Bandhkam kamgar safety kit | कामगारांना मिळताहेत मोफत पेट्या करा अर्ज

Bandhkam kamgar safety kit | कामगारांना मिळताहेत मोफत पेट्या करा अर्ज



चार भिंतींच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राबणाऱ्या कामगारांचीही सुरक्षाही तितकीच महत्वाची असल्याची उपरती राज्य सरकारला झाली आहे. या कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर बांधकाम कामगारांना बूट, धुळीपासून संरक्षण करण्यासाठी तोंडाला डस्ट मास्क, डोक्यासाठी सेफ्टी हेलमेट पुरवण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांना सेफ्टी किट दिले जाणार आहे.


राज्यातील शहरीकरण झपाट्याने होत आहे. शहरांकडे नागरिकांचे स्थलांतरीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहे. या इमारती उभ्या करण्यासाठी हजारो कामगार दररोज काम करत असतात. या इमारतींच्या बांधकामासाठी लागणारा कच्चा माल तयार करण्याच्या उद्योगांतही हजारो कामगार काम करत आहे. या कामगारांच्या सुरक्षेसाठी काय खबरदारी घेणे गरजेचे आहे याबाबत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम २००७ अंतर्गत नियम आहे. मात्र या नियमांची कुठेच अंमलबजावणी होत नाही. बिल्डर मंडळींनीही सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवले आहे. कामगारांच्या सुरक्षेची काहीच काळजी त्यांच्याकडून घेतली जात नाही. त्यामुळे कामगारांची सुरक्षितता कायमच दुर्लक्षित राहिल्याचे निदर्शनास आल्याने यात बदल करण्याची सुरुवात कामगार विभागाने केली आहे.


बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांना सेफ्टी किट दिल्या जाणार आहेत. यासाठी सरकारी कामगार अधिकाऱ्यांकडे किट मागणी अर्ज कामगारांना करावा लागणार आहे. अर्ज आल्यनंतर अधिकारी किटचे वाटप करतील. किट पुरवण्याबाबत ई टेंडरींग प्रक्रिया राबवण्याच्या सूचना आहेत. टेंडर प्रसिद्ध करुन संस्थेची निवड करावी लागणार आहे. संस्थेची निवड झाल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्तांनी प्रमाणित केलेल्या कामगारांच्या यादीनुसार किटचे वाटप होणार आहे.

Bandhkam kamgar safety kit

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना जे सुरक्षा संच safety kit मिळत आहे त्यामध्ये त्यामध्ये खालील साहित्य कामगारांना मिळते.

एक पत्र्याची मोठी पेटी असते आणि त्यामध्ये खलील साहित्य मिळते.

  • इमारतीवर काम करतांना लटकण्यासाठी लागणारा बेल्ट.
  • पाठीवर अडकवली जाणारी बॅग.
  • पाणी पिण्यासाठी लागणारी बॉटल.
  • काम करतांना घालण्यासाठी लागणारे जॅकेट.
  • हेल्मेट.
  • हातमोजे ( Hand Gloves ).
  • जेवणासाठी ४ कप्प्यांचा डबा.
  • सोलर टॉर्च.
  • सोलर चार्जर.
  • पायात घालण्यासाठी बूट.
  • मच्छरदाणी जाळी.
  • चटई ( mat )

बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Documents for Bandhkam Kamgar Yojana 

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्हाला अर्ज करताना काही कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे जोडून अर्ज हा सादर करावा लागतो. bandhkam kamgar yojana


१)वयाचा पुरावा(वय वर्ष १८-६०)

२) कामगार म्हणून 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

३)गावचा रहिवासी असल्याचा दाखला

४)ओळखपत्र पुरावा

५)३ पासपोर्ट फोटो(अर्ज करणाऱ्याचे)

Post a Comment

Previous Post Next Post