मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र 2022 : Mulching Paper Yojana

 

मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र 2022 : Mulching Paper Yojana


Mulching Paper Yojana | Mulching Paper Yojana Maharashtra | Mulching Paper Scheme | मल्चिंग पेपर योजना | मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र | मल्चिंग पेपर अनुदान योजना | Mulching Paper Anudan Yojana

महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते.महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी अशीच एक योजना घेऊन आली आहे ज्या योजनेचे नाव Mulching Paper Yojana आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान देते.

Mulching Paper Yojana

अलीकडच्या काळात शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे परंतु राज्यात पुष्कळ शेतकरी दारिद्र रेषेखाली आपले जीवन जगत आहेत. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे शेतकरी अजून सुद्धा पारंपरिक पद्धतीने शेती करतात या सर्व गोष्टींचा विचार करून सरकार शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी आर्थिक सहाय्य करत असते तसेच शेती उपयुक्त विविध यंत्रांच्या खरेदीसाठी अनुदान देत असते.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी शेतातील जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाय योजनांचा वापर करत असतो तसेच शेतकऱ्यांना कीटकांचा प्रादुर्भाव तसेच नैसर्गिक आपत्ती सारख्या समस्यांना कायम तोंड द्यावे लागते.या सर्व गोष्टींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी मल्चिंग पेपर चा वापर एक उपयुक्त पर्याय समजला जातो परंतु बाजारातून मल्चिंग पेपर विकत घेण्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात. आर्थिक अडचणीमुळे सर्वच शेतकरी त्यांच्या शेतामध्ये मल्चिंग पेपर वापरू शकत नाहीत. यासाठी सरकार ने मल्चिंग पेपर योजनेची सुरुवात केली आहे. मल्चिंग पेपर चे फायदे लक्षात घेता अलीकडच्या काळात याचे फायदे वाढले आहेत.

विशेष सूचना: आम्ही मल्चिंग पेपर योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी शेतकरी असतील जे मल्चिंग पेपर योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण मल्चिंग पेपर योजना काय आहे, Mulching Paper Yojana उद्दिष्ट काय आहे, Mulching Paper Anudan Yojana वैशिष्ट्य काय आहेत, Mulching Paper Scheme फायदे काय आहेत, Mulching Paper Yojana Maharashtra पात्रता काय आहे, Mulching Paper Yojana आवश्यक कागदपत्रे काय आहेत, Mulching Paper Yojana अर्ज करायची पद्धत, मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

योजनेचे नावMulching Paper Yojana
विभागकृषी विभाग
राज्यमहाराष्ट्र
योजना कोणी सुरु केलीमहाराष्ट्र शासन
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभ50 टक्के अनुदान देण्यात येते
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

मल्चिंग पेपर योजनेचा उद्देश्य

Mulching Paper Yojana Purpose

  • गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी शेतातील जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाय योजनांचा वापर करत असतो तसेच शेतकऱ्यांना कीटकांचा प्रादुर्भाव तसेच नैसर्गिक आपत्ती सारख्या समस्यांना कायम तोंड द्यावे लागते.या सर्व गोष्टींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी मल्चिंग पेपर चा वापर एक उपयुक्त पर्याय समजला जातो त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या उद्देशाने मल्चिंग पेपर योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे.
  • शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर साठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता पडू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये यासाठी मल्चिंग पेपर योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • शेतकऱ्याच्या पिकांचे रक्षण करून त्यांचा आर्थिक नफा करणे.
Malching Paper Yojana

मल्चिंग पेपर योजनेची वैशिष्ट्ये

Mulching Paper Yojana Features

  • मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण योजना आहे.
  • विशेष करून भाजीपाला लागवडीसाठी मल्चिंग पेपर चा वापर वाढत चालला आहे.
  • मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी घरी बसून ऑनलाईन अर्ज शकतील व त्यांना कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची स्थिती पाहू शकतो.
  • या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास व राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल.
  • मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल जेणेकरून या योजनेत पारदर्शकता बनून राहील.
  • राज्यातील शेतकरी शेती करण्यास प्रोत्साहित होतील.

मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान

Subsidies To Farmers Under Mulching Paper Scheme

  • सर्वसाधारण प्रती हेक्टर जागेसाठी मल्चिंग पेपर वापरासाठी 32000/- रुपये खर्च येतो व या योजनेअंतर्गत शासनाकडून 50 टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 2 हेक्टर जागेत मल्चिंग पेपर वापरासाठी अनुदान देण्यात येते.
  • डोंगराळ भागासाठी मल्चिंग पेपर वापरासाठी 36800/- रुपये खर्च समजून 50 टक्के अनुदान देण्यात येते.

