Inwell Borewell Anudan Yojana Best | शेतकऱ्यांनो आता इनवेल बोअरिंग साठी मिळणार 20 हजार रुपये ! असा करा अर्ज

 

Inwell Borewell Anudan Yojana Best | शेतकऱ्यांनो आता इनवेल बोअरिंग साठी मिळणार 20 हजार रुपये ! असा करा अर्ज

Inwell Borewell Anudan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या शेताला पाणी द्यायचे म्हटले की शेतकऱ्यांकडे विहीर शेततळे असे वेगवेगळे सिंचन पद्धती असतात. त्यात आणखी एक म्हणजे शेतकरी हा बऱ्याच वेळेस बोरवेल मधील पाणीही वापरतो याचा विचार करता.


शेतकऱ्यांना शासनाचा बोरवेल घेण्यासाठी 20000 रुपयांपर्यंत अनुदान देणार आहे. तर हे अनुदान मिळवायचे कसे यासाठी अर्ज कुठे करायचा अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहे. हे सर्व आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेविषयी सविस्तर माहिती मिळेल.

Inwell Borewell Anudan Yojana Purpose :- 

शेतीसाठी सिंचन खूप अत्यावश्यक असून सिंचनाची व्यवस्थापन करताना शेतामध्ये विहीर किंवा बोरवेल असणे खूप गरजेचे आहे. शासनाकडून शेतीला पाणीपुरवठा साठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल व त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल त्यामागचा उद्देश असतो.


बोअरवेल साठी मिळणार 20 हजार रु 

शेतकऱ्यांना बरेच वेळा बोरवेल घेण्यासाठी पुरेशी भांडवल उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना बोरवेल हा घेता येत नाही. अशा शेतकऱ्यांना (Inwell Borewell Anudan Yojana) अनुदान देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याची काम शेतकरी या योजनेअंतर्गत करत आहे.

पात्रता

1-योजनेचा लाभ घेण्यासाठी सदरील व्यक्ती अनुसूचित,एस सी जाती प्रवर्गातील असणे आवश्यक

2- व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न मर्यादा एक ते दीड लाखांपर्यंत

3- जमिनीचा सातबारा व आठ अ चा उतारा तसेच उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक

4- योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्ती कडे 0.20 हेक्टर ते सहा हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक

आवश्यक कागदपत्रे

1- नवीन विहिरी साठी सक्षम प्राधिकारी कडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र

2- सातबारा व आठ अ चा उतारा

3- वार्षिक उत्पन्नाचा दाखला

4- लाभार्थी अपंग असेल त्याचा पुरावा

5- शेत जमिनीचा दाखला आणि विहीर नसल्याचे प्रमाणपत्र

6- विहीर असेल तर विहीर सर्वे नंबर नकाशा व चतुर सीमा

7- भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे पाणी उपलब्ध असल्याचा दाखला

8- कृषी अधिकाऱ्यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र असणे आवश्यक

9- गटविकास अधिकार्‍याचे शिफारस पत्र व जागेचा फोटो


               इनवेल बोरिंग चा अर्ज करण्यासठी येथे क्लिक करा 

Post a Comment

Previous Post Next Post