सौभाग्य योजना 2022: मोफत वीज कनेक्शन योजना

सौभाग्य योजना 2022: मोफत वीज कनेक्शन योजना

सौभाग्य योजना 2022 | Saubhagya Yojana 2022 Maharashtra | Saubhagya Yojana in Marathi | Mahavitran Vij Connection Yojana | मोफत वीज कनेक्शन योजना 2022 | Pm Saubhagya Yojana

 

भारतातील गरीब लोकांना मोफत वीज उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौभाग्य योजना सुरू केली. आपल्या सर्वांना माहितच आहे की आजच्या युगात वीज ही प्रत्येकाची महत्वाची गरज आहे, विजेशिवाय जगणे शक्य नाही, परंतु आपल्या देशात अजून सुद्धा असे काही विभाग आहेत ज्या भागात अजून सुद्धा वीज पोहोचलेली नाही. याचे कारण म्हणजे ते विभाग आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत. याच उद्देशाने भारतातील सर्वांनाच वीज कनेक्शन मिळावे म्हणून मोदीजींनी प्रधानमंत्री सौभाग्य योजना सुरू केली आहे. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Pm Saubhagya Yojana 2022 बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत, जसे की या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि ऑनलाइन अर्ज कसा करायचा, तरी विनंती आहे की आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचावा.

 

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

योजनेचे नाव

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

कोणी सुरू केली

श्री नरेंद्र मोदीजी

लाभार्थी

देशातील सर्व गरीब नागरिक

उद्देश

देशातील प्रत्येक घरात वीज पुरवठा उपलब्ध करून देणे

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन आणि ऑफलाइन

PM Saubhagya Yojana 2022

गरीब कुटुंबांना लाभ मिळावा या उद्देशाने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात पीएम सौभाग्य योजना सुरू केली गेली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक आर्थिक व जाती जनगणना २०११ मध्ये ज्यांची माहिती निवडली गेली आहे अशा लोकांना मोफत वीज कनेक्शन दिले जातील. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेंतर्गत एसईसीसी २०११ च्या यादीमध्ये ज्यांची नावे उपलब्ध आहेत त्यांना सरकारकडून मोफत वीज कनेक्शन दिले जाईल. तसेच ज्या लोकांची नावे सामाजिक-आर्थिक जनगणनेत समाविष्ट नाहीत, त्यांना वीज कनेक्शन देखील प्रदान केले जाईल, परंतु या कनेक्शनसाठी त्यांना फक्त 500 रुपये भरावे लागतील, आणि जे लोक एकत्र 500 रुपये भरू शकत नाहीत ते 10 हप्त्यांमद्धे सुद्धा ते भरू शकतात. म्हणजेच प्रती महिन्याला 50 रुपये.

 

सौभाग्य योजनेचा उद्देश

आपल्या सर्वांना माहितच आहे की आजच्या काळात वीज ही एक गरज बनली आहे, परंतु आपल्या देशात अशी काही माणसे आहेत ज्यांच्या घरात अद्याप वीज उपलब्ध नाही. देशातील असे विभाग आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत आहेत, त्यांच्या घरात विजेचे कनेक्शन घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, विजेचा अभाव ही देखील एक मोठी समस्या आहे आणि त्याशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. ही समस्या लक्षात घेता पंतप्रधान सहमंत्री बिजली हर घर योजनेंतर्गत आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम सौभाग्य योजना सुरू केली, सरकारकडून या वर्गाला विनाशुल्क वीज कनेक्शन दिले जाईल. या वर्गाच्या लोकांना म्हणजेच गरीब व्यक्तीला मोफत वीज कनेक्शन मिळणार आहे, ते विजेचा वापर करून आपले जीवन सुखी बनवतील आणि आरामात जगू शकतील.

 

PM Saubhagya Yojana Important Terms

·         Pradhanmantri Saubhagya Yojana 2022 नुसार देशातील ज्या भागात अद्याप वीज तारा पोहोचलेल्या नाहीत, तेथे केंद्र सरकार सोलर पॅनल उपलब्ध करून देईल, ज्याच्या मदतीने LED एलईडी बल्ब व पंखा चालू शकतील.

·         केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत दुर्गम भागात म्हणजे विद्युत नसलेल्या भागातील घरांसाठी, बॅटरी , २०० ते ३०० Watt चा सौर उर्जा पॅनल तसेच LED एलईडी बल्ब, एक डीसी फॅन आणि एक डीसी पॉवर उपलब्ध करुन देण्यात येतील.

