राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2022 : Mahamesh Yojana

 

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2022 : Mahamesh Yojana


Mahamesh Yojana | Mahamesh Yojana Form | Mahamesh Yojana In Marathi | Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana | Raje Yashwantrao Mahamesh Yojana | राजे यशवंतराव होळकर महामेष योजना

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील असते त्यासाठी सरकार विविध योजनांची सुरुवात करते असते. आज आम्ही महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एक योजनेची संपूर्ण माहिती देणार आहोत ज्या योजनेचे नाव राजे यशवंतराव होळकर महामेष योजना आहे.

Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana

महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागात बहुतांश नागरिकांचा शेती हा एक पारंपारिक व्यवसाय आहे तसेच शेतकरी अनेक वर्षांपासून शेती सोबत शेळ्या व मेंढ्या पालन हा जोड व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात करायचे व त्यापासून त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हायची परंतु अलीकडच्या काळात पुष्कळ कारणांमुळे असे आढळून आले आहे कि राज्यात शेळ्या व मेंढ्यांची संख्या कमी होत चालली आहे त्यामुळे राज्यात शेळ्या व मेंढ्यांची होणारी घाट थांबवण्यासाठी राज्य शासनाद्वारे विविध उपाय योजना केले जाते त्यापैकीच एक म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेष योजना आहे.

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून राज्यातील मुंबई व मुंबई उपनगरे हे २ जिल्हे वगळून उर्वरित ३५ जिल्ह्यात राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत एकूण ६ घटक समाविष्ट करण्यात आलेले असून याकरता रु. ४५.८१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्र राज्यात स्वरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास २० मेंढ्या व १ नर मेंढ्याचे वाटप केले जाते.तसेच मेंढी पालनासाठी खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान दिले जाते.तसेच मेंढ्यांना खाद्य कमतरता पडू नये यासाठी हिरव्या चाऱ्याचा मुरघास बनविण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते त्यामुळे राज्यात शेळी आणि मेंढी पालनासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाद्वारे मेंढीपालनासाठी लाभार्थ्यास ७५% की अनुदान दिले जाते. त्याचबरोबर मेढ्यांच्या चाऱ्यासाठी ५०% अनुदान दिले जाते.

राज्यातील धनगर व तत्सम जमातींमधील सुमारे १ लाख मेंढपाळांकडून मेंढीपालन हा व्यवसाय केला जातो. धनगर व तत्सम जमातींमधील समाज सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्टया मागास असल्यामुळे या समाजास भटक्या जमाती (भज-क) या मागास प्रवर्गामध्ये समाविष्ट करून, त्यांना मागासवर्गीयांच्या सवलती राज्य शासनाने लागू केलेल्या आहेत. सध्या राज्यातील मेंढपाळ विविध ऋतूनुसार मेंढयांसाठी जेथे चारा उपलब्ध होईल अशा विविध ठिकाणी भटकंती करुन मेंढयांचे पालन पोषण करण्याचा व्यवसाय करीत आहेत. राज्यातील मेंढ्यांच्या संख्येत होणारी प्रागतिक घट, घटीची कारणे, मेंढ्यांपासून मिळणाऱ्या मांस व दुधाचा उच्च दर्जा, तसेच दूध व लोकर उत्पादनापासून निर्माण होणाऱ्या रोजगारांची संधी या पार्श्वभूमीवर राज्यातील भटक्या जमाती (भज-क) या मेंढपाळ समाजास सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीने मेंढीपालन या पारंपारिक व्यवसायास प्रोत्साहन देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे दि. १८ मार्च, २०१७ रोजी राज्यात मेंढी पालनास प्रोत्साहन देण्यासाठी ७५ टक्के अनुदानावर मेंढीगटाचे वाटप करणे ही नवीन योजना सुरू करण्याची राज्य शासनाने घोषणा केली.

राज्यात मेंढी पालनास प्रोत्साहन मिळण्यासाठी पारंपारिक मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर मेंढी गटाचे वाटप करण्यात येईल. यासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. योजनेची फलश्रुती लक्षात घेऊन व्याप्ती वाढविण्याबाबत नंतर विचार करण्यात येईल.

विशेष सूचना: आम्ही राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी शेतकरी व पशुपालक असतील जे राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावराजे यशवंतराव होळकर महामेष योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागपशु संवर्धन विभाग
लाभार्थीराज्यातील शेतकरी तसेच पशुपालक
लाभशेळी मेंढी पालनासाठी अनुदान
उद्देश्यराज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा उद्देश

Mahamesh Yojana Purpose

  • राज्यात शेळी मेंढी पालनासाठी इच्छुक असणाऱ्यां शेतकरी तसेच पशुपालकांना शेळी व मेंढी विकत घेण्यासाठी ७५% अनुदान व मेढ्यांच्या चाऱ्यासाठी ५०% अनुदान उपलब्ध करून देणे हे राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे मुख्य उद्देश्य आहे.
  • राज्यात कमी होणाऱ्या शेळी व मेंढ्याची संख्या वाढवणे हे या योजनाचे उद्देश आहे.
  • राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणें
  • शेळी व मेंढी पालनासाठी प्रोत्साहन देणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे तसेच पशुपालकांचे जीवनमान सुधारणे त्याचा सामाजिक व आर्थिक विकास करणे तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हे राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील भटकंती करणारे मेंढपाळ पारंपारिक पद्धतीने करीत असलेल्या मेंढीपालन या व्यवसायापासून त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देणे व त्याद्वारे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करणे.
  • राज्यामध्ये अर्धबंदिस्त / बंदिस्त मेंढीपालन व्यवसायास चालना देणे.
  • मेंढीपालनाचा पारंपारिक व्यवसाय असणाऱ्या समाजातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
  • दरडोई प्रती वर्ष प्रत्येक व्यक्तींच्या आहारामध्ये आवश्यक असणाऱ्या मांसाच्या उपलब्धतेमध्ये वाढ करणे.
  • राज्यामधील सातत्याने कमी होत असलेल्या मेंढ्यांच्या संख्येमध्ये वाढ करून, राज्याच्या कृषि व संलग्न क्षेत्रातील स्थूल उत्पन्न वाढीच्या दराचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करणे.
  • उच्च प्रतीच्या सुधारीत नर मेंढ्यांद्वारे पारंपारिक प्रजातीच्या मेंढ्यांची अनुवंशिकता सुधारणे.
  • उन्हाळ्याच्या व टंचाईच्या कालावधीमध्ये चारा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने, मेंढ्यांच्या वजनात घट होते. त्याचप्रमाणे मेंढपाळांची भटकंती वाढते, यासाठी स्थायी स्वरुपाच्या ठाणबंद पध्दतीने मेंढीपालन करण्यासाठी मेंढपाळांना आकर्षित करुन त्यांना स्थैर्य निर्माण करुन देणे.
  • राज्यामध्ये जास्तीत जास्त सुधारीत प्रजातीच्या मेंढ्यांचा प्रसार करण्यावर भर देणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना तसेच पशुपालक व नागरिकांना शेळी मेंढी पालनासाठी प्रेरणा देणे हे या योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांना शेळी मेंढी विकत घेण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
Mahamesh Yojana

