पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना | मिळणारे लाभ आणि अर्ज करायची पद्धत
आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण या जाणून घेणार आहोत कि पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना काय आहे, पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेचे उद्दिष्ट,, पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची वैशिष्ट्य काय आहे, पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची वयोमर्यादा काय आहे, पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत विमाधारकाला मिळणार फायदा काय आहे, पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेसाठी पात्रता काय आहे, पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत,संपर्क क्रमांक, पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेसाठी अर्ज करायची पद्धत तसेच पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल जाणून घेणार आहोत.
योजनेचे नाव | पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना |
योजनेचे उद्दिष्ट | संपूर्ण जीवन हमी योजना |
वय मर्यादा | १९ ते ५५ वर्षे |
योजनेची सुरवात कोणी केली | भारतीय पोस्ट ऑफिस |
लाभार्थी | ग्रामीण भागातील नागरिक |
आधिकारीक वेबसाईट | www.postallifeinsurance.gov.in |
Post Office Gram Suraksha Yojana
भारतीय पोस्ट ऑफिस त्यांच्या ग्राहकांसाठी काही ना काही बचत योजना राबवत असतात तसेच पोस्टात गुंतवलेले पैसे नेहमी सुरक्षित मानले जातात व सरकार याची हमी सुद्धा देते त्यामुळे ग्राहकांचा सुद्धा पोस्टाद्वारे राबविलेल्या योजनांना चांगला प्रतिसाद असतो.
त्यामुळे भारतीय पोस्ट ऑफिस ने ग्राहकांसाठी एक नवीन पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची सुरवात केली आहे हि एक विमा योजना आहे
या योजनेअंतर्गत ग्राहक रोज ५० रुपये जमा करून ३५ लाख रुपयांचा निधी उभारू शकतात.या योजनेची दरमहा गुंतवणूक १५००/- रुपये इतकी आहे या योजनेअंतर्गत भरला जाणारा प्रीमियम मासिक,त्रैमासिक,सहामाही किंवा वार्षिक पद्धतीने भरला जाऊ शकतो.जर प्रीमियम भरण्यासाठी विलंब झाल्यास प्रीमियम भारण्यावर ३० दिवसांची सवलत मिळू शकते.
वय १९ ते ५५ वर्षापर्यंतच्या कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा फायदा घेऊ शकतो.या योजने अंतर्गत किमान विमा रक्कम १० हजार रुपये इतकी आहे व अधिकाधिक विमा रक्कम १० लाख रुपये इतकी आहे.
या योजनेचा महत्वाचा फायदा म्हणजे या योजनेअंतर्गत बोनस दिला जातो म्हणजेच १ लाखाच्या विमा रकमेवर १ वर्षाचा बोनस ६०००/- रुपये इतका दिला जातो.
या योजनेअंतर्गत डेथ बेनेफिट व्यतिरिक्त मॅच्युरिटी चे पैसे देखील दिले जातात आणि या दोन्ही फायद्यामध्ये बोनस लाभ देखील दिला जातो.
या योजनेला जीवन विमा योजना असे देखील म्हणतात कारण विमाधारक जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पॉलिसी चा फायदा लाभार्थ्याला मिळतो.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची वैशिष्ट्ये :
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक केल्यास विमाधारकाला ३१ ते ३५ लाखांपर्यंतचा निधी उभारता येऊ शकतो.
या योजने अंतर्गत विमाधारकाला कर्जसुद्धा घेता येते परंतु विमाधारकाला पॉलिसी खरेदी केल्यानंतर ४ वर्षानंतरच कर्ज मिळू शकते.
या पॉलिसी चे वैशिष्ट्य म्हणजे विमाधारकाच्या मृत्यूनंतर नामांकित/वारसा व्यक्तीला म्यॅच्युरिटी वर लाभ दिला जातो किंवा विमाधारकाची ८० वर्षे पूर्ण झाल्यावर त्याला म्यॅच्युरिटी लाभ मिळतो या योजनेअंतर्गत म्यॅच्युरिटी वायोमर्यादा ५०,५५,५८ ६० वर्षे आहे
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत विमाधारकाला मिळणार फायदा
जर एखादी व्यक्ती वयाच्या १९ व्या वर्षी १० लाखाची पॉलिसी सुरु करत असेल तर त्या विमाधारकाला
Maturity Age | Premium Payment Term | Your Age | Monthly Premium | Total Bonus | Maturity Amount |
80 | 36 | 55 | 1,515 | 21,60,000 | 31,60,000 |
80 | 39 | 58 | 1463 | 23,40,000 | 33,40,000 |
80 | 41 | 60 | 1411 | 24,60,000 | 34,60,000 |
म्हणजेच विमाधारकाला दिवसाला फक्त ५०/- रुपये भरून वयाच्या ६० वर्षी ३५ लाख रुपये मिळू शकतील.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची वैशिष्ट्ये
post office gram suraksha yojana features
- देशातील/महाराष्ट्रातील फक्त ग्रामीण क्षेत्रातील नागरिकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेअंतर्गत पॉलिसी सुरु झाल्यावर विमाधारकाला लगेच विमा सुरक्षा सुरु होते.