·         PM Saubhagya योजना नुसार, केंद्र सरकार प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरातील प्रत्येक घरास वीज पुरवण्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

·         प्रधानमंत्री सौभाग्य योजनेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी केंद्र सरकारतर्फे या वर्षी 16320 कोटी रुपयांचे बजेटही देण्यात आले आहे.

·         पंतप्रधान सौभाग्य योजनेंतर्गत लोकांना आणखी एक मोठा फायदा सरकारकडून देण्यात येणार आहे तो म्हणजे उपकरणांची दुरूस्ती खर्च देखील सरकार देईल.

·         प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून ट्रान्सफॉर्मर वायर्स आणि मीटर सारख्या उपकरणांवरही अनुदान दिले जाईल.

·         या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि लोकांना जागरूक करण्यासाठी, प्रत्येक गावात शिबिरे बसवून लोकांमध्ये जागरूकता आणली जाईल, तसेच वीज जोडणीची आवश्यकतादेखील स्पष्ट केली जाईल आणि यामुळे लोकांना वीजपुरवठा करण्यास मदत होईल.

सौभाग्य योजनेचे लाभ

·         पंतप्रधान सौभाग्य योजनेंतर्गत देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांना लाभ देण्यात येईल.

·         प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेंतर्गत देशाचा सर्वांगीण आर्थिक विकासही सुधारेल, त्याचबरोबर तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.

·         पंतप्रधान सौभाग्य योजनेंतर्गत देशातील सुमारे तीन कोटी गरीब कुटुंबांना लाभ होणार आहे.

·         या योजनेंतर्गत देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व गरजू लोकांना मोफत वीज कनेक्शन दिले जातील.

·         प्रधान मंत्री सौभाग्य योजनेंतर्गत ज्या भागात अद्याप वीज तारा पोहोचलेल्या नाहीत, म्हणजे ज्या ठिकाणी सध्या वीज पोहोचणे शक्य नाही तेथे शासनाकडून गरजू कुटुंबांना सौर उर्जेवर चालणारे उपकरणे उपलब्ध करून दिल्या जातील.

·         ५ एलईडी लाइट, एक डीसी फॅन आणि एक डीसी पॉवर प्लगसह या योजने अंतर्गत मिळेल तसेच यांचा ५ वर्षापर्यंत दुरूस्ती खर्च देखील केंद्र सरकार कडून मिळेल.

·         तुम्हालाही पंतप्रधान सौभाग्य योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्या बद्दल आम्ही खाली संगितले आहे.

PM Saubhagya Yojana 2022 साठी पात्रता

·         प्रधानमंत्री सौभाग्य योजना 2022 चा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा अत्यंत गरीब कुटुंबातील असावा तसेच त्याच्या घरी विद्युत कनेक्शन नसावे.

·         या योजनेअंतर्गत त्यांनाच लाभ देण्यात येईल ज्यांचे नाव सामाजिक व आर्थिक जनगणना 2021 च्या यादीत असेल.

·         ज्यांचे नाव सामाजिक व आर्थिक जनगणना 2021 च्या यादीत नाही ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात परंतु त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी 500 रुपये भरावे लागतील. हे पैसे 10 हप्त्यात भरण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे, म्हणजे तुम्ही प्रती महिना 50 रुपये भरून सौभाग्य योजना 2022 चा लाभ घेऊ शकता.

·          

सौभाग्य योजना 2022 साठी आवश्यक कागदपत्रे

·         अर्जदाराचे आधार कार्ड

·         पासपोर्ट आकाराचा फोटो

·         रहिवासी दाखला

·         मोबाइल नंबर

·         आणि बाकी आवश्यक असलेली माहिती

 

 

ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे?

तुम्हाला पंतप्रधान सौभाग्य योजनेंतर्गत ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर ऑफलाइन अर्ज करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे, तुम्ही तुमच्या नजीकच्या विद्युत विभाग कार्यालयात संपर्क साधू शकता किंवा वीज वितरकाशीही संपर्क साधू शकता. त्यांच्याशी संपर्क साधून आपण ऑफलाइन अर्ज करू शकता किंवा पीएम सौभाग्य योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधूनही माहिती मिळवू शकता.

Saubhagya Yojana Helpline Number

पंतप्रधान सहज बिजली हर घर योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि या योजनेंतर्गत कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा सूचना देऊ इच्छित असल्यास किंवा त्यांना काही अडचण येत असेल तर पंतप्रधान सौभाग्य योजना हेल्पलाईन क्रमांकही तयार करण्यात आला आहे. ज्यावर आपण तक्रार करू शकता किंवा माहिती मिळवू शकता यावर फोन करून.

Pm Saubhagya Yojana Toll free helpline number :- 1800 121 5555

 

إرسال تعليق

أحدث أقدم