सायकल वाटप योजना महाराष्ट्र 2022 : Cycle Vatap Yojana Maharashtra

 

Cycle Anudan Yojana – Apply Here

Cycle Vatap Yojana Maharashtra

सायकल वाटप योजना महाराष्ट्र 2022 अर्ज करा

राज्य शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल दिली जाणार आहे. इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या परंतु, शाळेपासून पाच किलो मिटर अंतरावर राहणार्‍या गरजू मुलींना प्राधान्याने सायकलींचे वाटप केले जाणार आहे. लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सायकल वाटप केले जाणार नसले तरी सायकल खरेदीसाठी 5 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट अनुदान देण्याची प्रक्रिया माध्यमिक शिक्षण विभागाने सुरु केली आहे. जिल्हा नियोजन अधिकार्‍यांकडे निधीची मागणी केली असून, त्यांनी मंजूरी दिल्यानंतर निधी वितरीत केला जाणार आहे.

Cycle Anudan Yojana

सायकल अनुदान योजना महाराष्ट्र ची उद्दिष्ट्ये

Cycle Vatap Yojana Maharashtra Purpose

  • महाराष्ट्र राज्यातील गरजू मुलींना घरातून शाळेत व शाळेतून घरी येण्यासाठी सायकल वाटप करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे जेणेकरून मुलींना शिक्षणासाठी मैलोनमैल पायी चालत जाण्याची गरज नाही.
  • राज्यातील मुलींना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
  • मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.

सायकल वाटप योजनेची वैशिष्ट्ये

Cycle Vatap Yojana Features

  • सायकल वाटप योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आलेली योजना आहे
  • गरजू मुलींना इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचा शालेय शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यात सायकल खरेदी करण्याची स्वतंत्रता राहील.
  • मुलीच्या कुटुंबाला सायकल घेण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही किंवा कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे मुलींना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • सायकल वाटप योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची राशी DBT च्या सहाय्याने लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याने मुली सायकल खरेदी करून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व भविष्यात चांगली नोकरी मिळवू शकतील किंवा स्वतःचा स्वरोजगार स्थापित करून राज्यातील इतर बेरोजगार नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करू शकतील.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील मुली आत्मनिर्भर बनतील.

सायकल वाटप योजनेअंतर्गत समाविष्ट शाळा

  1. शासकीय शाळा
  2. जिल्हा परिषद शाळा
  3. शासकीय अनुदानित शाळा
  4. तसेच ज्या अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील मुलींना डे स्कॉलर प्रवेश दिला जातो व ज्यांना दररोज घरापासून ये जा करावी लागते अशा शाळेच्या मुलींना हि योजना लागू करण्यात येईल

सायकल वाटप योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करण्याचे टप्पे

Cycle Vatap Yojana Marathi

  • पहिला टप्यात गरजू मुलींच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात डी.बी.टी. (Direct Benefit Transfer) द्वारे ३५००/- रुपये आगाऊ रक्कम जमा करण्यात येईल.
  • दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना उर्वरित १५००/- रुपये थेट अदा करण्यात येईल.

सायकल वाटप योजनेचे फायदे

Maharashtra Cycle Vatap Yojana Benefits

  • सायकल वाटप योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना महाराष्ट्र शासनाकडून सायकल खरेदी करण्यासाठी ५०००/- रुपयांची आर्थिक मदत केली जाईल
  • या योजनेच्या सहाय्याने मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल व त्या आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
  • या योजनेच्या सहाय्याने मुलींना घरातून शाळेत व शाळेतून घरी येणासाठी पायी चालत जाण्याची गरज लागणार नाही.
  • या योजनेमुळे मुलींच्या वेळेची बचत होईल
  • मुलींना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत होईल
  • या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत लाभार्थी मुलींच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाईल

सायकल वाटप योजनेसाठी आवश्यक पात्रता

cycle vatap yojana maharashtra eligibility

  • अर्जदार विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे
  • विद्यार्थिनी इयत्ता ८वी ते १२वी वर्गात शिकत असणे आवश्यक आहे

सायकल वाटप योजनेच्या अटी

Maharashtra Cycle Vatap Yojana Terms & Conditions

  • सायकल वाटप योजनेचा लाभ केवळ इयत्ता ८वी ते १२वीत शिकणाऱ्या मुलींना देण्यात येईल
  • या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास मुलीच्या शाळेचे घरापासून अंतर ५ किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
  • सायकल वाटप योजनेअंतर्गत फक्त ५०००/- रुपयांची आर्थिक मदत केली जाईल व त्या वरील सायकलच्या खरेदीसाठी लाभार्थी मुलीस स्वतः जवळची रक्कम भरावी लागेल
  • महाराष्ट्राच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
  • लाभार्थी मुलीला इयत्ता ८वी ते १२वी या ४ वर्षांमध्ये सायकल खरेदीसाठी एकदाच अनुदान देय राहील
  • गरजू मुलींना सायकल वाटप करताना जी गावे/वाड्या/तांडे/पाडे हे डोंगराळ व अतिदुर्गम भागात आहेत जिथे जाण्यासाठी योग्य रस्ते नाहीत तथा वाहतुकीची पुरेशी साधने नाहीत/व्यवस्था उपलब्ध नाही अशा ठिकाणी राहणाऱ्या गरजू मुलींना प्राधान्य देण्यात येईल
  • सायकल वाटप योजनेअंतर्गत फक्त मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल
  • मुलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही

Documents required for Cycle Vatap Yojana

  1. Aadhar Card
  2. Ration card
  3. Residence Certificate
  4. Passport size photograph
  5. mobile number
  6. Email Id
  7. bank account
  8. School certificate that the student is studying in class 8th to 12th
  9. Bicycle purchase receipt

सायकल वाटप योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

Maharashtra Cycle Vatap Yojana Application Process

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गरजू विद्यार्थिनीं ना स्वतःच्या शाळेत जाऊन शालेच्या ऑफिसमधून किंवा प्राचार्यांकडून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज शाळेत जमा करावा.

किंवा

अर्जदार विद्यार्थिनीला स्वतःच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नियोजन विभागाला भेट द्यावी लागेल आणि या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सदर कार्यालयात जमा करावा
अशा प्रकारे आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

Application Procedure for Cycle Vatap Yojana

  1. The needy students have to go to their own school and take the application of this scheme from the school office or the principal.
  2. Submit the said application to the school by adding all the information and necessary documents asked in the application. OR
  3. The applicant student has to visit the planning department in her own district collector’s office and get the application for this scheme and submit the application in the said office along with all the information and necessary documents list given above in the application.
  4. In this way you can avail the benefits of this scheme.

إرسال تعليق

أحدث أقدم