श्रावणबाळ अनुदान योजना माहिती 2022 : मिळवा ६००/- रुपये आर्थिक सहाय्य
Shravan Bal Yojana | Shravan Bal Anudan Yojana | Shravan Bal Yojana Maharashtra | Shravan Bal Anudan Yojana Maharashtra | Maharashtra Shrvan Bal Yojana | Shravan Bal Yojana Maharashtra | Maharashtra Shravan Bal Yojana
महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Shravan Bal Yojana आहे.या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गरजू,गरीब,आर्थिक दृष्ट्या कमजोर,निराधार वृद्ध व्यक्तींना ज्यांचे वय ६५ वर्ष व ६५ वर्षापेक्षा जास्त आहे अशा जेष्ठ नागरिकांना महाराष्ट शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेअंतर्गत आर्थिक सहायता केली जाते.
Shravan Bal Anudan Yojana
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या अथवा नाव नसलेल्या ६५ वर्ष व ६५ वर्षावरील जेष्ठ निराधार स्त्री पुरुषांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्टीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून प्रत्येक महिन्याला २००/- रुपयांची आर्थिक सहायता करण्यात येते.
या योजनेस पूरक असलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजने मधून प्रतिमहिना ४००/- रुपये रक्कम निवृत्तीवेतन अनुदान देण्यात येते म्हणजेच या योजनेअंतर्गत लाभार्थी जेष्ठ नागरिकास प्रतिमाह ६००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य दिले जाते.
महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना आर्थिक प्रोत्साहन देऊन या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य करणे आणि त्यांचे हाल कमी करून त्यांना आर्थिक सहाय्य्य करून त्यांना आर्थिक स्थेर्य प्राप्त करून देण्याचे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट्य आहे.
विशेष सूचना: आम्ही श्रावणबाळ अनुदान योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी व्यक्ती असतील जे श्रावणबाळ अनुदान योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण Shravan Bal Yojana योजना काय आहे, Shravan Bal Anudan Yojana उद्दिष्ट काय आहे, Shravan Bal Yojana Maharashtra वैशिष्ट्य काय आहेत, श्रावणबाळ अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे फायदे काय आहेत, Maharashtra Shravan Bal Yojana पात्रता काय आहे, Shravan Bal Yojana आवश्यक कागदपत्रे काय आहेत, Shravan Bal Yojana अर्ज करायची पद्धत, श्रावणबाळ अनुदान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.
योजनेचे नाव | Shravan Bal Yojana |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक |
लाभ | प्रतिमहिने ६००/- रुपये आर्थिक सहायत्ता |
योजनेची सुरुवात | २०१६ |
योजनेचे उद्दिष्ट्य | राज्यतील जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य्यता करणे |
या योजनेअंतर्गत गट अ आणि गट ब असे दोन गट करण्यात आले आहेत
Shravan Bal Anudan Yojana
गट अ – दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या जेष्ठ स्त्री व पुरुषांना या गटात समाविष्ट करण्यात आले आहे.
गट ब – दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव नसलेल्या जेष्ठ स्त्री व पुरुषांना या गटात समाविष्ट करण्यात आले आहे.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेचा उद्देश्य
Shravan Bal Yojana Purpose
- महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळात आर्थिक सहाय्य्य करणे जेणेकरून त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजेसाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये हा उद्देश्य समोर ठेवून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील वृद्ध नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- वृद्ध नागरिकांचा आर्थिक विकास करणे.
- वृद्ध नागरिकांचे त्यांच्या वृद्धपकाळात जीवनमान सुधारणे.
- वृद्ध नागरिकांचा सामाजिक विकास करणे
श्रावणबाळ योजनेची वैशिट्ये
Shravan Bal Yojana Features
- महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी श्रावणबाळ योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब वृद्ध नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
- श्रावणबाळ योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहेत त्यामुळे अर्जदार आपल्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदाराला शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार आणि ज्यामुळे अर्जदाराचे पैसे आणि वेळेची बचत होईल.
- श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे लाभार्थ्यास त्याच्या वृद्धपकाळात दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणारे फायदे
Shravan Bal Yojana Benefits
- या योजनेच्या माध्यमातून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभार्थ्यास २००/- रुपये आर्थिक सहाय्यता केली जाते तसेच श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यास ४००/- रुपये म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य शासनाचे एकूण मिळून ६००/- रुपये लाभार्थ्यास लाभ दिला जातो.