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची वैशिष्ट्ये

Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana Features

  • महाराष्ट्र शासनाकडून राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • या योजनेत पुण्यश्लोक अहिल्या देवी महाराष्ट्र आणि बकरी विभाग निगम नोडल एजेंसीच्या रुपात कार्य करते.
  • या योजनेअंतर्गत ४५.८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
  • महाराष्ट्र शासनाडून राज्यात शेळी व मेंढी पालन करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.
  • राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाद्वारे मेंढीपालनासाठी लाभार्थ्यास ७५% की अनुदान दिले जाते. त्याचबरोबर मेढ्यांच्या चाऱ्यासाठी ५०% अनुदान दिले जाते.
  • महाराष्ट्र राज्यात ग्रामीण तसेच शहरी भागातील शेळी व मेंढी पालनासाठी इच्छुक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी तसेच पशु पालकाचे जीवनमान सुधारेल.
  • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकरी तसेच पशु पालकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल तसेच ते सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार शेतकरी तसेच पशुपालक घरी बसून मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतो त्यामुळे त्यांना अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही व त्यांचा वेळ व पैसे दोघांची बचत होईल.
  • राजे यशवंतराव होळकर महामेष योजना ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत वेळोवेळी अर्जाची स्थिती जाऊन घेऊ शकतो

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेतील प्रमुख ६ घटक

Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana 2022

१. स्थायी व स्थलांतरित मेंढीपालन करणाऱ्या मेंढीपालकांना पायाभूत सोई –सुविधांसह २० मेंढया व १ मेंढा नर अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप करणे.

. सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५% अनुदानावर वाटप करण्यात येते.

. मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ७५% अनुदान उपलब्ध करून दिले जाते

. मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करुन देण्यासाठी ७५% अनुदान दिले जाते.

. कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्यासाठी यंत्राची खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान दिले जाते.

. पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी शासनाकडून ५०% अनुदान दिले जाते

वरील प्रमाणे एकूण ६ घटकामध्ये खालील प्रमाणे उपघटकांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे भौतिक उद्दीष्ट्ये व त्यानुसार उपलब्ध तरतुदी बाबतची माहिती खालील तक्त्यामध्ये दर्शविण्यात आलेली आहे.

Mahamesh Yojana Chart One
Mahamesh Yojana Chart Two
Mahamesh Yojana Chart Three

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे लाभार्थी

Mahamesh Yojana Beneficiary

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिक राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ

Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana Benefits

  • राज्यात शेळी मेंढी पालनासाठी इच्छुक असणाऱ्यां शेतकरी तसेच पशुपालकांना शेळी व मेंढी विकत घेण्यासाठी ७५% अनुदान व मेढ्यांच्या चाऱ्यासाठी ५०% अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना महिलांसाठी ३०% व अपंगांसाठी ३% आरक्षण देण्यात आले आहे.
  • राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत भटक्या जमाती (भज -क) प्रवर्गातील बचत गटांना / पशुपालक उत्पादक कंपन्याना प्राधान्य दिले जाईल.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांचे जीवनमान सुधारेल
  • या योजनेच्या सहाय्याने लाभार्थ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
  • योजनेच्या सहाय्याने लाभार्थी शेतकऱ्याचा तसेच पशुपालकांच्या सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • या योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • राज्यातील जे शेतकरी तसेच पशुपालक शेळी व मेंढी पालनासाठी उत्सुक आहेत त्यांना शेळी व मेंढी खरेदी करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे स्वरूप

Mahamesh Yojana Maharashtra

सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल.

अ. पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढ्या + १ मेंढानर असा मेंढी गट वाटप:

  • या योजनेमध्ये सन २०१७ -१८ या आर्थिक वर्षापासून २० मेंढया + १ मेंढानर असा मेंढी गट मुलभूत सुविधेसह एकूण १००० लाभार्थ्यांना वाटप करणे. सदर योजनेमध्ये ७५ टक्के हिस्सा राज्य शासनाचा व २५ टक्के हिस्सा लाभार्थ्याचा असेल.
  • सदर योजनेअंतर्गत २० मेंढया + १ मेंढानर या स्थायी स्वरुपाचे ५०० मेंढी गट व स्थलांतरीत स्वरुपाचे ५०० मेंढी गट असे एकूण १००० मेंढी गटाचे वाटप करण्यात येईल.
  • २० मेंढ्या + १ मेंढानर या स्थायी मेंढी गटाची एकूण किंमत रु.३,३३,०००/- आणि स्थलांतरीत मेंढी गटाची एकूण किंमत रु.२,०२,५००/- राहील.
  • २० मेंढ्या + १ मेंढानर या स्थायी मेंढी गटाच्या किंमती मधील २५ टक्के हिस्सा म्हणजे रु. ८३,२५०/- आणि स्थलांतरीत मेंढी गटाच्या किंमती मधील २५ टक्के हिस्सा रु. ५०,६२५/- एवढी रक्कम स्वहिस्सा म्हणून लाभधारकाने भरावयाची आहे. उर्वरित ७५ टक्के रक्कम स्थायी गटासाठी रु. २,४९,७५०/- आणि स्थलांतरीत गटासाठी रु. १,५१,८७५/- एवढे शासनाचे अनुदान अनुज्ञेय असेल.
  • या योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या मेंढ्यांची किंमत, मेंढी रु.८०००/- व नर मेंढा रु. १००००/- याप्रमाणे असेल. तथापि, जिवंत वजनानुसार लाभधारकाने निवडलेल्या मेंढयांची किंमत त्यापेक्षा जास्त होत असल्यास, जास्त होणारी रक्कम लाभधारकास स्वत: भरावी लागेल. त्यासाठी शासनाचे कोणतेही अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.
  • या संदर्भातील बाब निहाय खर्चाचा तपशील सोबतच्या विवरणपत्र “अ” मध्ये दर्शविल्याप्रमाणे राहील.

