तीत जास्त किती रक्कम भरावी लागते?
Ans: सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत जास्तीत जास्त १.५ लाख रुपये भरावे लागतात.
Q 3. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत ठेवीचा कालावधी किती आहे?
Ans: सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत ठेवीचा कालावधी २१ वर्षाचा आहे?
Q 4. सुकन्या समृद्धी योजनेमधून जमा पैसे कधी काढता येतात?
Ans: मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर सदर रकमेतून फक्त ५० टक्के रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा मुलीला एखादी आरोग्य समस्या झाल्यास काढता येते.
Q 5. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत कर्ज घेता येते का?
Ans: सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत कर्ज घेता येत नाही.
Q 6. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद झाल्यास किती दंड आकारला जातो?
Ans: सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद झाल्यास प्रतिवर्षी ५०/- रुपये दंड आकारला जातो.
सारांश
आशा करतो कि सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले सुकन्या समृद्धी योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.