- या योजनेमुळे महाराष्ट्रातील वृद्ध नागरिक आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील
- या योजनेमुळे महाराष्ट्रातील वृद्ध नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागणार नाही.
- या योजनेमुळे जेष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक समस्येवर मात करतील.
श्रावणबाळ अनुदान योजनेची पात्रता
Shravan Bal Yojana Eligibility
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे
श्रावण बाळ योजनेच्या अटी
Shravan Bal Yojana Terms & Condition
- श्रावण बाळ योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच घेता येईल.
- श्रावण बाळ योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्ती १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात वास्तव्य करत असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय ६५ वर्ष व ६५ वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
- लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे नाव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे
- लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये २१०००/- पेक्षा जास्त नसावे.
- बीपीएल (BPL) श्रेणीत नसलेल्या जेष्ठ नागरिकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो.
- या योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांनाच घेता येणार आहे.
- महाराष्ट्र राज्याचं बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार व्यक्ती केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्या सरकारी योजनेअंतर्गत पेंशन योजनेचा लाभ घेत असल्यास अशा अर्जदाराचा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील कोण सदस्य जर सरकारी कर्मचारी असेल तर अशा अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजेसाठी आवश्यक कागदपत्रे
Shravan Bal Yojana Documents
- लाभार्थी व्यक्तीचा वयाचा दाखला (जन्माचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड)
- महाराष्ट्र राज्याचा १५ वर्ष वास्तव्याचा दाखला (डोमेसाइल प्रमाणपत्र/ग्रामपंचायत/नगरसेवक दाखला)
- उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न २१०००/- पेक्षा जास्त नसावे)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- पिवळे (BPL) रेशन कार्ड
- घरपट्टी पावती
- विजेचे बिल
- दारिद्र रेषेखालील कुटुंबाचे प्रमाणपत्र
- मतदान कार्ड
- मोबाईल नंबर
श्रावणबाळ योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
Shravan Bal Yojana Offline Registration Process
या योजनेच्या अधिक माहितीसाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालय/तलाठी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा व सादर योजनेअंतर्गत अर्ज घ्यावा व अर्जात विचारलेली माहिती भरून योग्य ती कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी सोबत जोडून अर्ज सादर करावा व अर्ज भरल्याची पोच पावती संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्यावी.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
Shravan Bal Yojana Online Registration Process
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर वर New User & Register Here वर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला OPTION १ आणि OPTION २ दिसतील तुम्ही ह्या दोन OPTION पैकी कोणत्याही OPTION ने अर्ज करू शकता.
OPTION १ चा पर्याय निवडल्यास: OPTION १ पर्याय निवडल्यास तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल मग तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल OTP टाकल्यानंतर तुम्हाला User Id आणि Password बनवता येईल
User Id आणि Password बनवल्यानंतर तुम्हाला Login करून या योजने अंतर्गत विचारलेली तुमची सर्व माहिती (Photo,Identy Proof,Address Proof,Bank Account,IFSC Code,Email इत्यादी) भरावी लागेल.
OPTION 2 चा पर्याय निवडल्यास: OPTION १ पर्याय निवडल्यास तुम्हाला या योजने अंतर्गत विचारलेली तुमची सर्व माहिती (Photo,Identy Proof,Address Proof,Bank Account,IFSC Code,Email इत्यादी) भरावी लागेल नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल मग तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल OTP टाकल्यानंतर तुम्हाला User Id आणि Password बनवता येईल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत व सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत केलेल्या अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया
Shravan Bal Yojana Status
- सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- तुमच्या समोर जे होमपेज ओपन होईल त्याच्यावर Track Your Application वर क्लिक करावे लागेल.
- तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक टाकून Go वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्यासमोर दिसेल.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया
hravan Bal Yojana Beneficiary List
- सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होमपेज ओपन होईल त्याच्यावर असलेल्या लाभार्थी यादी वर क्लिक करावे.
- आता तुम्हाला तुमचा जिल्हा/गाव/ब्लॉक निवडावे लागेल व सबमिट वर क्लिक करावे लागेल.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची यादी तुमच्या समोर उपलब्ध होईल.
अधिकृत वेबसाईट | Click Here |
टोल फ्री क्रमांक | १८००-१२०-८०४० |
महाराष्ट्र शासनाचा निर्णय | डाउनलोड |
Join Telegram Channel | Click Here |