आम आदमी विमा योजना 2022 : Aam Admi Bima Yojana
Aam Admi Bima Yojana | आम आदमी विमा योजना | Aam Aadmi Bima Yojana Official Website | Aam Admi Bima Yojana Online Registration | आम आदमी विमा योजना माहिती | आम आदमी बीमा योजना महाराष्ट्र | Aam Aadmi Bima Yojana Online Registration | Bima Yojana Application Status | आम आदमी बीमा योजना मराठी | Aam Aadmi Bima Yojana Scheme | Aam Admi Bima Yojana Maharashtra | विमा योजना माहिती
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांच्या भविष्याचा विचार करून विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते त्या योजनांपैकीच एक योजना ज्या योजनेचे नाव आदमी विमा योजना आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील जनतेचा विमा उतरवला जातो त्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व किंवा आंशिक अपंगत्त्व आल्यास या विमा योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते.
Aam Admi Bima Yojana
आपल्या देशात बहुतांश जनसंख्या ही गरीब व दारिद्र्य रेषेखालील आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाला स्वतःचा विमा उतरवणे शक्य नसते आर्थिक परिस्थिती कमजोर असल्या कारणामुळे ते विम्याच्या हफ्त्याची रक्कम भरण्यास असमर्थ असतात त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा अपघातात अपंगत्व आल्यास ती व्यक्ती कुटुंबातील एकच कमावती असल्या कारणामुळे त्याच्या कुटुंबा समोर आर्थिक पैशाची मोठी समस्या निर्माण होते या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र आणि राज्य शासनाने 2 आक्टोबर 2007 रोजी आम आदमी विमा योजनेची सुरुवात करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.
गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी दुर्दैवी परिस्थितींना तोंड देण्यासाठी आर्थिक मदत पुरवते.आम आदमी विमा योजना ग्रामीण तसेच शहरी भागातील भूमिहीन कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीला विम्याचे संरक्षण देणारी तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देणारी ही महत्वाची आणि फायद्याची योजना आहे.

१८ ते ५९ वयोगटातील भूमिहीन कुटुंबातील रोजगार करणारा कुटुंब प्रमुख किंवा त्या कुटुंबातील एक प्रमुख कमावती व्यक्तीचा आम आदमी विमा योजनेअंतर्गत भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून विमा उतरवला जातो.
लाभार्थ्यांचा नैसर्गिक मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व किंवा आंशिक अपंगत्त्व आल्यास या विमा योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते.
आम आदमी विमा योजनेसाठी २००/- रुपये वार्षिक प्रीमियम आकारला जातो त्यापैकी १००/- रुपये शासनामार्फत (५० टक्के केंद्र सरकार आणि ५० टक्के राज्य शासन) आणि उर्वरित १००/- रुपये लाभार्थ्यास भरावे लगतात.
विशेष सूचना: आम्ही आम आदमी विमा योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी गरीब कुटुंबे असतील जे आम आदमी विमा योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
| योजनेचे नाव | Aam Aadmi Bima Yojana Maharashtra |
| राज्य | महाराष्ट्र |
| कोणी सुरु केली | केंद्र / राज्य शासन |
| योजनेची सुरुवात | २ ऑक्टोबर २००७ |
| लाभार्थी | राज्यातील नागरिक |
| लाभ | विमा उतरवला जातो |
| योजनेचे उद्दिष्ट | देशातील नागरिकांना विमा सुरक्षा आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे |
आम आदमी विमा योजनेचा उद्देश्य
Aam Admi Bima Yojana Purpose
- राज्यातील गरीब कुटुंबांना विमा सुरक्षा उपलब्ध करून देणे हे आम आदमी विमा योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
- राज्यातील गरीब कुटुंबांना उपचारासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हे या योजनेचा उद्देश्य आहे.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना विमा सुरक्षा प्रदान करणे जेणेकरून त्यांना त्याच्या उपचारासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारणे
- राज्यातील गरीब कुटुंबांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
आम आदमी विमा योजना वैशिष्ट्ये
Aam Admi Bima Yojana Features
- आम आदमी विमा योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत सुरु करण्यात आलेली एक महत्वाची विमा योजना आहे.
- आम आदमी विमा योजनेअंतर्गत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान केली जाते.
- या योजनेचा प्रीमियम अत्यंत कमी आहे तसेच प्रीमियम ची ५० टक्के रक्कम शासनामार्फत भरण्यात येते त्यामुळे ही योजना सर्व नागरिकांना परवडण्यासारखी आहे.
- या योजनेची कार्यप्रणाली Digital स्वरूपात केली जाते त्यामुळे लाभार्थ्याला त्वरित आर्थिक सहाय्य करण्यास मदत होते.
आम आदमी विमा योजनेत समाविष्ट गोष्टी खालीलप्रमाणे
Aam Aadmi Bima Scheme
1. एखाद्या लाभार्थ्यांचा नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाल्यास ही योजना विमा संरक्षण देते.
2. एखाद्या लाभार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यास ही योजना विमा संरक्षण देते.