ब. सुधारीत प्रजातीच्या नर मेंढ्यांचे वाटप:

  • या योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात ५३४० सुधारीत जातीच्या नर मेंढयाचे वाटप करण्यात येईल.
  • सुधारीत प्रजातीच्या एका नर मेंढ्याची किंमत रु. १०,०००/- एवढी असेल. सदर किंमती मधील २५टक्के हिस्सा म्हणजे रु. २,५००/- एवढी रक्कम स्वहिस्सा म्हणून लाभधारकाने भरावयाची आहे, आणि उर्वरित ७५टक्के हिस्सा म्हणजे रु.७,५००/- एवढ्या रकमेचे शासनाचे अनुदान अनुज्ञेय असेल.
  • या योजनेंतर्गत वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या व ज्यांच्याकडे स्वत:च्या २० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० पेक्षा कमी मेंढ्या आहेत, अशा लाभार्थ्यांना १ नर मेंढा, ४० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ६० पेक्षा कमी मेंढ्या आहेत, अशा लाभार्थ्यांना २ नर मेंढे, ६० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ८० पेक्षा कमी मेंढ्या आहेत, अशा लाभार्थ्यांना ३ नर मेंढे, ८० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु १०० पेक्षा कमी मेंढ्या आहेत, अशा लाभार्थ्यांना ४ नर मेंढे आणि १०० किंवा त्यापेक्षा अधिक मेंढ्या आहेत, अशा लाभार्थ्यांना ५ नर मेंढ्यांचे वाटप करण्यात येईल.
  • या योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या नियंत्रणाखालील प्रक्षेत्रावरील उपलब्ध असलेले नर मेंढे वाटप करण्यात येतील. तसेच आवश्यकतेनुसार महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी यांच्याकडील मेष प्रकल्पांतर्गत उपलब्ध असलेले नर मेंढे (दख्खनी, माडग्याळ इ.) घेण्यात येतील. त्याचप्रमाणे स्थानिक सुधारीत जातीचे किंवा इतर राज्यातील किंवा विदेशी नर मेंढे आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करुन वाटप करण्यात येतील.

क मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनुदान वाटप:

  • वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या, व ज्यांच्याकडे स्वत:च्या मेंढ्या आहेत, अशा मेंढपाळास ७५ टक्के अनुदान तत्वावर मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करुन देणे.
  • सदर योजनेंतर्गत स्वत:च्या २० मेंढ्या + १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेढ्यांपेक्षा कमी अशा मेंढ्यांच्या स्थायी स्वरुपाचे मेंढीपालन करणाऱ्या ५० लाभार्थ्यांना व स्थलांतरीत स्वरुपाचे मेंढीपालन करणाऱ्या ४५० लाभार्थ्यांना, अशा एकूण ५०० लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात येईल.
  • सदर योजनेंतर्गत स्वत:च्या ४० मेंढ्या +२ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक मेंढ्यांचे स्थायी स्वरुपाचे मेंढीपालन करणाऱ्या ५० लाभार्थ्यांना व स्थलांतरीत स्वरुपाचे मेंढीपालन करणाऱ्या ४५० लाभार्थ्यांना अशा एकूण ५०० लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात येईल.
  • २० मेंढ्या + १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेढ्यांपेक्षा कमी अशा मेंढ्यांच्या स्थायी स्वरुपाच्या आणि स्थलांतरीत स्वरुपाच्या मेंढीपालनासाठी पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सोई-सुविधांची एकूण किंमत अनुक्रमे रु. १,६३,०००/- आणि रु. ३२, ५००/एवढी राहील.
  • २० मेंढ्या + १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेढ्यांपेक्षा कमी अशा मेंढ्यांच्या स्थायी स्वरुपाच्या मेंढीपालनासाठी पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सोई सविधांच्या किंमती मधील २५टक्के हिस्सा म्हणजे रु. ४०,७५०/- आणि स्थलांतरीत स्वरुपाच्या मेंढीपालनासाठी पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सोई-सुविधांच्या किंमती मधील २५ टक्के हिस्सा रु.८,१२५/- एवढी रक्कम स्वहिस्सा म्हणून लाभधारकाने भरावयाची आहे. स्थायी मेंढीपालनासाठी उर्वरित ७५टक्के हिस्सा रु.१,२२,२५०/- आणि स्थलांतरीत मेंढीपालनासाठी रु.२४,३७५/- एवढे शासनाचे अनुदान अनुज्ञेय असेल.
  • ४० मेंढ्या +२ मेंढेनर अशा एकूण ४२ मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक मेंढ्यांच्या स्थायी स्वरुपाच्या मेंढीपालनासाठी आणि स्थलांतरीत स्वरुपाच्या मेंढीपालनासाठी पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सोई-सुविधांची एकूण किंमत अनुक्रमे रु.३,१७,०००/- आणि रु.४८,०००/- एवढी राहील.
  • ४० मेंढ्या +२ मेंढेनर अशा एकूण ४२ मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक मेंढ्यांच्या स्थायी स्वरुपाच्या मेंढीपालनासाठी पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सोई-सुविधांच्या किंमती मधील २५ टक्के हिस्सा म्हणजे रु. ७९,२५०/- आणि स्थलांतरीत स्वरुपाच्या मेंढीपालनासाठी पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सोई-सुविधांच्या किंमती मधील २५ टक्के हिस्सा म्हणजे रु. १२,०००/- एवढी रक्कम स्वहिस्सा म्हणून लाभधारकाने भरावयाची आहे. उर्वरित ७५ टक्के हिस्सा स्थायी मेंढीपालनासाठी रु. २,३७,७५०/- आणि स्थलांतरीत मेंढीपालनासाठी रु. ३६,०००/- एवढे शासनाचे अनुदान अनुज्ञेय असेल.
  • या संदर्भातील बाब निहाय खर्चाचा तपशील सोबतच्या विवरणपत्र “ब” मध्ये दर्शविल्याप्रमाणे राहील.

