नवीन मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र लाभ, पात्रता, व अर्ज | Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra 2023
राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांनी मिळवावा त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येयवादी, सुजाण नागरिक तयार व्हावेत या करीता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम {Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra} राबविण्यात आला होता.
“मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" (Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळाला व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत झाली. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता याचा उपयोग प्रशासनास झाला आणि तरुणांमधील उत्साह, तंत्रज्ञानाची आवड या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांना गती मिळाली. Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra
दिनांक 30 जानेवारी 2020 च्या शासन निर्णयानुसार “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" संपुष्टात आणण्यात
आला. परंतु "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" पुन्हा सुरु करण्याबाबत होत असलेली आग्रही मागणी लक्षात घेता सदर कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची तसेच फेलोना भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल या दृष्टीने सदर कार्यक्रमास शैक्षणिक कार्यक्रमाची जोड देण्यासाठी देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय काढून ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय खालील प्रमाणे आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप शासन निर्णय:-
1. “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने फेलोंच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती निश्चित करण्याच्या दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्याच्या दृष्टीने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
2. “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" करिता फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष, फेलच्या नियुक्ती
संदर्भातील अटी व शर्ती तसेच शेक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची
रूपरेषा व अंमलबजावणी बाबत शासन निर्णयात नमूद बाबींनुसार कार्यवाही करण्यात यावी.
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी पात्रता Eligibility
मित्रांनो, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना सरकारचा एक भाग बनण्याची संधी देतो. त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची शासनाला मदत होते. त्यांचा उत्साह व तंत्रज्ञानाची आवड यामुळे प्रशासकीय प्रक्रियांची गती वाढते. या कार्यक्रमामुळे मिळालेले ज्ञान व अनुभव यामुळे युवकांचा दृष्टिकोन विस्तारतो. या योजनेची पात्रता खालीलप्रमाणे आहे.
* अर्जदार भारताचा नागरिक असावा.
* शैक्षणिक अर्हता :- कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 60% गुण आवश्यक) असावा. तथापि, उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल.
* अनुभव :- किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटिसशिप / आर्टीकलशिपसह 1 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.
* भाषा व संगणक ज्ञान :- मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.
* वयोमर्यादा:- उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान 21 वर्षे व कमाल
26 वर्षे असावे.
* अर्ज करावयाची पद्धत :- अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहीत केलेल्या ऑनलाईन अप्लिकेशन सिस्टीमद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.
* अर्जाकरिता आकारण्यात येणारे शुल्क :- रुपये 500/-
* फेलोंची संख्या :- सदर कार्यक्रमात फेलाँची संख्या 60 इतकी निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या 1/3 राहील. 1/3 महिला फैलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल.
* फेलोचा दर्जा :- शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.
Mukhymantri Fellowship योजनेचे स्वरूप
फेलोशिपचा कार्यकाळ फेलो म्हणून रुजू झाल्याच्या दिनांकापासून 12 महिने राहील. सर्व फेलोंसाठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील व त्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे फेलॉवर बंधन असेल.
निवड झालेल्या फेलोची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल. या प्राधिकरणांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, शासनाचे सचिव, महामंडळांचे कार्यकारी संचालक किंवा इतर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा समावेश असेल.
प्राधिकरणावरील नेमणुकीचा निर्णय अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत घेतला जाईल. फेलोंना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल. नेमणूक केलेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली, संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी फेलो काम करतील. यास फिल्ड वर्क असे संबोधले जाईल.
फिल्ड वर्क सोबतच आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन फेलोंवर असेल. प्रत्येक फेलोसाठी यापैकी एका शैक्षणिक संस्थेची निवड करण्याचे अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालयास असतील. फेलोंना शैक्षणिक संस्था निवडीचा अधिकार नसेल. फिल्ड वर्क व अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या फेलोंनाच फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र मिळेल.
Mukhymantri Fellowship योजनेची निवड प्रक्रिया
मित्रांनो, निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबविली जाईल. निवड प्रक्रियेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
टप्पा 1
भाग 1 ऑनलाईन परीक्षा
भाग 2 : सर्वाधिक गुणांच्या आधारे टप्पा 2 साठी 210 उमेदवार शॉर्टलीस्ट करण्यात येईल.
