कडबा कुट्टी मशीन 75% अनुदान योजना 2022 सुरु | Kadba Kutti Machine Subsidy Scheme Maharashtra

कडबा कुट्टी मशीन 75% अनुदान योजना 2022 सुरु | Kadba Kutti Machine Subsidy Scheme Maharashtra

Kadba Kutti Machine Yojana : नमस्कार राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना जनावरांना चारा व अन्य खाद्य हे बारीक कट करून जनावरांना दिल्यासती चारा योग्यरीतीने खातात. व शेतकऱ्यांचा त्यामध्ये मोठा फायदा होतो.


मित्रानो जे शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात, अश्या शेतकरी बांधवांसाठी कडबा कुट्टी मशीन ची फार आवश्यकता भासते, कारण की जास्त जनावरे असल्यास त्या जनावरांना चारा खाद्य जास्त टाकावे लागते, त्यामुळे आपण येवढे मोठे जनावरांचे खाद्य कापून म्हणजेच बारीक करून टाकू शकत नाहीत. त्यामुळे जर आपल्याकडे कडबा कुट्टी मशीन असेल तर आपण कमी वेळात सर्व जनावरांना खाद्य बारीक करून टाकू शकतो. शक्यतो जनावरे कडबा किंवा इतर त्यांचे खाद्य पूर्णता खात नाही ते बारीक करून टाकल्यास खातात त्यामुळे कडबा कुट्टी मशीन आवश्यक आहे. परंतु प्रत्येक शेतकरी हा कडबा कुट्टी मशीन विकत घेऊ शकत नाही.


Kadba Kutti Machine Yojana

तरी या लेखामध्ये आपण जिल्हा परिषद अनुदान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या (Kadba Kutti Machine Yojana) कडबा कुट्टी मशीन या योजने अंतर्गत 75 टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिलं जातं. तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा..


कडबा कुट्टी योजना पात्रता 

•लाभार्थी पुण्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी असावा.

•लाभार्थी हा व्यवसायाने शेतकरी असावा.

•बँकेत आधार लिंक केलेले खाते असावे.

• स्वतः शेतकरी असावा आणि स्वतःच्या नावे १० एकर पेक्षा कमी शेतजमीन असणे आवश्यक.

• आधार कार्ड असावे.

• वय १८ वर्षे पूर्ण असावे.

• स्वतःच्या नावावरील मागील ३ महिन्यांचा सातबारा आणि नमुना ८ अ असणे आवश्यक.

• लाभार्थी किंवा कुटुंब प्रमुखाच्या नावावर सिंगल फेज असलेले घरघुती वीज कनेक्शन असणे आवश्यक.

कडबा कुट्टी योजना कागदपत्रे

• आधार कार्ड
• घरगुती वीज जोडणी बिल
• ७/१२ सातबारा प्रमाणपत्र
• बँक पासबुक
• नमुना ८ अ

टीप: सदर योजनेचा लाभ सध्या फक्त पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी सुरू आहे.

إرسال تعليق

أحدث أقدم