मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणेची योजना 2022
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra | मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणेची योजना | मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजना
केंद्र सरकार तसेच सर्व राज्यातील सरकारे आपल्या आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजनांची सुरुवात करते असते.त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्नात असते त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते.आज आम्ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाऊन घेणार आहोत ज्या योजनेचे नाव मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणेची योजना आहे.
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra
राज्यातील बहुतांश शेतकरी हे गरिबी रेषेखाली जीवन जगत असतात त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते.शेतीसाठी लागणारी बियाणे,खते तसेच इतर गोष्टींसाठी त्यांना पैशांची गरज असते त्यासाठी शेतकरी बँक,वित्त संस्था किंवा साहुकाराकडून कर्ज घेतात व पारंपरिक पद्धतीने शेती करतात.पारंपरिक पद्धतीने शेती करताना ती हाताने केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते तसेच पारंपरिक पद्धतीने शेती करताना खूप वेळ लागतो व शेतीची कामे मंद होतात. आजच्या आधुनिक दुनियेत शेतीच्या कामासाठी यंत्र सामग्रीचा वापर वाढला आहे ज्यामुळे शेतीची कामे कमी वेळात जळत गतीने केली जातात.परंतु पुष्कळ शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याकारणामुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्र सामग्री विकत घेणे शक्य नसते त्यामुळे ते पिढ्यान पिढ्या पारंपरिक पद्धतीने शेती करत असतात.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणेची योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे या योजनेअंतर्गत राज्यातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता रु.3.१५ लाखांची आर्थिक मदत करण्यात येते.
विशेष सूचना: आम्ही मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटातील शेतकरी असतील व मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यास इच्छुक असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
योजनेचे नाव | मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
योजनेची सुरुवात | २०१२ – २०१३ |
लाभार्थी | राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील शेतकरी |
लाभ | 90 टक्के अनुदान (३.१५ लाखांची आर्थिक मदत) |
उद्देश्य | मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणेची योजनेचा उद्देश
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra Purpose
- राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करणे हा मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणेची योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त अशा यंत्र सामग्री च्या खरेदीसाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारणे
- शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांचे राहणीमानात बदल व्हावा, या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती करण्यासाठी प्रेरित करणे.
- शेतकऱ्यांचा वेळ आणि पैशांची बचत करणे.
- राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनविणे.
- शेती क्षेत्रात आधुनिकीकरणाचा वापर वाढविणे.
- शेतीची कामे जलद करणे.
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजनेची वैशिष्ट्ये
Mini Tractor Anudan Yojana Features
- राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करणे हा मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी एक योजना आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास तसेच ते सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास सदर योजना महत्वपूर्ण ठरेल.
- राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळण्यास सदर योजना महत्वपूर्ण ठरेल.
- मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजनेची अर्ज प्रक्रिया ऑफलाईन व ऑनलाईन करण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो ज्यामुळे अर्जदाराला कोणत्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे अर्जदार शेतकऱ्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता रु.3.१५ लाखांची आर्थिक मदत करण्यात येते.
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजनेअंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य
बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता रु.3.१५ लाखांची आर्थिक मदत करण्यात येते.
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव
अनूसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेचे लाभार्थी
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra Beneficiary
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटातील शेतकरी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra 2022
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर)
खरेदी करण्यात येणारे मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या किमती पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra Subsidy
साधन | ब्रँड | किंमत रुपये |
मिनी ट्रॅक्टर – युवराज २१५ | महिंद्रा अँड महिंद्रा | २,४३,६९२/- रुपये |
1.5 टन नॉन टीपीग ट्रेलर | महिंद्रा अँड महिंद्रा | ५३,९१६/- रुपये |
०.८ मी रोटा व्हेटर | महिंद्रा अँड महिंद्रा | ५२.३९२/- रुपये |
एकूण | ३.५०,०००/- रुपये |
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेचे लाभ
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra Benefits
- मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा केला जातो.
- या योजनेअंतर्गत बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता रु.3.१५ लाखांची आर्थिक मदत केली जाते.
- राज्यातील शेतकरी या योजनेअंतर्गत सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
- राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
- मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
- राज्यातील नागरिक शेती करण्यासाठी प्रेरित होतील.
- शेतीती आधुनिक यंत्रांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना पारंपारिक पद्धतीने शेती करण्याची आवश्यकता भासणार नाही व यंत्र सामग्रीमुळे शेतीची कामे जलद गतीने केली जातील ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल..
- या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल.
- बचत गटास किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यात येणार आहे
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत पात्रतेचे निकष
Maharashtra Mini Tractor Anudan Yojana
- अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.
- स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.
- स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती वा नवबौध्द घटकांतील असावेत.
- मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रू.३.५० लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या ९० टक्के (कमाल रू.३.१५ लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
- लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांनी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा जादा अशशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल मात्र त्याची या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना (रु.३.१५ लाख) पेक्षा जास्तची रक्कम संबंधित बचत गटाने स्वत: खर्च करावी.
- स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न करावे.
