औरंगाबाद येथे विविध क्षेत्रातील ११८८ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ११८८ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी आपले ऑनलाईन नाव नोंदणी करून मुलाखतीसाठी शनिवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी ‘शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्टेशन रोड, औरंगाबाद’ येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.