मल्चिंग पेपर अनुदान योजनेअंतर्गत श्रेणीनुसार आरक्षण

Mulching Paper Yojana Maharashtra

  • अनुसूचित जातींना १६ टक्के आरक्षण
  • अनुसूचित जमातींना ८ टक्के आरक्षण
  • आदिवासी महिलांना ३० टक्के आरक्षण

पिकांप्रमाणे प्लास्टिक मल्चिंग पेपर चा वापर

Mulching Paper Usage

बाजारात सध्या मल्चिंग पेपर वेगवेगळ्या रंगात आणि जाडीत उपलब्ध आहेत.ज्यांचा वापर वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळा वापरला जातो.

  • 3 ते 4 महिने कालावधी असलेल्या भाजीपाला, स्ट्राबेरी अशा पिकांना संरक्षण देण्यासाठी 25 मायक्रॉन जाडीचे यु.व्ही स्टॅबिलाइज्ड फिल्म चा पेपर गरजेचा आहे.
  • 11 ते 12 महिने कालावधी असलेल्या पपई अशा मध्यम कालावधी च्या पिकांना संरक्षण देण्यासाठी 50 मायक्रॉन जाडीचे यु.व्ही स्टॅबिलाइज्ड फिल्म चा पेपर गरजेचा आहे.
  • 11 ते 12 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी च्या पिकांना संरक्षण देण्यासाठी 100/200 मायक्रॉन जाडीचे यु.व्ही स्टॅबिलाइज्ड फिल्म चा पेपर फायद्याचा ठरतो.

मल्चिंग पेपर अनुदान योजनेचे लाभार्थी

Mulching Paper Subsidy Scheme Beneficiary

  • वयक्तिक शेतकरी
  • शेतकरी समूह
  • शेतकरी उत्पादन कंपनी
  • बचत गट
  • सहकारी संस्था

मल्चिंग पेपर योजनेचे लाभ

Mulching Paper Yojana Benefits

मल्चिंग पेपरचे शेतीमध्ये अनेक फायदे आहेत त्यामुळे अनेक शेतकरी शेतीमध्ये मल्चिंग पेपरचा उपयोग करतांना दिसत आहेत. विशेषतः भाजीपाला पिकांसाठी मल्चिंग पेपरचा खूप मोठ्या प्रमाणत उपयोग केला जातो.
जाणून घेऊया मल्चिंग पेपर चे फायदे

  • फळझाडे, भाजीपाला तसेच वेगवेगळ्या पिकांभोवती Plastic Mulching Paper चे आच्छादन केल्यामुळे पाण्याचा बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास टाळता येतो.
  • पिकांभोवती Plastic Mulching Paper चे आच्छादन केल्यामुळे कीड-रोगराईपासून पिकांचे संरक्षण होते.
  • मल्चिंग पेपर च्या वापरामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
  • मल्चिंग फिल्म जमिनीचे तापमान वाढते त्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते.
  • मल्चिंग पेपर च्या सहाय्याने जमिनीत होणाऱ्या पिकांस हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव केला जातो.
  • मल्चिंग पेपर च्या वापरामुळे पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळता येते.
  • Mulching Paper च्या वापरल्यामुळे शेतामध्ये मल्चिंग पेपरखाली सूर्यकिरण पोचत नसल्याने झाडे आणि रोपट्यांच्या भोवती जास्त प्रमाणत तण होत नाही परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाचतो.
  • Mulching  Paper च्या प्रकाश परिवर्तनामुळे काही किडी दूर जातात.
  • आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते, ज्यात कार्बोन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक असते.
  • पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप थांबते.
  • राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल.
  • शेतकऱ्याचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

प्लास्टिक मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत लाभ वितरण कार्यप्रणाली

Mulching Paper Yojana

अर्जदाराने शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज केल्यानंतर किंवा ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच स्वतः कृषी कार्यालयात जाऊन या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर
तालुका कृषी अधिकारी सदर अर्जाची आणि जोडलेल्या कागदपत्रांची पाहणी करतील व या योजनेसाठी पात्र ठरवतील.
तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर लाभार्थ्याने मल्चिंग पेपर ची खरेदी करावी.
त्यानंतर अनुदानाची रक्कम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी स्तरावरून PFMS प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

मल्चिंग पेपर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Mulching Paper Yojana Documents

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • 7/12 8अ
  • बँकेचे पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो

मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Mulching Paper Yojana Online Application Process

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर आधार कार्ड किंवा तुमच्या Username ने लॉगिन करावे.
Malching Paper Yojana Home Page
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये अर्ज करा वर क्लिक करावे लागेल.
Malching Paper Yojana Apply
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात फलोत्पादन मध्ये बाबी निवड बटनावर क्लिक करावे लागेल.
Malching Paper Yojana Babi Nivda
  • आता तुमच्या समोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये सर्व माहिती भरून झाल्यावर जतन करा वर क्लिक करावे लागेल.
Malching Paper Yojana Application Form
  • अशा प्रकारे तुमची मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल

मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

Mulching Paper Yojana Offline Application Process

अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या जिल्हा कार्यालयात जाऊन संबंधित कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल व मल्चिंग पेपर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.


शासनाची अधिकृत वेबसाईटClick Here
हेल्पलाईन नंबर०२२-४९१५०८००

Post a Comment

Previous Post Next Post