Reliance Foundation Scholarship 2023 : रिलायन्स कंपनी देत आहे विद्यार्थ्यांना चक्क 2 लाख रुपये शिष्यवृत्ती ! Apply Now !

आर्थिक स्वरुप : सदर शिष्यवृत्ती योजनेस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस पदवीचे शिक्षण घेण्यासाठी रुपये 2 लाख इतक्या रक्कमेची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते . सदरची शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांनी अर्ज करताना सादर केलेल्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येते .
विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त भारतीय संस्थेतून कोणत्याही प्रवाहात प्रथम वर्षाच्या पूर्ण-वेळ अंडरग्रेजुएट पदवीमध्ये नावनोंदणी असणे आवश्यक आहे , तसेच विद्यार्थी हा इयत्ता 12वी किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर विद्यार्थाच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न INR 15,00,000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे . ज्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 2,50,000/- रुपये पेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल .त्याचबरोबर सदर शिष्यवृत्ती योजना ही केवळ भारतीय नागरिक असणाऱ्या उमेदवारांनाच देण्यात येईल .
आवश्यक कागदपत्रे : पासपोर्ट आकाराचे फोटो , पत्त्याचा पुरावा ,10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेची मार्कशीट ,वर्तमान महाविद्यालय/नोंदणी संस्थेचे बोनाफाईड विद्यार्थी प्रमाणपत्र किंवा विद्यार्थी ओळखपत्र ,कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा ,अधिकृत अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)तुम्ही पात्रता निकष पूर्ण केल्यास, तुम्हाला रिलायन्स फाऊंडेशनच्या अॅप्लिकेशन पोर्टलद्वारे अर्ज करण्यासाठी लॉग-इन माहितीसह ईमेल आमंत्रण पाठवले जाईल. ईमेलवर मिळालेले युजरनेम आणि पासवर्ड वापरून अॅप्लिकेशन पोर्टलवर लॉग इन करा.
सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला अर्ज दि.14.02.2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे .खालील लिंकवर क्लिक करुन सविस्तर अर्ज करु शकता.