3. एखाद्या लाभार्थ्याला अपघातामुळे आंशिक अपंगत्व किंवा कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आल्यास ही योजना विमा संरक्षण देते.
4. लाभार्थ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
आम आदमी विमा योजना फायदे
Aam Admi Bima yojana Benefits
लाभार्थ्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास
विम्याच्या अंतिम तारखेपूर्वी या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास लाभार्थ्यांच्या नामांकित (नॉमिनी) व्यक्तीला 30000/- रुपये देण्यात येतील.
लाभार्थ्यांचा अपघात मृत्यू झाल्यास
विम्याच्या अंतिम तारखेपूर्वी या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांचा अपघात झाल्यास विम्या अंतर्गत खालीलप्रमाणे आर्थिक मदत केली जाईल.
- अपघातामुळे मृत्यू झाल्यास 75000/- आर्थिक मदत देण्यात येईल.
- अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास रुपये 75000/- आर्थिक मदत देण्यात येईल.
- अपघातात 2 डोळे आणि 2 अवयव गमावल्यास रुपये 75000/- आर्थिक मदत देण्यात येईल.
- अपघातात 1 डोळा आणि 1 अवयव गमावल्यास रुपये 37500/- आर्थिक मदत देण्यात येईल.
लाभार्थ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
इयत्ता 9वी ते 12वी दरम्यान शिकत असलेल्या लाभार्थ्यांच्या जास्तीत जास्त 2 मुलांना प्रत्येकी 100/- रुपये दरमहा शिष्यवृत्ती लाभ दिला जातो.
वर्षातून दोन वेळा 1 जुलै व 1 जानेवारीला शिष्यवृत्तीची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.
आम आदमी विमा योजना लाभार्थी
Aam Admi Bima Yojana Beneficiary
आम आदमी विमा योजना ग्रामीण आणि शहरी भागातील १८ ते ५९ वयोगटातील भूमिहीन,अल्प भूधारक,अत्यल्प भूधारक मजुरांसाठी राबविण्यात आली आहे.
आम आदमी विमा योजनेंतर्गत व्यापलेले व्यवसाय
Businesses Covered Under Aam Aadmi Bima Yojana
- हस्तकला कारागीर
- मच्छीमार
- बिडी कामगार
- हमाल
- वीटभट्टी कामगार
- कापड
- सुतार
- रबर आणि कोळसा उत्पादने
- मोची
- कोतवाल
- फटाक्यांचे कामगार
- कागदी उत्पादनांची निर्मिती
- खांडसरी/साखर यांसारखे खाद्यपदार्थ
- लाकूड उत्पादनांची निर्मिती
- लेदर उत्पादनांचे उत्पादन
- शहरी गरीबांसाठी योजना
- वृक्षारोपण कामगार
- छपाई
- परदेशी भारतीय कामगार
- हातमाग विणकर
- मेणबत्ती निर्मितीसारखी रासायनिक उत्पादने
- हातमाग आणि खादी विणकर
- मातीची खेळणी सारखी खनिज उत्पादने तयार करतात
- लेडी टेलर्स
- ग्रामीण भूमिहीन कुटुंबे
- डोंगराळ भागातील महिला
- शेतकरी
- लेदर आणि टॅनरी कामगार
- वाहतूक चालक संघटना
- पापड कामगार ‘सेवा’शी संलग्न
- वाहतूक कर्मचारी
- शारीरिकदृष्ट्या अपंग स्वयंरोजगार व्यक्ती
- ग्रामीण गरीब
- प्राथमिक दूध उत्पादक
- बांधकाम मजूर
- रिक्षाचालक/ऑटो चालक
- मेंढी पाळणारे
- ताडी टॅपर्स
- सफाई कर्मचारी
- नारळ प्रोसेसर
- मीठ उत्पादक
- आंगणवाडी शिक्षिका
- तेंदूपत्ता संग्राहक
- वन कर्मचारी
- स्वयं-सहायता गटांशी संबंधित महिला
- रेशीम
- यंत्रमाग कामगार
- असंघटित कामगार RSBY अंतर्गत समाविष्ट आहेत.
आम आदमी विमा योजनेच्या अटी
Aam Admi Bima Yojana Terms and Condition
- अर्जदार राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- आम आदमी योजनेचा लाभ भूमिहीन मजूर तसेच ५ एकर पेक्षा कमी जिरायती व २.५ एकर पेक्षा कमी बागायती शेत जमीन धारण करत असलेल्या व्यक्तींना दिला जाईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्ष ते ५९ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदार दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ भूमिहीन, अल्प भूधारक व अत्यल्प भूधारकांनाच घेता येईल.
- या योजनेचा अर्ज भरताना वारसाचे / नॉमिनीचे नाव देणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांच्या मृत्यूच्या वेळी / अपघाताच्या वेळी लाभार्थ्यांची पॉलिसी सक्रिय असणे आवश्यक आहे.
- आम आदमी विमा योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ जास्तीत जास्त २ मुलांना दिला जाईल.
- आम आदमी विमा योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ फक्त ९वी ते १२वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांना दिला जाईल.
- लाभार्थी व्यक्ती कुटुंबाचा प्रमुख असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांच्या कुटुंबात एकच कमावता व्यक्ती असणे आवश्यक आहे.
