[ अर्ज पुन्हा सुरु ] शेततळे अनुदान योजना 2022 shettale anudan yojana 2022

[ अर्ज पुन्हा सुरु ] शेततळे अनुदान योजना 2022 shettale anudan yojana 2022

shettale anudan yojana 2022, शेततळे अनुदान योजना 2022, मागेल त्याला शेततळे योजना, shettale subsidy scheme in maharashtra

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 अंतर्गत सामूहिक शेततळ्यासाठी व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर अर्ज सुरु झालेले आहेत. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शेततळ्यासाठी या पोर्टलवर अर्ज करावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे.




महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना संपूर्णत पाऊसावर अवलंबून राहावे लागते..
कारण बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रकार कोरडवाहू असल्याकारणाने पाण्यची असावी तितकी उपलब्धता नाही. परिणामी जमीन खडकाळ असल्याने शेतकऱ्यांना पाण्याअभावी भरघोस उत्पन्न घेता येत नाही.

shettale anudan yojana 2022

Shettale Subsidy Scheme Marathi

कोरडवाहू जमीन, मुरुमाड़ जमीन, डोंगराळ भागातील जमीन अश्याप्रकारच्या जमिनीमध्ये बोअरवेल्स अथवा विहीरसुध्दा खणल्यास पाणी लागण्याची शकता फारच कमी असते. या सर्व अडचणीचा विचार करून शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी शेततळे अनुदान योजना किंवा ज्याला आपण मागेल त्याला शेततळे योजना असे सुध्दा म्हणतो ती योजना सुरु करण्यात आली. आजच्या या लेखामध्ये आपण शेततळे अनुदान योजना 2022 काय आहे ? शेततळे योजनेसाठी किती अनुदान देण्यात येते ( shettale yojana subsidy ) ? पात्रता काय हवी ? कागदपत्रे कोणती अपलोड करावी लागेल ? अर्ज कसा आणि कुठे करावा ( shettale anudan yojana 2022 online form) याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

शेततळे अनुदान योजना 2022 साठी पात्रता

Shettale Anudan Yojana Eligibility

• शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी 0.6 हेक्टर ( 0.6 hector Land Record Required ) जमीन असणे आवश्यक.

• लाभार्थी शेतकयांनी यापूर्वी शेततळे, सामूहिक शेततळे अनुदान योजनांचा लाभ
घेतलेला नसावा.

• लाभार्थी शेतकऱ्यांनी शेततळ्याचे काम पूर्णत्वास आल्यानंतर, सातबारा उताऱ्यावर शेततळ्यांची नोंद करणे बंधनकारक आहे. 

• योजनेअंतर्गत जितक्या आकाराचे शेततळे मंजूर झाले आहे तेवढ्याच आकाराचे
शेततळे खोदणे बंधनकारक आहे. 

• शेततळ्याची काळजी घेणे व निगा राखणे ही शेतकऱ्यांची प्राथमिक जबाबदारी राहील.
 कृषी विभागामार्फत शेततळे तपासणीसाठी आल्यानंतर ज्या ठिकाणची जागा

निश्चित करण्यात आली आहे, त्याच ठिकाणी शेततळे खोदणे बंधनकारक राहील. 

• शेततळे अनुदान योजनेसाठी लॉटरी लागल्यानंतर कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्यामार्फतच्या आदेशान्वये पुढील तीन महिन्यात काम पूर्ण करणे बंधनकारक असेल. 

शेततळे अनुदान योजना 2022 साठी लागणारी कागदपत्रे

Shettale Anudan Yojana 2022 Required Documents

• लाभार्थी आधारकार्ड

• शेत जमिनीचा 7/12

• जमिनीचा 8अ उतारा

• शेततळ्यासाठी खरेदी करण्याचे साधन किंवा उपकरणाचा Quotation 

• मान्यताप्राप्त कंपनीचे Testing Report (पंप घटकासाठी) 

• लाभार्थी जात प्रवर्गातील असल्यास (जात प्रमाणपत्र)

• हमीपत्र, पूर्वसंमती पत्र, शेतकरी करारनामा ( लॉटरी लागल्यानंतर )

• बैंक पासबुक

• मोबाईल क्रमांक


शेततळे लाभार्थी निवड

Shettale Beneficiary Selection Process

• दारिद्र रेषेखालील (BPL Below Poverity Line) शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली असल्यास त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये प्राधान्य देण्यात येईल.

• याव्यतिरिक इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड ज्येष्ठता यादीनुसार "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" याप्रमाणे शेततळ्यासाठी निवड करण्यात येईल.

शेततळ्यासाठी अनुदान किती मिळणार ?

