नैसर्गिक शेतीसाठी आता मिळणार हेक्टरी 27 हजार रु. अनुदान : Organic Farming Subsidy Scheme
शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती राज्यांमध्ये कमी फार प्रमाणात जरी केली जात असली, तरी नैसर्गिक शेतीचा फायदा बहुतांश शेतकऱ्यांना होताना दिसून येतो; परंतु मोठ्या प्रमाणावर शेतकरी याकडे दुर्लक्ष करून रासायनिक शेतीकडे वळतात, कालांतराने याचा परिणाम उत्पन्नामध्ये, आरोग्यामध्ये दिसून येतो.
नैसर्गिक शेतीसाठी अनुदान मिळणार
नैसर्गिक शेतीमध्ये शेणखत, गांडूळखत यासारख्या विविध नैसर्गिक खतांचा वापर केला जातो; म्हणून नैसर्गिक शेती परवडण्याजोगी नसते; आता हीच बाब लक्षात घेऊन नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आलेला आहे.
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी नैसर्गिक शेती करतात; परंतु त्यांना चालना देण्यासाठी शासनाची कोणत्याही प्रकारची योजना अद्याप अस्तित्वात नाही. हाच विचार करून शासनाकडून नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 27 हजार रु. अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
2550 समूह तयार करण्यात येणार
केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानात राज्यातील कृषी विभागाने सहभाग घेतलेला असून यासाठीची जय्यत तयारी विभागामार्फत केली जात आहे. मार्च अखेर आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच येत्या एप्रिल 2023 पासून या अभियानाची सुरुवात होईल.
प्रत्येक जिल्ह्यासाठी एक निश्चित उद्दिष्ट कृषी विभागामार्फत ठरविण्यात येईल. यासाठी 2550 समूह तयार करण्यात येतील, ज्यामुळे सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, अशी माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे.
नैसर्गिक शेती अभियान खालीलप्रमाणे असेल
- नैसर्गिक शेती अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे समूह तयार करण्यात येतील ज्यामध्ये 50 हेक्टर क्षेत्राचा समावेश असेल.
- यामध्ये सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्याला तीन वर्षांमध्ये 3 वर्षामध्ये 27 हजार रुपयांची मदत शासनाकडून देय असेल.
- नैसर्गिक शेतीमध्ये सहभाग घेतल्यानंतर शेती मशागत करत असताना बाहेरील कोणतीही निविष्ठा वापरता येणार नाही.
- नैसर्गिक शेतीसाठी जास्तीत जास्त देसी गाय, म्हैस इत्यादीच्या शेणखताचा वापर गोमूत्राचा वापर करण्यात यावा.
- सेंद्रिय शेतीसाठी जिवाणूंच्या अधिक-अधिक वाढीवर भर देणे हा अभियानाचा उद्देश असेल.
- शेतातील जमिनीचा सेंद्रिय दर्जा सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार.
- नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतातील काडी, कचरा, पाला इत्यादीचा वापर केला जातो, त्यामुळे असा अपव्यय कचरा जमिनीत मुरण्यास मदत होईल.
नैसर्गिक शेती प्रक्रियेमध्ये घेण्यात आलेल्या पिकांची, फळ भाज्यांची चव वेगळीच असते. नैसर्गिक शेतीतील अशी फळभाजी, पिके आरोग्यासाठी एकदम योग्य असतात. त्यामुळे वैयक्तिक शेतकरी व शासन सेंद्रिय शेतीकडे हल्ली जास्त लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून येत आहे.