आम आदमी विमा योजना आवश्यक कागदपत्रे
Aam Admi Bima Yojana Documents
- आम आदमी विमा योजना अर्ज
- ओळखीचा पुरावा
आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदान ओळखपत्र
वाहन चालक परवाना
मारोहयो जॉब कार्ड - पत्ता पुरावा
आधार कार्ड
ग्रामसेवक / तलाठी मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवासी असल्याचा दाखला - जन्म प्रमाणपत्र
जन्माचा दाखला
शाळेचा दाखला
- मोबाईल क्रमांक
- राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड
वारसाचे कागदपत्र
- वारसाचे / नॉमिनीचे ओळखपत्र
- वारसाचे / नॉमिनीचा पत्ता
- वारसाचे / नॉमिनीचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते
खालील गोष्टींसाठी आम आदमी विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही
Aam Aadmi Bima Yojana Scheme
- लाभार्थी रुग्णालयात भरती असल्यास रुग्णालयाचा खर्च
- लाभार्थ्यांला मानसिक विकारामुळे अपंगत्व आल्यास
- लाभार्थाने आत्महत्या केल्यास
- देशात युद्धसदृश्य परिस्थितीमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास
- धोकादायक खेळामध्ये मृत्यू झाल्यास
- बेकायदेशीर कामात मृत्यू झाल्यास
- मादक पदार्थाच्या सेवनामुळे मृत्यू झाल्यास
- लाभार्थाने स्वतःला इजा करून घेतल्यास
महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजनांसाठी येथे क्लिक करा
लाभार्थ्यांचा मृत्यू व अपघात झाल्यास दावा करण्याची पद्धत
Aam Admi Bima Yojana Claim Process
आम आदमी विमा योजनेंतर्गत लाभार्थ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाचे दावे एलआयसीच्या P&GS युनिटद्वारे NEFT द्वारे लाभार्थ्यांना थेट पेमेंट करून किंवा जेथे NEFT सुविधा उपलब्ध नाही अशा प्रकरणांमध्ये सक्षम व्यक्तीच्या पूर्व परवानगीने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करून निकाली काढण्यात येतात.
लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास दावा करण्याची पद्धत
Method Of Claiming In Case Of Death Of The Beneficiary In Aam Admi Bima Yojana
एखाद्या लाभार्थ्यांचा कव्हरेजच्या कालावधीत आणि पॉलिसी लागू असताना मृत्यू झाल्यास त्याच्या / तिच्या नॉमिनीला नोडल एजन्सीच्या नियुक्त अधिकाऱ्याकडे हक्काची रक्कम भरण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्रासह अर्ज करावा लागेल.
अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून अर्जासोबत पोलीस FIR ची प्रत, पोस्टमार्टम रिपोर्ट, पोलिस चौकशी अहवालाची प्रत, पोलिस निष्कर्ष अहवाल / पोलिसांचा अंतिम अहवाल. इत्यादी कागदपत्रे जोडून नोडल एजन्सी अधिकाऱ्याकडे जमा करावा.
लाभार्थ्यास अपंगत्व आल्यास दावा करण्याची पद्धत
How to Claim In Case Of Disability Of The Beneficiary In Aam Admi Bima Yojana
एखाद्या लाभार्थ्याला एखाद्या लाभार्थ्यांचा कव्हरेजच्या कालावधीत आणि पॉलिसी लागू असताना अपघात झाल्यास आणि अपघातात पूर्ण किंवा आंशिक अपंगत्व आल्यास त्याला योजनेअंतर्गत दावा अर्ज भरावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून सोबत पोलीस FIR, अपघाताची व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा अपघाताची छायाचित्रे सोबत जोडावी लागतील.
अपघाताचा कागदोपत्री पुरावा, तसेच सरकारी सिव्हिल सर्जन किंवा पात्र सरकारी ऑर्थोपेडिशियन यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, अपघातामुळे कायमस्वरूपी पूर्ण/अंशिक अपंगत्व प्रमाणित करणारे, योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या सदस्याच्या अवयवांचे नुकसान झाल्याचे नमूद करणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्तीसाठी दावा करण्याची प्रक्रिया
Procedure For Claiming a Scholarship In Aam Admi Bima Yojana
ज्या सदस्याचे मूल शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल त्यांनी सहामाही अर्ज भरावा आणि तो नोडल एजन्सीला सादर करावा. नोडल एजन्सी विद्यार्थ्यांची ओळख पटवेल.नोडल एजन्सी या बदल्यात लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी संबंधित P&GS युनिटला सादर करेल जसे की विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, वर्ग, सदस्याचे नाव, मास्टर पॉलिसी क्र., सदस्यत्व क्रमांक. आणि थेट पेमेंटसाठी NEFT तपशील.
प्रत्येक सहामाहीत, १ जुलै आणि १ जानेवारीसाठी, प्रत्येक वर्षी LIC शिष्यवृत्तीचे पेमेंट NEFT द्वारे लाभार्थी विद्यार्थ्याच्या खात्यात जमा करेल.