Shettale Subsidy Amount

वैयक्तिक शेततळे त्याचप्रमाणे सिंचन साधने व सुविधा या घटकांतर्गत येणाऱ्या विविध उपकरणांसाठी अनुदान किती आहे ? अनुदान सामान्यता आकारावरती अवलंबून असतो ज्यामध्ये इनलेट आणि आउटलेट अस्तरीसह व बिनअस्तरीसह याप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. अधिक माहितीसाठी पीडीएफ डाऊनलोड करून शेततळे अनुदान किती असेल पाहू शकता. :- शेततळे अनुदान पीडीएफ फाईल


वैयक्तिक शेततळे अस्तिकरणासाठी आकारमानानुसार अनुदान

                          अनुक्रमांक             आकारमान             अनुदान          अनुदानाची रक्कम
                                                        (मीटरमध्ये)

01                    15*15*3               50%                  28275 रु.

02                     20*25*3               50%                31,598 रु.

03                      20*20*3                50%               41,218 रु.

04                       25*20*3                 50%               49,671रु.
  
05                         25*25*3                 50%               58,700 रु.

06                         30*25*3                 50%              67,728 रु.

07                        30*30*3                  50%             75,000रु



shettale anudan chart

शेततळ्याचे आकारमान कसे असेल ?

शेतकऱ्यांना शेततळे मंजुरी देत असताना मुखत्वे शेततळ्याचे आकारमान लक्ष्यात घेतले जाते. त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरु करण्यात येते. जश्याप्रकारे शेततळ्याची जागा, लागणारी उपकरणे, शासनामार्फत दिली जाणारी अनुदान मदत इत्यादी. खालील Chart पाहून तुम्ही थोडक्यात INLET OUTLET शेततळ्याच्या आकारमानाचा अंदाजा लावू शकता.

शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

Shettale Anudan Yojana Online Application Form

1) सर्वप्रथम " अर्ज एक योजना अनेक " म्हणजेच महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी नोंदणी करते वेळेस टाकलेला Username व Password टाकून लॉगिन करून घ्यायचं आहे.

2) शेतकऱ्यांनी अद्याप महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेली नसेल तर या लेखाच्या शेवटी देण्यात आलेला व्हिडिओ पाहून शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यायची आहे. लॉगिन केल्यानंतर Dashboard दिसेल. त्यामध्ये तुम्हाला 'अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

3) अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन 4 घटक दिसतील. ज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, सिंचन, साधने व सुविधा, वि-औषधे व खते, फलोत्पादन यांचा समावेश असेल.

4) सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक वेधल्यानंतर एक नवीन पेज उडेल.

5) ज्या ठिकाणी तुम्हाला पुढीलप्रमाणे घटक निवडायचे आहेत. मुख्य घटक :- सिंचन साधने आणि सुविधा बाब: वैयक्तिक शेततळे उपघटक :- अर्धा डगआऊट (अस्तरिसह )

6) वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर अर्ज तुम्हाला जतन करायचा आहे. उपघटक तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार निवडू शकता.

7) अर्ज जतन केल्यानंतर पुढील टप्प्यामध्ये तुम्हाला शुल्लक अशी 23 ते 24 रुपयाची ऑनलाईन फीस भरावी लागेल. फेस भरल्यानंतर शेततळ्यासाठी केलेल्या अर्जाची फीस पावती व अर्जाची प्रत डाऊनलोड करून किंवा झेरॉक्स काढून ठेवू शकता.

8) पात्र शेतकऱ्यांना मोबाईलवरती एसएमएसच्या ( SMS ) माध्यमातून लॉटरी लागल्यानंतर Message पाठविण्यात येतात. संबंधित पुढील कार्यवाही कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्यामार्फत पूर्ण केली जाते.

शेततळ्यासाठी अनुदान किती देण्यात येईल ?

शेततळ्यासाठी सामान्यता आकारमानानुसार अनुदान देय असते. पूर्वी ही रक्कम
50,000 रु. इतकी होती पण आता 75,000 करण्यात आली आहे.

शेततळे योजनेसाठी सध्या अर्ज सुरू आहेत का ?

हो, परत एकदा शेततळे योजनेसाठी अर्ज सुरु झालेले आहेत. लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे महाडीबीटी वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता.

शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो का ?

हो, ऑनलाइन अर्ज कसा करावा या संदर्भात संपूर्ण माहिती नमूद लेखामध्ये देण्यात आली आहे.

शेततळ्यासाठी कमीत कमी किती क्षेत्र असणे गरजेचे आहे ?

 शेततळ्यासाठी कमीत कमी 0.6R इतके क्षेत्र असणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post