Post Office Yojana : दिवाळी बंपर ऑफर ! पोस्ट ऑफिसच्या या 8 योजनांमध्ये 100% पैसे दुप्पट करा, सरकारी हमीतून पैसा वाढवा…
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर (टीडी) 1 वर्ष ते 3 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 5.5 टक्के व्याज मिळत आहे. त्यात गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे सुमारे १३ वर्षांत दुप्पट होतील. त्याचप्रमाणे 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर तुम्हाला 6.7 टक्के व्याज मिळत आहे. जर तुम्ही या व्याजदराने पैसे गुंतवले तर तुमचे पैसे सुमारे 10.75 वर्षात दुप्पट होतील.
2. पोस्ट ऑफिस बचत बँक खाते :
तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात ठेवलेत, तर पैसे दुप्पट करण्यासाठी तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागू शकते. कारण त्यावर वार्षिक ४.० टक्के व्याज मिळते, म्हणजेच १८ वर्षांत तुमचे पैसे दुप्पट होतील.
3. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट :
तुम्हाला सध्या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटवर (आरडी) 5.8 टक्के व्याज दिले जात आहे, त्यामुळे या व्याजदराने पैसे गुंतवल्यास साधारण 12.41 वर्षात दुप्पट होईल.
4. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम :
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमवर (एमआयएस) सध्या ६.६ टक्के व्याज मिळत आहे, या व्याजदराने पैसे गुंतवल्यास सुमारे १०.९१ वर्षांत दुप्पट होईल.
5. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना :
पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (एससीएसएस) सध्या ७.४ टक्के व्याज दिले जात आहे. सुमारे ९.७३ वर्षांत या योजनेत तुमचे पैसे दुप्पट होतील.
6. पोस्ट ऑफिस पीपीएफ :
पोस्ट ऑफिसच्या १५ वर्षांच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंडावर (पीपीएफ) सध्या ७.१ टक्के व्याज मिळत आहे. म्हणजेच या दराने तुमचे पैसे दुप्पट होण्यास सुमारे १०.१४ वर्षे लागतील.
7. पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खाते :
पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी खाते योजनेवर सध्या सर्वाधिक ७.६ टक्के व्याज मिळत आहे. मुलींसाठी सुरू असलेल्या या योजनेत पैसे दुप्पट होण्यास सुमारे ९.४७ वर्षे लागतील.
8. पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र :
पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटवर (एनएससी) सध्या ६.८ टक्के व्याज दिले जात आहे. ही 5 वर्षांची बचत योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून आयकरही वाचवता येतो. या व्याजदराने पैसे गुंतविले तर साधारण १०.५९ वर्षांत दुप्पट होतील.
टीप / सूचना :- मित्रांनो, वरील सर्व योजना ह्या 100% खऱ्या असून भारतीय पोस्ट ऑफिस / डाख विभागाच्या यशस्वी योजना आहेत, महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशातील अनेक नागरिकांनी या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून या योजनांचा फायदा घेतलेला आहे , तुमच्या स्थानिक पातळीवर या सर्व योजनांची अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊन अचूक अर्ज करून या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गावातील पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क साधावा, धन्यवाद!