महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2022 : Maharashtra Berojgari Bhatta Yojana
Maharashtra Berojgari Bhatta Yojana | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना | Maharashtra Berojgari Bhatta | Berojgari Bhatta Yojana Maharashtra | Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2022 | Berojgari Bhatta | Berojgari Bhatta Maharashtra | सुशिक्षित बेरोजगार योजना महाराष्ट्र | berojgar yojana maharashtra | बेरोजगार भत्ता विषयी माहिती | सुशिक्षित बेरोजगार योजना
Maharashtra Berojgari Bhatta Yojana
महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील बेरोजगार युवकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते.त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Maharashtra Berojgari Bhatta Yojana आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना आर्थिक सहाय्य केले जाते.
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश युवक हे सुशिक्षित आहेत परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकऱ्या उपलब्ध नसल्या कारणामुळे ते बेरोजगार आहेत.तसेच राज्यात बहुतांश परिवार हे गरिबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत त्यामुळे अशा परिवारातील बेरोजगार युवक इच्छा असून सुद्धा आर्थिक अडचणींमुळे स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकत नाहीत. घरची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असल्याकारणामुळे व त्यात त्यांना नोकरी नसल्याकारणामुळे त्यांना मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने Maharashtra berojgari bhatta yojana सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार मुलांना प्रति महीने ५०००/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते जेणेकरून बेरोजगार युवकांना नोकरी मिळेपर्यंत त्यांना त्यांचा दैनंदिन खर्च पूर्ण करता येईल व नोकरी शोधण्यासाठी देखील मदत होईल. राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करणे आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
ज्या बेरोजगार युवकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
विशेष सूचना: आम्ही महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी बेरोजगार युवक असतील जे महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना काय आहे, Maharashtra Berojgari Bhatta Yojana उद्दिष्ट काय आहे, Maharashtra Berojgari Bhatta Scheme वैशिष्ट्य काय आहेत, Maharashtra Berojgari Bhatta Yojana फायदे काय आहेत, Berojgari Bhatta Yojana Maharashtra पात्रता काय आहे, Maharashtra Berojgari Bhatta Yojana आवश्यक कागदपत्रे काय आहेत, Maharashtra Berojgari Bhatta Yojana अर्ज करायची पद्धत, महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.
योजनेचे नाव | Maharashtra Berojgari Bhatta Yojana |
योजनेची सुरुवात | २०२० |
योजनेची सुरुवात कोणी केली | महाराष्ट्र राज्य शासन |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार |
बेरोजगारी भत्ता रक्कम | ५०००/- रूपये प्रति महिना |
योजनेचा उद्देश | सुशिक्षित बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करणे. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेची उद्दिष्ट्ये
Maharashtra Berojgari Bhatta Yojana
- महाराष्ट्र राज्यात सुशिक्षित युवकांना रोजगार नाहीत त्यामुळे ते बेरोजगार आहेत ह्या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची सुरवात केली.
- या योजनेअंतर्गत जो पर्यंत बेरोजगार युवकाला एखादी नोकरीं मिळत नाही तोपर्यंत त्यांना बेरोजगारी भत्ता दिला जाईल.
- या योजनेचा मुख्य उद्देश बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करणे आहे.
- या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांना आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यातील बेरोजगार युवकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
- राज्यातील बेरोजगार युवकांचे जीवनमान सुधारणे
- राज्यातील युवकांना आर्थिक सहाय्य करणे
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे वैशिष्ट्ये
Maharashtra Berojgari Bhatta Yojana
- महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे.
- या योजनेच्या सहाय्याने राज्यातील बेरोजगार युवक आत्मनिर्भर बनतील.
- महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या सहाय्याने बेरोजगार युवकांना स्वतःच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेच्या अंतर्गत मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
- महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी बेरोजगार युवकांना कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही कारण युवक आपली मोबाईल च्या सहाय्याने थेट शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतो.त्यामुळे युवकांचा पैसे आंही वेळ दोन्हीची बचत होईल.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत मिळणार लाभ
Mahrashtra Berojgari Bhatta Yojana Benefits
- महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत बेरोजगार युवकास प्रति महिना ५०००/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
- महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेमुळे महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना याचा आर्थिक फायदा होणार आहे.
- या योजनेअंतर्गत बेरोजगार युवकास प्रति महिना ५०००/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
- बेरोजगार भत्ता योजनेची आर्थिक मदत बेरोजगाराच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते.
- जो पर्यंत युवकास नोकरी मिळत नाही तो पर्यंत त्यास बेरोजगारी भत्ता प्रदान केला जातो.
- या योजनेच्या मदतीने बेरोजगार युवक स्वतःचा दैनंदिन खर्च पूर्ण करू शकतो.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पैशाच्या सहाय्याने युवकास नवीन नोकरीसाठी प्रवास खर्च तसेच अर्ज भरण्यासाठी मदत होईल.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी आवश्यक पात्रता
Maharashtra Berojgari Bhatta Yojana Eligibility
अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या अटी
Maharashtra Berojgari Bhatta Yojana Terms & Condition
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे उत्पन्नाचे इतर कोणते साधन असता कामा नये.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय २० वर्ष ते ३५ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांचे नाव Employment Office मध्ये रजिस्टर असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारी व्यक्ती कमीत कमी इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखाच्या वर नसावे.
- अर्ज करणारी व्यक्ती कोणत्याही शासकीय अथवा खाजगी क्षेत्रात कार्यरत नसावी. (अर्जदार बेरोजगार असावा.)
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Maharashtra Berojgari Bhatta Yojana Documents
- अर्जदाराकडे स्वतःचे आधारकार्ड असणे आवश्यक.
- अर्जदाराकडे स्वतःचे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक.
- पॅन कार्ड
- अर्जदार 15 वर्ष महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक (प्रमाणपत्र आवश्यक)
- अर्जदाराचे जन्म प्रमाणपत्र.
- अर्जदाराचे वयाचे प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला)
- अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न ३ लाखाच्या आत असणे आवश्यक)
- अर्जदाराच्या शिक्षणाचा दाखला ( किमान १२ वी उत्तीर्ण )
- अर्जदाराचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक ( बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न असणे आवश्यक )
- अर्जदाराचा मोबाईल क्रमांक
- अर्जदाराचा अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो
- अर्जदाराचा ई-मेल
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे एखादा कोर्स पूर्ण केला असल्याची डिग्री (प्रमाणपत्र) असता कामा नये असे आढळल्यास त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल.
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
Maharashtra Berojgari Bhatta Yojana Online Registration
- सर्वात आधी अर्जदाराला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटच्या Home Page वर नोकरीच्छूक उमेदवार लॉग-इन दिसेल त्यात तुम्हाला नोंदणी वर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक नवीन Page Open होईल त्यात विचारलेली सर्व माहिती ( अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेल इत्यादी ) भरायची आहे.
- विचारलेली सर्व माहिती भरून झाल्यावर Next बटनावर क्लिक करायचं आहे.
- आता आपल्या मोबाईलवर एक OTP येईल तो भरुन Submit बटनावर क्लिक करायच आहे.
- अशा प्रकारे आपली महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Grouup | Join |
शासनाची अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Helpline Number | 022-22625651/53 |
helpdesk@sded[dot]in |