- या योजने अंतर्गत विमाधारकाला बोनस रक्कम सुद्धा दिली जाते.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी मेडिकल चाचणी अनिवार्य आहे परंतु जर एखाद्या लाभार्थ्याला मेडिकल चाचणी करायची नसल्यास या योजनेमधून दिली जाणारी रक्कम २५०००/- रुपये आणि अधिकतम वय मर्यादा ३५ वर्षे लागू राहील.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेचे लाभ
post office gram suraksha yojana benefits
- या योजनेअंतर्गत विमाधारकाला कर्ज,आत्मसमर्पण आणि रूपांतराची निवड करण्याची संधी दिली जाते.
- या योजनेअंतर्गत विमाधारकाचे संपूर्ण आयुष्य सुरक्षित होते.
- या योजनेद्वारे विमाधारकाला बोनस सुद्धा दिला जातो.
- या योजनेद्वारे आकारले जाणारे प्रीमियम कमी आहे जे सर्व सामान्य गरिबांना परवडणारे आहे.
- या योजनेचा लाभ भारतात कुठेही आणि कोणत्याही पोस्ट ऑफिस मधून सहजपणे घेता येतो.
- या योजनेअंतर्गत भरला जाणारा प्रीमियम मासिक,त्रैमासिक,सहामाही किंवा वार्षिक भरण्याची सुविधा विमाधारकाला दिलेली आहे.
- मृत्यू लाभ : पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाला मृत्यू झाल्यास नॉमिनीला/वारसास मृत्यू लाभ दिला जातो.
- म्यॅच्युरिटी बेनेफिट : म्यॅच्युरिटीवर विमाधारकाला विम्याची रक्कम आणि जमा झालेला बोनस दिला जातो.
- या योजनेअंतर्गत न भरलेला प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी पुन्हा चालू केली जाऊ शकते.
- या योजने अंतर्गत नामांकन/वारस सुविधा उपलब्ध आहे.
- या योजनेअंतर्गत ३६ महिन्यांसाठी प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी सरेंडर करण्याची सुविधा विमाधारकाला या योजने अंतर्गत दिलेली आहे.
- या योजनेअंतर्गत वाढीव कालावधी म्हणून देय प्रीमियम भरण्यासाठी विमाधारकाला ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो.
- विमाधारकाने ४८ महिन्यांसाठी प्रीमियम भरल्यानंतर या योजनेअंतर्गत आयकर कायदा १९६१ अंतर्गत कलम 80C आणि कलम 88 अंतर्गत विमाधारकाला कर लाभ दिला जातो.
- या योजनेअंतर्गत कमी जोखीम आणि जास्त फायदा मिळतो.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची पात्रता
post office gram suraksha yojana eligibility
- लाभार्थ्यांचे किमान वय १९ वर्षे असणे आवश्यक आहे व अधिकाधिक वय ५५ वर्षे असणे आवश्यक.
- ५५ वर्षावरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- लाभ घेऊ इच्छिणारा व्यक्ती भारताचा नागरिक असणे आवश्यक.
- हि योजना फक्त ग्रामीण भागातील नागरिकांसाठीच सुरु करण्यात आली आहे.
- शहरी भागात राहणारी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
post office gram suraksha yojana documents
- १ पासपोर्ट आकाराचा फोटो
- विमाधारकाचे जन्माचे प्रमाणपत्र (जन्माचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड)
- महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी दाखला.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- वीज बिल
- घरपट्टी पावती
- मेडिकल चाचणी प्रमाणपत्र
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेसाठी संपर्क
post office gram suraksha yojana helpline
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनांतर्गत काही समस्या असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता
टोल फ्री क्रमांक : १८००-१८०-५२३२ / १५५२३२
आधिकारीक वेबसाईट : www.postallifeinsurance.gov.in
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेसाठी अर्ज करायची पद्धत
post office gram surksha yojana application process
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सादर योजनेचा फॉर्म घ्यावा व तो भरून योग्य ती कागदपत्रे जोडून जमा करावा.किंवा पोस्ट ऑफिस ची आधिकारीक वेबसाईट www.postallifeinsurance.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा.