शेतकरी प्रमाणपत्र: Online/Offline अर्ज कागदपत्रे, फायदे, संपूर्ण माहिती

 

शेतकरी प्रमाणपत्र: Online/Offline अर्ज कागदपत्रे, फायदे, संपूर्ण माहिती


नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये शेतकरी असल्याचा दाखला कसा आणि कुठे काढायचा या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. कोरोना काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय यांनी सावरल्याच सामोरे आलं होतं.

तर मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र कुठं आणि कसं काढायचं, शेतकरी प्रमाणपत्र चे फायदे कोणते. जर तुम्ही कृषी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेत असाल, तर शेतकरी असल्याचा दाखला सादर केल्यास कोणते फायदे तुम्हाला मिळतील. जमीन खरेदी करताना देखील शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कसा करायचा आणि पंधरा दिवसांमध्ये शेतकरी प्रमाणपत्र कसे मिळवायचे हे आज या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

shetkari dakhla online maharashtra: farmer certificate online apply

शेतकरी प्रमाणपत्र कुठे मिळते?

शेतकरी प्रमाणपत्र तुम्हाला तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले आपले सरकार पोर्टल यावर देखील उपलब्ध होऊ शकते. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही शेतकरी प्रमाणपत्र मिळवू शकता. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार पोर्टल या संकेतस्थळाला भेट देऊन शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

ओळखीचा पुरावा

पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र ओळखीचा पुरावा म्हणून वापरू शकता.

पत्त्याचा पुरावा

आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल, पाणीबिल, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, घरफळा पावती, सात बारा किंवा आठ अ उतारा यापैकी कोणतेही एक कागदपत्र असणे आवश्यक आहे.

इतर कागदपत्र

अर्जदार शेतकऱ्याला शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्याच्या जमिनीचा ७/१२ उतारा किंवा ८ अ उतारा असणे आवश्यक आहे.

स्वयंघोषणापत्र

शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याला स्वयंघोषणापत्र भरून द्यावे लागेल. हे अर्जदाराला अर्जासोबत भरून देणे अनिवार्य आहे.

ऑफलाईन अर्ज कसा करायचा?

वरील सर्व कागदपत्रे तहसीलदार कार्यालयात सादर केल्यास किंवा आपले सरकार पोर्टल वर सादर केल्यास केल्यानंतर पंधरा दिवसांच्या कालावधीत शेतकरी प्रमाणपत्र मंजूर होईल

Farmer Certificate ऑनलाईन आपले सरकार पोर्टल वरून अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम तुम्हाला आपले सरकार https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • या अधिकृत संकेतस्थळावर नवीन वापरकर्ता नोंदणी (New Registration) या लिंक वरून नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन करून तुम्हाला लॉगिन करून घ्यावे लागेल.
  • लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील. त्यातून तुम्हाला महसूल विभाग निवडायचा आहे.
  • पुढे शेतकरी प्रमाणपत्र हा पर्याय निवडायाचा आहे.
  • आता तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल. ज्यामध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी असेल. त्यानंतर ती सर्व कागदपत्रे तुम्हाला या वेबसाईट वरती अपलोड करावी लागतील.
  • वेबसाईट वर जाऊन तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षापासून तुम्ही त्या पत्त्यावर राहता ही माहिती भरावी लागेल.
  • अपलोड करावयाची कागदपत्रे ७५ केबी ते ५०० केबी या दरम्यान असणे आवश्‍यक आहे.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला फोटो आणि सही देखील अपलोड करावी लागेल.
  • यानंतर अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल आणि अर्ज सबमिट करावा लागेल.
  • या अर्जाची पावती तुम्हाला ऑनलाईन मिळेल, ती तुमच्याकडे सेव करून ठेवावी लागेल.

१५ दिवसांच्या आत शेतकरी प्रमाणपत्र मिळवा.

आपले सरकार पोर्टल वरती अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसांपर्यंत अर्जदार शेतकऱ्याला शेतकरी प्रमाणपत्र मिळेल. काही अडचणीमुळे पंधरा दिवसानंतर हि प्रमाणपत्र न मिळाल्यास आपले सरकार पोर्टल वरती लॉगिन करून अपील अर्ज सादर करा.

Post a Comment

Previous Post Next Post