- संबंधित जिल्हयातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे जिल्हयातील इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांकडून जाहिरातींद्वारे अर्ज मागवतील. उपलब्ध तरतुदीच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त असल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी पारदर्शक पध्दतीने (लॉटरी पध्दत) लाभार्थ्यांची निवड करावी. निवड करण्यात आलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांची नावे व पत्ते जिल्हा कार्यालयाच्या फलकांवरती लावण्यात यावीत व त्याची प्रत आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे सादर करण्यात यावी.
- निवड झालेल्या बचत गटाला निवड झाल्याचे लेखी कळविण्यात येईल. ज्या स्वयंसहाय्यतांना बचत गटांची निवड करण्यात आलेली आहे त्यांनी सदरहू यंत्र चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- निवड झालेल्या बचत गटांनी वर नमूद केलेल्या कार्यपध्दतीतील अनुक्रमांक १ (उ) नुसार कार्यवाही झाल्यानंतर संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त सदरचे अनुदान बचत गटाच्या बँक खात्यामध्ये जमा करतील. तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे मूळ पावती (ओरीजनल रिसिट) आयुक्त समाज कल्याण/शासनाला सादर करतील.
- बचत गटाने खरेदी केलेल्या मिनी ट्रॅक्टरच्या/ ट्रॅक्टरच्यादर्शनी भागावर महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसुचित जाती उपयोजनेंतर्गत अर्थसहाय्य असे ठळकपणे लिहिण्यात
- यावे.
- प्रत्येक जिल्हयामध्ये किती स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचे वाटप करावे याबाबत शासनाकडून स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
- या योजनेंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने त्यांना देण्यात आलेला मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इतर शेतक-यांना भाडेतत्वावर देऊ शकेल मात्र कोणत्याही परिस्थितीत त्याला मिनी ट्रॅक्टर/ ट्रॅक्टर व त्याची उपसाधने विकता येणार नाही अथवा सावकार किंवा अन्य व्यक्तीकडे गहाण ठेवता येणार नाही. लाभार्थ्यांने मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर विकल्यास किंवा गहाण ठेवल्यास सदर व्यवहार बेकायदेशीर ठरवून स्वयंसहाय्यता बचत गटांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच संबंधित स्वयंसहाय्यता बचत गटांकडून शासनाने मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीसाठी खर्च केलेली संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येईल आणि संबंधित स्वयंसहाय्यता बचत गटांना शासनाच्या अन्य योजनांचे लाभ घेण्यास किमान ५ वर्षे अपात्र ठरविले जाईल. तशा आशयाचे हमी पत्र स्वयंसहाय्यता बचत गटांकडून घेण्यात यावे.
- ज्या स्वयंसहाय्यता बचत गटांना या योजनेंतर्गत मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचे वाटप करण्यात आले आहे. अशा स्वयंसहाय्यता बचत गटांनी किमान १० वर्षे तो मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने उपयोगात आणावेत या हेतूने मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळाल्यापासून किमान १० वर्षापर्यंत स्वत:हून दरवर्षी १० मे पूर्वी संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना नोंदणीकृत डाकेने पत्र पाठवून त्याला देण्यात आलेला मिनी ट्रॅक्टर/ ट्रॅक्टर व त्याची उपसाधने विकला नसल्याचे किंवा गहाण ठेवला नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे.
- ज्या लाभार्थ्यांना पावर ट्रिलरचा लाभ दिला आहे त्या लाभार्थ्यांना या योजनेचा पुन्हा लाभ घेता येणार नाही.
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेच्या अटी व शर्ती
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra Terms And Condition
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी हा नुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे.
- स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८०% सदस्य हे अनुसूचित जाती वा नवबौद्ध घटकातील असावेत तसेच अध्यक्ष, सचिव, अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत
- ट्रॅक्टर व त्याच्या उप्साधानांच्या खरेदीवर रु. 3.१५ लाख शासकीय अनुदान अनुञेय राहील.
- ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.
- मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख (अक्षरी रक्कम रुपये तीन लाख पन्नास हजार फक्त.) इतकी राहील,
- स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.
- या योजनेअंतर्गत ज्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देण्यात येईल त्यांना मिनी ट्रॅक्टर हा विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही.
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra Documents
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खात्याचा तपशील
- बचत गटाचे प्रमाण पत्र
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra Registration
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जावे लागेल.
- जिल्हा कार्यालयात समाज कल्याण विभागात सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील.
- व भरलेला अर्ज त्याच कार्यालयात जमा करावा.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra Apply Online
पहिले चरण:
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर तुम्हाला सर्वात प्रथम स्वतःचे रेजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक रेजिस्ट्रेशन अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती (Full Name,10 Digit Mobile Number (Without 0 or +91),AADHAR Card No,Email ID,बचत गटाचे नाव इत्यादी) भरावी लागेल.
- अशा प्रकारे तुमची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल
दुसरे चरण:
- अर्जदाराला त्याचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Join |
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेची अधिकृत वेबसाईट | Click Here |
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra Contact Number | Click Here |