Soyabean Tokan Yantra Soyabean Tokan Yantra Application Form

 

Soyabean Tokan Yantra

Soyabean Tokan Yantra Application Form

Soyabean Tokan Yantra Apply Here

सोयाबीन टोकण यंत्राचा तपशील आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा ते या पानावर थोडक्यात दिले आहे. 

अल्प व अत्यल्प जमीन असलेल्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी (पेराणी) करणे परवडत नाही.

अशा शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत ५०% अनुदानावर सोयाबीन टोकन यंत्र दिले जाते. आता शेतकऱ्यांना

सोयाबीन टोकन मशीनसाठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे. सोयाबीन टोकन मशीनसाठी अर्ज करण्यासाठी

शेतकऱ्यांनी प्रथम सर्व आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती घ्याव्यात. शेतकऱ्यांनी संबंधित कागदपत्रे 

आणि अर्ज तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद/पंचायत समिती येथे जमा करावेत. अर्ज सादर केल्यानंतर

लाभार्थ्यांची निवड झाल्यास, लाभार्थ्यांना त्यांच्या आवडीचे सोयाबीन टोकन यंत्र खुल्या बाजारातून खरेदी 

करून पुढील एक महिन्यात सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर

माहिती.

soyabeen tokan yantr

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ योजनेंतर्गत मिळणार निम्म्या किंमतीत सोयाबीन टोकण यंत्र

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. येथे देशातील जवळपास 65 टक्के नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करण्यास मदत मिळेल. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करणे परवडण्याजोगे नसते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत 50 टक्के अनुदानावर सोयाबीन टोकन यंत्र दिलं जातं. आता शेतकऱ्यांना सोयाबीन टोकन यंत्रासाठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Soyabean Tokan Anudan Yojana Details

50 टक्के अनुदानावर सोयाबीन टोकण यंत्र

  • शेतकऱ्यांना जिल्हा परिषद लातूर सेस फंडाअंतर्गत सोयाबीन टोकण यंत्र 50 टक्के अनुदानावर डी.बी.टी तत्वावर देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते. शेतकऱ्यांनो दिवाळीच्या मुहूर्तावर घरी आणा नवा ट्रॅक्टर! सरकारकडून मिळणार 50 टक्के अनुदान, त्वरित घ्या लाभ.
  • या योजनेसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयाकडे वर दिलेल्या कागदपत्रासह अर्ज करण्याचे अवाहन कृषि विकास अधिकारी व मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. तसेच शेतकरी महाडीबीटी फार्मर पोर्टल या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Required Documents for Soyabean 50% Anudan

आवश्यक कागदपत्रे

  1. 7 /12, 8-अ
  2. आधार कार्ड
  3. बँक पासबुकाच्या झेरॉक्स
  4. अनु. जाती, अनु. जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र
  5. अपंग लाभार्थीसाठी अपंगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतिसह आपल्या पंचायत समितीकडे अर्ज करावा लागेल.

How to Apply for this Scheme

त्वरित करावा अर्ज

  1. सोयाबीन टोकन यंत्रासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी वरील नमून सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढून घ्याव्यात. आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद / पंचायत समिती या ठिकाणी संबंधित कागदपत्रे व अर्जाचा नमुना दाखल करावा.
  2. अर्ज दाखल केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड झाल्यास पुढील एक महिन्यात लाभार्थ्यांनी खुल्या बाजारातून आपल्या पसंतीने सोयाबीन टोकन यंत्र खरेदी करून त्याबद्दलची सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.

Benefits of Soyabean Tokan anudan

सोयाबीन टोकन यंत्राचे फायदे

  1. अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सोयाबीन टोकन यंत्र खूपच उपयोगाचे आहे.
  2. कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन टोकन यंत्राचा चांगलाच फायदा होतो.
  3. बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पेरणी करते वेळेस सोयाबीन टोकण यंत्र महत्त्वाची भूमिका बजावतो.

Soyabean Tokan Yantra Anudan

सोयाबीन टोकन यंत्र अनुदान

  1. खरेदी करावयाची अवजारे अधिकृत सक्षम संस्थांनी तपासणी व परीक्षण करून BSI अथवा संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार / तांत्रिक निकषानुसार असावीत.
  2. अशा प्रकारच्या यंत्रणा 50 टक्केपर्यंत अनुदान देण्यात येईल.
  3. ज्याची कमाल मर्यादा 10,000 रुपयापर्येंत असते, म्हणजेच साधारणतः सोयाबीन टोकन यंत्र बाजारामध्ये ७ हजारांपासून ९ हजारपर्येंत उपलब्ध होतो.
  4. या रकमेच्या ५० टक्के म्हणजेच जवळपास शेतकऱ्यांना सोयाबीन टोकन यंत्रासाठी ३५०० रु ते ४५०० रु अनुदान देण्यात येतं.
  5. सोयाबीन टोकन यंत्रासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाल्यास, लक्षांकानुसार सोडत पद्धतीने संबंधित पंचायत समिती स्तरावर करण्यात येईल.
  6. पात्र लाभार्थ्यांना टोकन यंत्र अनुदान त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर हस्तांतरित ( Bank Transfer ) करण्यात येईल.

Online Apply for Soyabean Tokan Anudan yojana

  1. सोयाबीन टोकन यंत्र Mahadbt पोर्टलच्या माध्यमातूनसुध्दा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जातं.
  2. त्यामुळे तुम्हाला Mahadbtmahait farmer च्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येतो.

إرسال تعليق

أحدث أقدم