वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना 2022 | Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana

 

वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना 2022 | Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana


Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana | Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana Maharashtra | Virbhadrakali Tararani Swayamsiddha Scheme | Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana Marathi | वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना | वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना महाराष्ट्र


महाराष्ट्र शासन राज्यातील ग्रामीण भागातील गरीब महिलांना समृद्ध व आत्मसन्मानाचे  सुरक्षित जीवन जगता यावे तसेच महिलांचे अधिकार व हक्क, विविध विधी वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी विविध सरकारी योजना राबवित असते. त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana आहे.

Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana

कोरोना विषामुमुळे  निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या काळात महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागात अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषाला स्वतःचे  प्राण गमवावे लागले त्यामुळे कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे राज्य शासनाने ग्रामीण भागात कोणाच्या काळात ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडला आहे अशा कुटुंबातील विधवा महिलांसाठी उत्पन्नाची साधने निर्माण व्हावीत व त्यांची उपजीविका सन्मानजनक व्हावी तसेच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा व तातडीने मदत व्हावी या गोष्टीचा विचार करून 2 नोव्हेंबर 2019 रोजी वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याची घोषणा केली. 

विशेष सूचना: आम्ही वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात अशा कोणी महिला असतील ज्या वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना काय आहे, Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana उद्दिष्ट काय आहे, Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana वैशिष्ट्य काय आहेत, वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेअंतर्गत मिळणारे फायदे काय आहेत, Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana पात्रता काय आहे, Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana आवश्यक कागदपत्रे काय आहेत, Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana अर्ज करायची पद्धत, वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

योजनेचे नाव Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana
राज्यमहाराष्ट्र
योजनेची सुरवात २ नोव्हेंबर २०२१ 
विभाग ग्राम विकास विभाग 
योजना सुरु केली केंद्र सरकार / राज्य शासन 
लाभार्थी विधवा व एकल महिला
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

virbhadrakali-tararani-swayamsiddha-yojana

वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेचा उद्देश

Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana purpose

ज्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा कोरोणामुळे मृत्यू झाला आहे त्या कुटुंबावर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे अशा कुटुंबांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी त्या कुटुंबातील विधवा महिलांना उत्पन्नाची साधने निर्माण व्हावीत व त्यांच्याकडे रोजगाराच्या संधी निर्माण होऊन त्या माध्यमातून त्यांची उपजीविका व्यवस्थित सुरू रहावी हा उद्देश समोर ठेवून वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा ही योजना शासनाने सुरू केली. 

वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेची वैशिष्ट्ये

Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana Features

  • Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्या सहयोगाने सुरु करण्यात आलेली महिलांसाठी एक उपयुक्त अशी योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिला आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेअंतर्ग लाभार्थी महिलांना विविध प्रकारे लाभ देण्यात येईल.
  • या योजनेअंतर्गत महिलांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेचे फायदे

Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana Benefits

  • ज्या महिलांचे पती कोरणामुळे मृत्यू पावले आहेत अशा विधवा महिलांना वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे मदत केली जाणार आहे
  • कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्यामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी आर्थिक समावेशन विषयक उपक्रम राबविण्यात येतील 
  • गावातील एकल/विधवा महिलांना स्वयंसहायता समूहामध्ये प्राधान्याने समावेश करण्यात येईल
  • विधवा/एकल महिलांना रिजर्व बँक ऑफ इंडिया यांच्या नियमावलीनुसार किमान पाच विधवा/ एकल महिला सदस्यांचा स्वतंत्र स्वयंसहाय्यता समूह विशेष स्वयं सहायता समूह स्थापन करून त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभ उपलब्ध करून देण्यात येतील.
  • या योजनेअंतर्गत महिला सदस्यांना फिरता निधी तसेच समुदाय गुंतवणूक निधी अदा करण्यात प्राधान्य दिले जाईल
  •  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता समूहातील सदस्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना विविध सामाजिक सुरक्षा योजनेत समाविष्ट करून घेण्यात येईल
  •  सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये (PMJJBY, PMSBY, APY)एकल/विधवा महिलांना प्रथम प्राधान्याने समाविष्ट करण्यात येईल
  • एकल विधवा महिलांना PMJJBY व PMSBY योजनेचे रुपये 342/- निधी भरण्यासाठी आर्थिक अडचणी असल्यास स्वयंसहायता समूहातील उपलब्ध निधीतून सदर महिलांना 350/- रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेतल्यानंतर दुर्दैवाने काही घटना घडल्यास जिल्हास्तरावरून सदर महिलांना लवकरात लवकर दाव्याची रक्कम देण्यात येईल.
  •  एकल विधवा महिलांना प्रथम प्राधान्य देऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा योजनेचा लाभ देण्यात येईल
  •  एकल विधवा महिला ज्या स्वयंसहाय्यता समूहामध्ये आहेत अशा समूहांना प्रथम प्राधान्य देऊन बँक पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात येईल
  • कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्यामुळे एकल/विधवा झालेल्या महिलांना त्यांचे आरोग्य शिक्षण अन्नसुरक्षा इत्यादी कारणासाठी जोखीम प्रवणता निधी प्राधान्याने वितरित करण्यात येईल.

दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत एकल विधवा महिलांना प्रशिक्षण

Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana

 महाराष्ट्र राज्यातील कोरोनाणामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या कुटुंबातील 18 ते 45 वयोगटातील एकल विधवा महिलांना आणि त्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील युवक-युवती यांना दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या अंतर्गत प्रथम प्राधान्य देऊन कौशल्य विषयक निवासी प्रशिक्षण देण्यात येईल

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण

Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana

 ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे ज्या घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेले आहे अशा कुटुंबातील एकल/विधवा महिलांना तसेच त्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील युवक-युवतींना स्वयंरोजगार आधारित 10 ते 45 दिवसांचे कृषी विषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग विषयी प्रशिक्षण, उत्पादन विषयक प्रशिक्षण व सामान्य उद्योजकता प्रशिक्षण अशा विविध व्यवसायांचे शेती व बिगर शेती व्यवसायाचे मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेमार्फत कर्ज पुरवठा करण्यासाठी आर्थिक साहाय्य केले जाईल.

उन्नत योजना

Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana Maharashtra

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत किमान 100 दिवस काम केलेल्या लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाने उन्नती योजना सुरु केली आहे या योजनेअंतर्गत सन 2018 ते 2019 या कालावधीत किमान 100 दिवस काम केलेल्या 18 ते 45 वयोगटातील लाभार्थ्यांना दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDUGKY),ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETIS),कृषी विज्ञान केंद्राच्या(KVK), माध्यमातून कौशल्य विषयक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उपस्थिती भत्ता देखील देण्यात येईल.

महाराष्ट्र राज्यातील कोणामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेले आहे अशा कुटुंबातील विधवा महिलांना या योजनेच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार आधारित प्रशिक्षण देताना प्रथम प्राधान्य देण्यात येईल

अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये एकल विधवा महिलांना प्राधान्य

Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana Marathi

 महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या कुटुंबातील एकल/विधवा महिलांना PMFME योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगात छोटी उपकरणे व खेळते भांडवल याकरिता प्रति सदस्य रुपये 40000/- बीज भांडवल देण्यात येईल.

वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेसाठी आवश्यक पात्रता

Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana Eligibility

  • वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील फक्त विधवा आणि एकल महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेच्या अटी

Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana Terms & Condition

  • वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिला विधवा किंवा तिचा घटस्फोट झालेला असणे आवश्यक आहे.
  • वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिलेकडे तिच्या पतीचा मृत्यूचा दाखला असणे गरजेचे आहे तसेच घटस्फोटित महिलेकडे न्यायालयीन आदेश असणे गरजेचे आहे.
  • वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिलेचे वय १८ वर्ष ते ४५ वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • ४५ वर्षावरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana application process

वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्राच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व या योजनेचा अर्ज घ्यावा.
अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य कागदपत्रे जोडावीत व सादर अर्ज जमा करावा.
अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

ग्रामीण क्षेत्र: जर अर्जदार ग्रामीण क्षेत्रात राहत असेल तर त्याला त्याच्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क करावा लागेल.
शहरी क्षेत्र: जर अर्जदार शहरी भागात राहत असेल तर त्याला त्याच्या क्षेत्राच्या महानगर पालिका कार्यालयात जाऊन महिला व बाल कल्याण विभागात जाऊन संपर्क करावा लागेल.

महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईटClick Here
शासन निर्णयClick Here
Telegram GroupJoin

Post a Comment

Previous Post Next Post