अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र Apang Pension Yojana Maharashtra 2022

 

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र Apang Pension Yojana Maharashtra 2022


भारतातील लोकसंख्येपैकी देशातील दिव्यांग/अपंग व्यक्तींची संख्या देखील बऱ्याच प्रमाणात आहे. समाजातील दुर्बल असा समजला जाणारा घटक म्हणून अपंग व्यक्तींकडे पाहिले जाते. अपंग व्यक्तींना समाजात इतर लोकांप्रमाणेच हक्क मिळावेत, समान संधी, स्वयंरोजगार देऊन त्यांच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा यासाठी अनेक दिव्यांग/अपंगांसाठीचे कायदे, योजना देशात अस्तित्वात आहेत. त्यापैकीच एक योजना म्हणजे - अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र 2022.

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र 2022 | अपंग पेन्शन योजना कागदपत्रे | अपंग पेन्शन योजना माहिती | दिव्यांग योजना महाराष्ट्र 2022 मराठी | अपंग योजना महाराष्ट्र pdf | अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र मराठी | अपंग योजना ऑनलाइन फॉर्म | apang pension yojana maharashtra | handicapped pension maharashtra | दिव्यांग योजना महाराष्ट्र 2021

राज्यातील अपंग/दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारची इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन ही योजना राज्याच्या हिस्यासह एकत्रितपणे राबवली जाते. याच योजनेला 'अपंग पेन्शन योजना' किंवा 'दिव्यांग पेंशन योजना' असेही म्हटले जाते.

दारिद्र्य रेषेखाली १८ ते ६५ वयोगटातील ८०% हून जास्त अपंग असलेले दिव्यांग/अपंग व्यक्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन या योजनेंतर्गत दरमहा निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र ठरतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकार कडून रु.३००/- दरमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.७००/- प्रतीमहा असे एकूण रु.१०००/- प्रतीमहा निवृत्तीवेतन देण्यात येते. यापूर्वी निवृत्तीवेतनाची एकूण रक्कम रु. ६००/- एवढी होती. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २० ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन निर्णयात अपंग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतन वाढीची नोंद आहे.

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र २०२२ उद्दिष्ट्ये:

अपंग/दिव्यांग व्यक्तींना स्वतःचे दैनंदिन जीवन जगताना अनके संकटाना सामोरे जावे लागत असते. अपंगत्वामुळे इतरांवर अवलंबून रहावे लागते. 

अपंग व्यक्तींना आर्थिक सहाय्य देऊन, त्यांचे जीवमान उंचावणे, त्यांच्या अपंग अवस्थेला धीर देणे, स्वावलंबी बनवणे आणि सन्मानार्थ जगण्यासाठी 'अपंग पेन्शन योजना' या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करणे ही या योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र 2022 लाभ:

केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग पेन्शन योजनेतून दरमहा रु. ३००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थीना संजय गांधी निराधार योजनेतून ७०० प्रतिमहा देण्यात येते. असे एकूण रु.१०००/- ची पेन्शन दरमहा अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र 2022 योजनेअंतर्गत लाभार्थीच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. 

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र पात्रता:

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र राज्यासाठी खालील पात्रता अटी व निकष आहेत.

• अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

• ८०% अपंगत्व असणारे व्यक्ती 'अपंग पेन्शन योजना' या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

• अर्जदार हा १८ ते ६५ या वयोगटातील असावा.

• अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३५०००/- पेक्षा जास्त नसावे.

• सरकारी सेवेत असणारे व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरतील.

• कटुबांचे नाव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र रेषेखालील यादीत समाविष्ट असावे.


अपंग पेन्शन योजना कागदपत्रे:

अपंग पेन्शन योजेनचा लाभ मिळविण्यासाठी विहित नमुन्यातील अर्जासहित उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, अपंगत्व प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक तपशील, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदार कार्ड  व मोबाईल नंबर, फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.

अपंगत्वाचे प्रमाणपत्र - शासनाच्या तरतुदीनुसार अपंग असल्याबतचा पुरावा म्हणून शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

वयाचा दाखला - वयाचा दाखला म्हणून, ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिकेच्या १) जन्मनोंद वहीतील उताऱ्याची साक्षांकित प्रत २) शाळा सोडल्याचा दाखला ३) शिधापत्रिकेत किंवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा ४) नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला ग्राह्य धरण्यात येतो.

उत्पनाचा दाखला - दारिद्य रेषेखालील कुटूंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटूंबाचा समावेश असल्याबाबतचा साक्षांकित उतारा उत्पनाचा दाखला म्हणून गृहीत धरण्यात येतो.


अपंग योजना ऑनलाइन फॉर्म:

अपंग पेन्शन योजनेचा (दिव्यांग योजना महाराष्ट्र 2021) लाभ मिळविण्यासाठी सद्यस्थितीत कोणतेही ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध नाही. यासाठी तुम्हाला, जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय यापैकी ठिकाणावर भेट द्यावी लागेल. सदर कार्यालयांमध्ये, अपंग योजनेचा फॉर्म उपलब्ध असेल, तो फॉर्म भरून, आवश्यक कागदपत्रांसह संबंधित अधिकाऱ्यांना द्या आणि त्याची पोचपावती मिळवा. जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालयातील संबंधित अधिकारी तुमचा अर्ज आणि दिलेली कागदपत्रे याची पडताळणी करतील. जर सर्वकाही ठीक असेल तर, तुम्हाला अपंग पेन्शन योजनेची पेन्शन सुरु करण्यात येईल.

योजनेच्या अधिक माहितीसाठी, https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare इथे भेट द्या.

إرسال تعليق

أحدث أقدم