ड मेंढीपालनासाठी संतुलीत खाद्य उपलब्ध करुन देण्यासाठी अनुदान वाटप:

  • वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या, व ज्यांच्याकडे स्वत:च्या मेंढ्या आहेत, अशा मेंढपाळास मेंढीपालनासाठी ७५ टक्के शासनाचा हिस्सा व २५ टक्के लाभार्थ्यांचा हिस्सा या तत्वावर संतुलीत खाद्य उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • स्थलांतरीत मेंढपाळांकडील मेंढ्यांसाठी त्यांच्या मूळ रहिवाशी ठिकाणी परतल्यावर माहे जून ते जुलै या कालावधीत संतुलीत खाद्य पुरविण्यात येईल आणि ज्या मेंढ्यांचे स्थलांतर न होता, स्थायी स्वरुपात मेंढीपालन केले जाते, त्या मेंढ्यांसाठी माहे एप्रिल ते जुलै या कालावधीत संतुलीत खाद्य पुरविण्यात येईल.
  • राज्यातील एकूण मेंढ्यांची संख्या २५.८० लक्ष एवढी असून, त्यापैकी ५० टक्के म्हणजे १२.९० लक्ष एवढ्या मेंढ्यांना संतुलीत खाद्य पुरविण्यात येईल.
  • उक्त १२.९० लक्ष मेंढ्यांपैकी ९० टक्के मेंढ्या म्हणजे ११.६१ लक्ष एवढ्या मेंढ्या स्थलांतरीत होतात असे ग्राह्य धरुन, या मेंढ्यांना माहे जून ते जुलै या कालावधीत प्रति दिन, प्रति मेंढी १०० ग्रॅम संतुलीत खाद्य पुरविण्यात येईल.
  • उक्त १२.९० लक्ष मेंढ्यांपैकी १० टक्के मेंढ्या म्हणजे १.२९ लक्ष एवढ्या मेंढ्यांचे स्थायी स्वरुपात मेंढीपालन केले जाते असे ग्राह्य धरुन, या मेंढ्यांना माहे एप्रिल ते जुलै या कालावधीत प्रति दिन, प्रति मेंढी १०० ग्रॅम संतुलीत खाद्य पुरविण्यात येईल.
  • सदर योजनेत स्थलांतरीत मेंढ्यांसाठी ६९६७.०२९ मेट्रीक टन एवढ्या आणि स्थायी मेंढ्यांसाठी १५४८.२२९ मेट्रीक टन एवढ्या संतुलीत खाद्याची आवश्यकता आहे. प्रति किलो पशुखाद्याची किंमत रु. २५/- एवढी असून, त्यापैकी २५ टक्के लाभार्थी हिस्सा म्हणजे रु.६.२५/- आणि ७५ टक्के शासनाचा हिस्सा म्हणजे रु. १८.७५/- एवढा राहील.
  • सदर योजनेंतर्गत मेंढपाळ जेवढे पशुखाद्य घेईल, त्या प्रमाणात त्यास शासनाचे अनुदान अनुज्ञेय असेल.

इ कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मूरघास बनविण्याकरीता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler cum wrapper) खरेदी करण्यासाठी अनुदान वाटप:

राज्यात २५ ठिकाणी कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मूरघास बनविण्याकरीता गासड्या बांधण्याचे (Mini Silage Baler cum wrapper) यंत्राची किंमत रु.८.०० लक्ष एवढी ग्राह्य धरुन, त्यापैकी ५० टक्के म्हणजेच रु. ४.०० लक्ष इतक्या मर्यादेपर्यंत किंवा प्रत्यक्ष यंत्राच्या किमतीच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल इतके आर्थिक सहाय्य अनुदान स्वरुपात प्रति यंत्र, असे २५ यंत्रासाठी अनुदानाचे वाटप करण्यात येईल.

फ पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी अनुदान वाटप:

राज्यात ५ ठिकाणी पशुखाद्य कारखाने निर्माण होण्यासाठी एका पशुखाद्य कारखान्यासाठी रु. १०.०० लक्ष एवढा खर्च ग्राह्य धरुन, त्यापैकी ५० टक्के म्हणजेच रु.५.०० लक्ष मर्यादेपर्यंत किंवा प्रत्यक्ष यंत्राच्या किमतीच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल इतके आर्थिक सहाय्य अनुदान स्वरुपात प्रति कारखाना याप्रमाणे ५ कारखान्यासाठी अनुदान वाटप करण्यात येईल.

