महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
Free Bicycle Scheme For Students | Free Cycle Scheme In Maharashtra | Free Scheme For Students | Free Cycle Scheme Maharashtra | Student Cycle Scheme Pune | Student Free Cycle Yojana Pune | PMC Schemes | PMC योजना | Cycle Vatap Yojana
महाराष्ट्र शासन राज्यातील मागासवर्गीय लोकांसाठी विविध योजना राबवित असते.या अंतर्गत पुणे समाज विकास विभागातील मागासवर्गीय कल्याणकारी योजनेअंतर्गत विविध योजना राबविण्यात आल्या आहेत या योजनांपैकीच एक योजना म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजना
Student Cycle Scheme
राज्यातील खेडेगावात आज सुद्धा पक्के रस्ते नाही तसेच येण्याजाण्यासाठी वाहतुकीची साधने नाहीत त्यामुळे अशा खेडेगावातील विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून विद्यालयात जाण्यासाठी मैलो दूर उन्हातून पायी चालत जावे लागते त्यामुळे त्यांचा बहुतांश वेळ विद्यालयात येण्या जाण्या खर्च होतो तसेच राज्यातील बहुतांश कुटुंबे हि गरिबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यामुळे ते आपल्या मुलांच्या गरज पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे त्यांना आपल्या मुलांसाठी सायकल घेणे शक्य नसते या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने विद्यालयीन मुलांना मोफत सायकल देण्यासाठी सायकल वाटप योजनेची सुरुवात केली.
या योजनेअंतर्गत ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे घरापासून महाविद्यालयीन अंतर २ कि.मी. असेल अशा विद्यार्थ्यांना मोफत सायकली दिल्या जातात.
योजनेचे नाव | Cycle Vatap Yojana |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | पुणे समाज विकास विभाग |
लाभार्थी | राज्यातील विद्यार्थी |
योजनेचा लाभ | महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजना उद्देश
Student Cycle Scheme Purpose
- सायकल वाटप योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी होणाऱ्या गैरसोयीचे समाधान करणे.
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे हे या योजनेचे उद्दिष्ट्य आहे.
- या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविणे.
- विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश्य आहे.
- योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक विकास करणे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजनेचे वैशिष्टये
Student Cycle Scheme Featues
- महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली हि एक महत्वाची योजना आहे.
- या योजनेमुळे विद्यार्थ्यांचा विद्यालयात येण्या जाण्याचा वेळ वाचेल जो वेळ ते अभ्यासात वापरू शकतील.
- या योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येते.
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आली त्यामुळे अर्जदार विद्यार्थी आपल्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यामुळे त्यांना कोणत्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा यांची बचत होईल.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजनेचे लाभार्थी
Student Cycle Scheme Beneficiary
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजनेचा फायदा
Student Cycle Scheme Benefits
- या योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात येते.
- या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आपल्या विद्यालयात जाण्यासाठी मैलो अंतर पायी चालत जाण्याची आवश्यकता भासणार नाही.त्यामुळे त्यांचा पैसे आणि वेळ यांची बचत होईल.
- विद्यार्थ्यांना तासंतास बस ची वाट बघण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेअंतर्गत विद्याथी आत्मनिर्भर बनतील
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल.
- या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी आपल्या अडचणी दूर करून आपली शिक्षा पूर्ण करू शकतील.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला सायकल घेण्यासाठी कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- विद्यार्थ्यांना आपले शिक्षण सोडण्याची आवश्यकता भासणार नाही
- या योजनेअंतर्गत विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी चांगली नौकरी मिळवू शकतील तसेच स्वतःचा स्वरोजगार स्थापित करून राज्यातील इतर बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करू शकतील.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजनेच्या अटी
Student Cycle Scheme Terms & Condition
- अर्जदार विद्यार्थ्यांचे कुटुंब पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्यास असणे आवश्यक आहे.
- मागील उत्तीर्ण परीक्षेमध्ये ५०% पेक्षा जास्त गुण असावेत.
- विद्यार्थ्याच्या राहत्या घरापासून महाविद्यालयाचे किमान अंतर २ किलोमीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक.
- दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व ह्यात अपत्यामुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त झाल्यास लाभ घेता मिळणार नाही.
- कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न १ लाखा पेक्षा कमी असावे.
- स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न कारने आवश्यक आहे.
- अटी व नियम यांत बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. उप आयुक्त, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Student Cycle Scheme Documents
- कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (दूरध्वनी) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती / भाडे करारनामा यांपैकी एक जोडणे आवश्यक.
- रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत
- अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो
- अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
- वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.
- मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
- मागील वर्षाची गुणप्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
- झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समूह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. व झोपडपट्टी व्यतिरिक्त राहत असलेल्या अर्जदारांनी मा. तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे राष्ट्रयीकृत बँकेत बचत खाते असणे आवशयक
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
Student Cycle Scheme Online Registration Process
अजदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल
होम पेज वर नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात विचारलेली सर्व माहिती भरून जतन करा बटनावर क्लिक करून स्वतःचे रेजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे.
आता तुम्हाला योजना पर्यायावर क्लिक करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना वर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर या योजनेचं अर्ज उघडेल त्यात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडून submit बटनावर क्लिक करायचे आहे.
अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
Student Cycle Scheme Offline Registration Process
खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधून या योजनेचा अर्ज घ्या व अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून आवश्यक अशा कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति जोडून सदर अर्ज जमा करावा.
Telegram Goup | Join |
शासनाची अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
पत्ता | पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, मंगला थिएटरजवळ, शिवाजी नगर, पुणे- ४११ ००५ |
दूरध्वनी | ०२०-२५५०१००० ०२०-२५५०११३० १८००-१०३०-२२२ |
ई-मेल आयडी | info@punecorporation.org |