Indian Railway Recruitment 2021: दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; ‘असा’ करा अर्ज
असा करा अर्ज
स्टेप १: अप्रेन्टिसच्या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.org ला भेट द्या.
स्टेप २ : नाव, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख सारख्या तपशीलांसह लॉगिन करा आणि स्वतःची नोंदणी करा
स्टेप ३ : विचारल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप ४ :फॉर्म डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.
उमेदवारांना कोणत्याही लेखी परीक्षेमध्ये किंवा मुलाखत/ तोंडी परीक्षेत प्रशिक्षणार्थी पदाच्या कोणत्याही निवडीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. पोर्टलवर दिलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे अॅक्ट अप्रेंटिसची नियुक्ती केली जाईल. जर उमेदवारांना कोणत्याही पदासाठी शॉर्टलिस्ट केले गेले असेल तर त्यांना कॉल लेटरद्वारे त्याबद्दल माहिती दिली जाईल जी त्यांच्या संबंधित मेल आयडीवर पाठविली जाईल