ग सर्वसाधारण स्वरुपः

  • सदर योजनेअंतर्गत राज्यातील मेंढपाळांना राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत सुरू असलेल्या मुरघास बनविण्याचे युनिट स्थापन करणे या योजनेचा लाभ घेता येईल.
  • या योजनेअंतर्गत कायमस्वरुपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करणारे व स्थलांतर पध्दतीने मेंढीपालन करणारे अशा दोन प्रकारच्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
  • सदर योजनेअंतर्गत भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील बचतगटांना/पशुपालक उत्पादक कंपन्यांना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल. ४. कायमस्वरुपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करणाऱ्या लाभार्थ्यांना शेड बांधकाम, मोकळ्या जागेस कुंपण, खाद्याची व पिण्याच्या पाण्याची भांडी, फायबरची बादली आणि इतर साहित्य, जंतनाशके, कीटकनाशके औषधे व खनिज विटा, पशुधनाचा विमा, चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातींचे ठोंबे/बियाणे या बाबींसाठी अनुदान देण्यात येईल.
  • स्थलांतर पध्दतीने मेंढीपालन करणाऱ्या लाभार्थ्यांना खाद्याची व पिण्याच्या पाण्याची भांडी, तंबू, सूती वाघूर, स्थलांतरणाच्या वेळी साहित्य वाहतूक करण्याकरिता खोगीर, फायबरची बादली आणि इतर साहित्य, जंतनाशके, कीटकनाशके औषधे व खनिज विटा, पशुधनाचा
  • विमा, चारा विकत घेणे अथवा मेंढ्या चारण्यासाठी कुराण भाड्याने घेणे या बाबींसाठी अनुदान देण्यात येईल.
  • या योजनेंतर्गत कायमस्वरुपी ठाणबंद पध्दतीने मेंढीपालन करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या लाभधारकाने त्यांच्याकडील मेंढ्यांकरीता वर्षभरासाठी चाऱ्याची उपलब्धता कशाप्रकारे करुन देण्यात येईल, याबाबतचे नियोजन महामंडळाकडे सादर करणे आवश्यक राहील.
  • शेड बांधण्याकरीता स्वत:ची जागा असणे आवश्यक आहे. लाभधारकाने शेडचे बांधकाम व इतर आनुषंगिक साहित्यांची खरेदी केल्यानंतर या योजनेअंतर्गत पुरवठा करावयाच्या मेंढया/नर मेंढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रांमार्फत पुरविण्यात येतील.
  • महामंडळाच्या प्रक्षेत्रापासून ते लाभधारकांच्या ठिकाणापर्यंत मेंढ्यांच्या वाहतूकीवर होणारा खर्च हा लाभधारकांनी स्वत: करावयाचा आहे.
  • या योजनेमधील कोणत्याही बाबीवरील होणारा अतिरिक्त खर्च हा लाभधारकांनी स्वत: करावयाचा असून, याकरीता कोणतेही शासनाचे अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.
  • या योजनेमध्ये बांधावयाच्या शेडचा आराखडा महामंडळामार्फत लाभधारकांना देण्यात येईल.
  • चारा बियाणे तसेच गवत प्रजातींचे ठोंबे / बेने इत्यादी महामंडळाच्या प्रक्षेत्रामार्फत लाभधारकांस पुरविण्यात येतील. लाभधारकांना स्वत:च्या जमिनीवर किंवा स्वत:ची जमिन नसल्यास, भाडेतत्वावर जमिन उपलब्ध करून चाऱ्याची लागवड करणे आवश्यक राहील.
  • या योजनेअंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या मेंढ्यांना आरोग्य सुविधा (लसीकरण, जंतनाशक औषध पाजणे इ.) नजीकच्या शासकीय / जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत पुरविण्यात येतील. मेंढ्यांमध्ये असणारी खनिजांची कमतरता भरुन काढण्यासाठी खनिज मिश्रण/मिनरल मिक्श्चर ब्रिक्स पुरवठा करण्यात येतील.
  • या योजनेअंतर्गत पुरवठा करण्यात येणाऱ्या मेंढ्यांना विमा संरक्षण देणे बंधनकारक राहील.
  • या योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या मेंढ्यांपासून लाभधारकांकडील उत्पादित झालेल्या मेंढ्यांची महामंडळास आवश्यकता भासल्यास, लाभधारकांनी मेंढ्यांचा पुरवठा महामंडळास करणे बंधनकारक राहील.
  • बहुतांशी कमी पावसाच्या प्रदेशात स्थलांतरीत पध्दतीने मेंढीपालन केले जात असल्याने, या मेंढ्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही व त्यामुळे त्यांच्यामध्ये अशक्तपणा व रोगांचे प्रमाण वाढते व बऱ्याचदा मृत्यूही ओढवतो. याकरिता त्यांच्या स्थलांतर मार्गावर शासकीय जागेत शेततळे किंवा वन विभागाची जागा असल्यास वनतळे करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी यांनी करावी.
  • राज्यामध्ये मेंढीपालन व्यवसाय हा स्थलांतरण पद्धतीने केला जातो. स्थलांतरण काळामध्ये मेंढ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन, मेंढ्या आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असते. यावर मात करण्याकरीता ज्या गावामध्ये जास्त मेंढ्या आहेत किंवा ज्या मार्गावरून मेंढ्यांचे स्थलांतरण होते. हे ठिकाण किंवा गाव ज्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असेल त्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत अशा ठिकाणी दर आठवड्याला भेटी देऊन मेंढ्यांना आरोग्य सुविधा देण्याची व्यवस्था करण्यात यावी. परंतु, याकरिता सदर योजनेंतर्गत कोणतेही अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. १७. सदर योजनेंतर्गत वाटप करण्यात येणारे मेंढी गट व नर मेंढे तसेच चारा बियाणे / ठोंबे / बेणे यांचे वाटप पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत करण्यात येणार असल्याने नियोजन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक डिसीट २३१६ / प्र.क्र.१३३/ का.१४१७, दिनांक ३ मार्च, २०१७ या शासन निर्णयातील परिशिष्ट-अ मध्ये नमूद साधनसामुग्री / वस्तुंच्या यादीतील अ.क्र. ४ येथील नमूद बाबीमधून या योजनेसाठी सूट देण्यात येत आहे.
  • या योजनांतर्गत उक्त अ.क्र. (१७) येथील बाबी वगळता उर्वरित सर्व बाबींचे लाभ थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेच्या माध्यमातून (डीबीटी) लाभार्थ्यास देण्यात यावेत.
  • या योजनेंतर्गत लाभार्थी निवडीमध्ये पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता लाभार्थी निवड समितीने घ्यावी.
  • या योजनेतंर्गत सर्व लाभार्थीना आधारकार्ड सोबत संलग्न करण्यात यावे.
  • केंद्र शासन/राज्य शासनाद्वारे पीपीआर/घटसर्प व अन्य रोगप्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येतात. तसेच केंद्र शासनाच्या केंद्रीय लोकर विकास मंडळामार्फत विविध कार्यक्रम राज्यात राबविण्यात येतात. त्यावेळी पशुसंवर्धन विभागाकडे मेंढपालकांची व त्यांच्याकडील मेंढयाची संख्या व इतर अनुषांगिक माहिती नोंदविण्यात येते. प्रस्तुत योजना राबवितांना अशा कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या नोंदींचा आधार घेण्यात यावा.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्याचे कार्यक्षेत्र

  • सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी लागू राहील.
  • सदर योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत राबविण्यात यावी.
  • सदरची योजना राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरीत ३४ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात यावी.
  • जिल्हानिहाय मेंढी गट वाटप करताना संबंधित जिल्ह्यातील मेंढ्यांची संख्या विचारात घेऊन, त्यानुसार त्या जिल्ह्यातील
  • वाटप करावयाच्या गटांची संख्या महामंडळाकडून निश्चित करण्यात यावी.

लाभधारक निवड करताना खालील बाबी विचारात घेऊन, त्याकरिता प्रत्येक घटकनिहाय स्वतंत्र लाभधारक निवडण्यात येतील. सदर योजनेअंतर्गत लाभधारकास खालील १५ उपघटकामध्ये लाभ घेता येईल. तथापि

Mahamesh Yojana 2022

अर्जदाराने खालील पहिल्या दोन उपघटकामधील कोणत्याही एका उपघटकाचा लाभ घेतल्यास त्यांना इतर उपघटकांमध्ये लाभ घेता येणार नाही.

अर्जदाराने वरील ३ ते ७ या उपघटकांमधील कोणत्याही एका उपघटकाचा लाभ घेतल्यास त्यांना पहिले २ उपघटक वगळता उर्वरित उपघटकांमधील मेंढीपालन व्यवसाय करण्याच्या प्रकारानुसार (स्थायी किंवा स्थलांतरित) व सध्या असलेल्या मेंढ्यांच्या संख्येनुसार वरीलप्रमाणे दर्शविण्यात आलेल्या उपघटक क्रमांक ८ ते ११ मधील कोणत्याही एका उपघटकाचा लाभ घेता येईल, तसेच १२ व १३ मधील कोणत्याही एका उपघटकाचा लाभ घेता येईल.

अर्जदारास उपघटक क्र. १४ व १५ या दोन पैकी एका घटकांमध्ये लाभ घेता येईल.

1कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई – सुविधेसह
२० मेंढया + १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थायी)
2स्थलांतर पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई – सुविधेसह
२० मेंढया + १ मेंढानर असा मेंढीगट । ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थलांतरीत)
3ज्यांच्याकडे स्वत:चे २० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु, ४० पेक्षा कमी मेंढया आहेत,
अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा १ नरमेंढा ७५% अनुदानावर वाटप करणे.
4ज्यांच्याकडे स्वत:चे ४० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु, ६० पेक्षा कमी मेंढया आहेत,
अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा २ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
5ज्यांच्याकडे स्वत:चे ६० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु, ८० पेक्षा कमी मेंढया आहेत,
अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ३ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
6ज्यांच्याकडे स्वत:चे ८० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु, १०० पेक्षा कमी मेंढया आहेत,
अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ४ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
7ज्यांच्याकडे स्वत:चे १०० किंवा त्यापेक्षा अधिक मेंढया आहेत,
अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचे ५ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
8ज्यांच्याकडे स्वत: च्या २० मेंढया व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक
परंतु, ४० मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्यांच्या एका ठिकाणी राहून
स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
७५% अनुदान वाटप (स्थायी)
9ज्यांच्याकडे स्वत: च्या २० मेंढया व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया किंवा
त्यापेक्षा अधिक परंतु, ४० मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे
मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत)
10ज्यांच्याकडे स्वत: च्या ४० मेंढया व २ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढया किंवा
त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्यांच्या एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी
पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी)
11ज्यांच्याकडे स्वत: च्या ४० मेंढया व २ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढया किंवा
त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे मेंढी पालनासाठी
पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत)
12एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी
संतुलित खाद्य उपलब्ध करुन देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी),
1 (१०० ग्रॅम प्रती दिन प्रती मेंढी याप्रमाणे माहे एप्रिल ते जुलै या ४ महिन्याच्या कालावधी करिता)
13भटकंती करणारे स्थलांतरीत स्वरूपाच्या मेंढी पालनासाठी
संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत),
1 (१०० ग्रॅम प्रती दिन प्रती मेंढी याप्रमाणे जून ते जुलै या २ महिन्याच्या कालावधी करिता )

तसेच घटक क्रमांक १४ – कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचे मुरघास बनविण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum Wrapper) खरेदी करण्यासाठी अनुदान व घटक क्रमांक १५ – पशुखाद्य कारखान्यासाठी अनुदान देणे’, या घटकाचा लाभ घेण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्याची आणि लाभधारकाची निवड करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे गठित समितीमार्फत पूर्ण करण्यात येईल. लाभार्थी निवडीचे निकष शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे राहतील.

घटक क्रमांक- १

कायमस्वरूपी एका घटकामध्ये राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढ्या + १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थायी)

MY1

वरील तक्त्यामधील अनुक्रमांक २ ते ५ बाबीवरील संपूर्ण खर्च लाभधारकांनी प्रथम स्वतः करावयाचा आहे.

घटक क्रमांक- २

स्थलांतर पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढ्या + १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थलांतरित)

MY2

वरील तक्त्यामधील अनुक्रमांक २ ३ व ४ बाबीवरील संपूर्ण खर्च लाभधारकांनी प्रथम स्वतः करावयाचा आहे.

घटक क्रमांक ३ ते ७

घटक क्रमांक ८

ज्यांच्याकडे स्वत: च्या २० मेंढया व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्यांच्या एका ठिकाणी राहन स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी)

(टीप- वरील तक्त्यामध्ये दर्शविण्यात आलेल्या अनुक्रमांक १ ते ५ या मधील समाविष्ट बाबीवरील १००% रु. १,५०,०००/- खर्च प्रथम लाभधारकाने स्वत: करावयाचा आहे. तसेच अनुक्रमांक ६ व ७ या मधील समाविष्ट बाबीवरील २५ % लाभधारक हिस्स्याची रक्कम रु. ३२५०/- महामंडळाच्या संबंधित प्रक्षेत्रावर जमा करावयाची आहे.)

