Police Bharti 2022 : नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली, पुढील आठवड्यात निर्णय, वयोमर्यादा शिथिल होण्याची शक्यता
Maharashtra Police Recruitment 2022 : नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. राज्यभरात तब्बल 14956 पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.