घटक क्रमांक-९

ज्यांच्याकडे स्वत: च्या २० मेंढया व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत)

(टीप- वरील तक्त्यामध्ये दर्शविण्यात आलेल्या अनुक्रमांक १ ते ४ या मधील समाविष्ट बाबीवरील १००% रु. ३०,५००/- खर्च प्रथम लाभधारकाने स्वतः करावयाचा आहे. तसेच अनुक्रमांक ५ या मधील समाविष्ट बाबीवरील २५ % लाभधारक हिस्स्याची रक्कम रु. ५००/- महामंडळाच्या संबंधित प्रक्षेत्रावर जमा करावयाची आहे.)

घटक क्रमांक-१०

ज्यांच्याकडे स्वत: च्या ४० मेंढया व २ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्यांच्या एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी)

(टीप- वरील तक्त्यामध्ये दर्शविण्यात आलेल्या अनुक्रमांक १ ते ५ या मधील समाविष्ट बाबीवरील १००% रु. ३,००,०००/- खर्च प्रथम लाभधारकाने स्वत: करावयाचा आहे. तसेच अनुक्रमांक ६ व ७ या मधील समाविष्ट बाबीवरील २५ % लाभधारक हिस्स्याची रक्कम रु. ४,२५०/- महामंडळाच्या संबंधित प्रक्षेत्रावर जमा करावयाची आहे.)

घटक क्रमांक-११

ज्यांच्याकडे स्वत: च्या ४० मेंढया व २ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत)

(टीप- वरील तक्त्यामध्ये दर्शविण्यात आलेल्या अनुक्रमांक १ ते ४ या मधील समाविष्ट बाबीवरील १००% रु. ४६०००/- खर्च प्रथम लाभधारकाने स्वत: करावयाचा आहे. तसेच अनुक्रमांक ५ या मधील समाविष्ट बाबीवरील २५ % लाभधारक हिस्स्याची रक्कम रु. ५००/- महामंडळाच्या संबंधित प्रक्षेत्रावर जमा करावयाची आहे)

घटक क्रमांक – १२

एका ठिकाणी राहन स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी)

घटक क्रमांक – १३

भटकंती करणारे स्थलांतरीत स्वरूपाच्या मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत)

घटक क्रमांक – १४

कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्या चा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum Wrapper) खरेदी करण्यासाठी अनुदान वाटप

घटक क्रमांक – १५

पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी अनुदान वाटप


राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत विविध स्तरावरून ऑनलाइन पद्धतीने अर्जाची छाननी व निवड प्रक्रिया

योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविणे तसेच प्राप्त झालेल्या अर्जाची ऑनलाइन पद्धतीने विविध स्तरावरून छाननी करणे व त्याचे रीपोर्ट जेनरेट करणे या बाबतचे सॉफ्टवेअर महामंडळामार्फत तयार करण्यात आलेले आहे. त्यानुसार लाभधारक निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.

महामंडळामार्फत सदर योजनेची राज्यस्तरीय वृत्तपत्रातून प्रसिद्धी करण्यात येईल. अर्जदारास अर्ज सादर करण्याकरिता ८ दिवसाची मुदत देण्यात येईल, त्यानंतर शासन निर्णयामधील जिल्हा निवड समितीब्दारे Randam पद्धतीने लाभधारक प्राथमिक निवड यादी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तयार केली जाईल , याकरिता ८ दिवसाची मुदत असेल. त्यानंतर प्राथमिक निवड यादीनुसार लाभधारकास लघु संदेशाव्दारे (SMS) आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याबाबत कळविण्यात येईल, लाभधारकास कागदपत्रे अपलोड करण्याकरिता ५ दिवसाचा कालावधी देण्यात येईल , तद्तर प्राप्त कागदपत्राची व अर्जाची पडताळणी संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेकडून करून शिफारशीसह अर्ज व कागदपत्रे संबंधित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचे कडे प्राप्त होतील, याकरिता ५ दिवसाचा कालावधी असेल. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी प्राप्त अर्ज व कागदपत्राची पडताळणी करून शिफारशीसह अर्ज जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे कडे सादर करतील, याकरिता ५ दिवसाचा कालावधी असेल. लाभधारकांचे कागदपत्रे योग्य असल्याची खात्री जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचेमार्फत करून निवड समिती मार्फत अंतिम लाभधारक यादी तयार करण्यात येईल, याकरिता ५ दिवसाचा कालावधी असेल

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी आवश्यक पात्रता

Mahamesh Yojana Eligibility

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा भटक्या जमाती मधील असणे आवश्यक आहे.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेच्या अटी

Mahamesh Yojana Terms And Condition

  • केवळ महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ दिला जातील.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • राजे यशवंतराव होळकर महामेष योजना केवळ भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांनाच राहील.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला सदर योजनेचा लाभ दिला जाईल.
  • लाभार्थ्याचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराचे आधार कार्ड बँक खात्या सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • ज्या लाभधारकांना याआधी महामेष योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे किंवा त्यांची निवड झालेली आहे परंतु लाभ मिळणे बाकी आहे, अशा लाभधारकांना पुन्हा या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही.
  • स्थायी पद्धतीने मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांकडे शेड बांधण्यासाठी स्वत:ची जमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार किंवा अर्जदारांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवा निवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतिनिधी नसावा.
  • या योजनेअंतर्गत अर्जदाराला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.तसेच ऑफलाईन किंवा इतर कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Mahamesh Yojana Documents

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जमिनीची कागदपत्रे
  • जमिनीत सह हिस्सेदार असल्यास त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र
  • पशुपालन प्रशिक्षण पूर्ण केले असल्यास प्रमाणपत्र
  • वयाचा दाखल
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Mahamesh Yojana Registration

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर महामेश योजनेवर क्लिक करायचे आहे.
Mahamesh Yojana Home Page
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्जदाराकरिता अर्जदार लॉगिन बटन वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला मला वरील अटी/शर्ती मान्य आहेत वर टिक करून आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व कॅप्टचा कोड भरून लॉगिन करा बटनावर क्लिक करायचं आहे.
Mahamesh Yojana Login Page
  • आता तुमच्यासमोर महामेश योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरायची आहे.
  • योजनेचा अर्ज हा दोन पेज मध्ये विभागला आहे, यामध्ये पहिल्या पानावर अर्जदाराची वायक्तिक माहिती, जमिनीचा तपशील तसेच इतर माहिती भरावयाची आहे. माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर SAVE बटन क्लिक करावयाचे आहे. त्यानंतर दुसरे पेज ओपन होईल, यामध्ये अर्जदारास कुठल्या घटकामध्ये लाभ घ्यावयाचा आहे याबाबतची माहिती भरावयाची आहे. योजनेअंतर्गत घटक निवड करतांना आपल्या तालुक्याचे उधीष्ट तपासून त्यानुसार योजने मधील कोणत्या उपघटकामध्ये लाभ घ्यावयाचा आहे त्याची निवड करण्यात यावी.
  • अर्जामध्ये सर्व माहिती भरून झाल्यानंतर Submit बटनावर क्लिक करावे. (अर्ज Submit करण्याआधी भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी)
  • अर्ज Submit झाल्यानंतर “Application Form is submitted successfully” असा मेसेज आल्यानंतरच अर्जदाराचा अर्ज निवडीकरिता सादर झाल्याचे समजावे.
  • त्यानंतर “View receipt” या बटनावर क्लिक केल्यास अर्जाची पावती अर्जदारास दिसेल, त्याची प्रिंट काढून घ्यावी.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत प्राथमिक निवड झाल्यानंतर अर्जदारांनी करावयाची कार्यवाही

Mahamesh Yojana Maharashtra

  • अर्ज करतांना अर्जदारांनी नोंदणी केलेला मोबाइल नंबर मध्ये बदल करू नये.
  • जिल्हा स्तरीय निवड समितीमार्फत यादृच्छिक (Random) पद्धतीने निवड करण्यात येईल. यादृच्छिक (Random) पद्धतीने निवड करण्यात आलेल्या अर्जदारांना त्यांच्या नोंदनिकृत भ्रमणध्वनि वर लघु संदेशाव्दारे (SMS) प्राथमिक निवड झाल्याबद्दल कळविण्यात येईल. प्राथमिक निवड यादीमध्ये उपलब्ध तरतुदीच्या आधीन राहून निश्चित केलेल्या लक्षांकाच्या पाच पट (उपलब्ध व पात्र अर्जास अधीन राहून) अर्जदारांना कागदपत्रे पडताळणी करिता अपलोड करण्याकरिता कळविण्यात येईल.
  • प्राथमिक निवड यादी महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
  • अर्जदारांनी विहित मुदतीत कागदपत्रे संकेतस्थळावरून किंवा MAHAMESH App वरून अपलोड करावयाचे आहे.

आवश्यक कागदपत्राची यादी खालील प्रमाणे आहे.

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • जातीचा दाखला (सक्षम अधिकाऱ्यांचा)
  • मेंढी पालन करण्याची पद्धत किंवा स्वरूप व सध्या असलेल्या मेंढ्यांची संख्या (स्थलांतरित /फिरस्ती पद्धतीने किंवा एका ठिकाणी राहून स्थायी पद्धतीने) याबाबतचे संबंधीत पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र (बंधपत्रामधील नमुना क्रमांक १ मध्येच सादर करावयाचा आहे)
  • रहिवासी दाखला (सक्षम प्राधिकारी) (बंधपत्रामधील नमुना क्रमांक २ मध्येच सादर करावयाचा आहे)
  • अपत्य दाखला (बंधपत्रामधील नमुना क्रमांक ३ मध्येच सादर करावयाचा आहे). १ मे २००१ नंतर तिसरे हयात अपत्य नसावे.
  • अर्जदाराचे शेतजमिनीचा अलीकडील तीन महिन्यातील ७/१२ उतारा किंवा अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबियांपैकी) संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेतजमिनीचा ७/१२ उतारा व १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र (बंधपत्रामधील नमुना क्रमांक ४ मध्येच सादर करावयाचा आहे). भाडेतत्वावर शेतजमीन घेतली असल्यास शेतजमीन मालकासमवेत केलेल्या भाडेकराराची सत्यप्रत (रु.१००/- स्टॅम्प पेपर वर नोटरी करून) (बंधपत्रामधील नमुना क्रमांक ५ मध्येच सादर करावयाचा आहे)
  • शेड बांधकामाचा लाभ घ्यावयाचा असल्यास, त्यासाठी स्वत:ची किमान १ गुंठा जागा उपलब्ध असल्याबाबत अलीकडील तीन महिन्यातील ७/१२ उतारा / मिळकत दाखला • बचतगटाचे सदस्य असल्याचे प्रमाणपत्र (लागू असल्यास) • पशुपालक उत्पादक कंपनीचे सदस्य असल्याचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • महामंडळामार्फत शेळी मेंढी पालनाचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
  • स्वयंमघोषणा पत्र (बंधपत्रामधील नमुना क्रमांक ६ मध्येच सादर करावयाचा आहे)
  • वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे (लागू असणारे) एकाचवेळी अपलोड करून, SUBMIT बटन क्लिक करावे.

अर्जदारांनी विहित मुदतीत आवश्यक लागणारे सर्व कागदपत्रे अपलोड न केल्याने अर्जदाराची प्राथमिक निवड रद्द झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील याबाबत अर्जदाराची कसलीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही

Telegram GroupJoin
Mahamesh Yojana PortalClick Here
Mahamesh Yojana AddressMendhi Farm,
Gokhalenagar,
Pune-411016
Mahamesh Yojana Contact Number020-25657112
Mahamesh Yojana Emailmdsagpune[At]gmail[Dot]com

Post a Comment

Previous Post Next Post