टप्पा 2
भाग 1 : शॉर्टलीस्ट केलेले उमेदवार निबंध अपलोड करतील
भाग 2 मुलाखत (शॉर्टलीस्ट केलेल्या व निबंध सादर केलेल्या उमेदवारांसाठी लागू)
भाग 3 अंतिम निवड केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करणे
ऑनलाईन परीक्षेचे स्वरुप :
बहुविविध पर्याय असलेले वस्तुनिष्ठ स्वरुपाचे प्रश्न
माध्यम
परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल व जेथे व्यवहार्य असेल तेथे प्रश्न व पर्यायी उत्तराचे मराठीत भाषांतर
पुरविले जाईल
एकूण गुण 100. प्रत्येक प्रश्नास 1 गुण
कालावधी : 60 मिनिटे
ऑनलाईन परीक्षेतील विषय: येथे क्लिक करून पहा
टप्पा 2 साठी उमेदवार शॉर्टलीस्ट करणे
एकूण गुण 100 पैकी राहतील
सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या 210 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल
शॉर्टलीस्ट केलेले उमेदवार 3 निबंध लिखित स्वरुपात सादर करतील. निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असू शकतात
निबंधाचे विषय उमेदवारांना इमेल व संकेतस्थळाद्वारे कळविले जातील
सर्व 3 निबंध सादर करणाऱ्या शॉर्टलीस्ट केलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलाविले जाईल.
सर्व 3 निबंध अपलोड न करणारे शॉर्टलीस्ट झालेले उमेदवार मुलाखतीस पात्र राहणार नाहीत
अंतिम निवड
उमेदवारांच्या अंतिम निवडीकरीता खालीलप्रमाणे गणांकन पद्धत वापरली जाईल.
ऑनलाईन चाचणीचे 100 पैकी गुण 15 पैकी गुणांमध्ये रुपांतरीत करुन निबंध 30 गुण + मुलाखत 50 गुण + पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक पदवी 5 गुण निवड झालेल्या 60 उमेदवारांची यादी व 15 उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल
निवड झालेल्या उमेदवारांनी विहित मुदतीत ऑफर लेटर स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे निर्माण
होणारी रिक्त पदे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांमधून भरण्यात येतील
मुख्यमंत्री फेलोशिप 2023 योजनेचे लाभ
फेलोंना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जा राहील.
फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरिता तात्पुरते ओळखपत्र व इमेल आयडी दिले
जाईल.
दरमहा रु. 70,000/- विद्यावेतन तसेच प्रवास व अनुषंगिक खर्चासाठी दरमहा ठोक रु.5,000/-
असे एकूण रु.75,000/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.
फेलोशिपच्या कार्यकाळात एकूण 10 दिवसांची रजा अनुज्ञेय राहील.
फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येईल.
आयआयटी मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष
अभ्यासक्रमाच्या पूर्ततेचे स्वतंत्र प्रमाणपत्र संबंधित संस्थेमार्फत देण्यात येईल.
12 महिन्यांचे फिल्डवर्क व आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविला जाणारा विशेष अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या फेलोंना शासनामार्फत फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम योजनेच्या अटी व शर्ती
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्ण वेळ कार्यक्रम असून फेलोशिपच्या कार्यकाळात फेलोना इतर नोकरी, खाजगी प्रॅक्टीस, असाईनमेंट किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम (आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांनी फेलोशिपसाठी तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रमाखेरीज) स्विकारता येणार नाही. या 12 महिन्यांच्या कार्यक्रमात एकदाच सहभागी होता येते व मुदतवाढीची किंवा पुनर्नियुक्तीची तरतूद नाही.
12 महिन्यांच्या कालावधीनंतर हा कार्यक्रम नोकरीची कोणतीही हमी देत नाही.
ज्या प्राधिकरणासोबत फेलो काम करेल त्या प्राधिकरणाच्या कामाच्या वेळा फेलोसही लागू राहतील.
फेलौना कामाच्या गरजेनुसार अधिक तास काम करणे किंवा प्रवास करणे आवश्यक राहील.
फेलांच्या मुलाखतीच्यावेळी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय तसेच ओळखपत्र आदी संदर्भातील
कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. फेलॉनी रुजू होताना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे
आहे. नियुक्तीनंतर फेलोंची पोलीस पडताळणी केली जाईल.
फेलोशिपच्या कालावधीत जेथे नेमणूक केलेली आहे त्या शहर व जिल्ह्यामध्ये फेलोस वास्तव्य
करावे लागेल.
फेलोंच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही.
नियुक्तीचे पत्र (ऑफर लेटर) मिळाल्यानंतर रुजू होण्याच्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर
राहण्याचे बंधन फेलॉवर असेल.
अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल.
फेलोशिपच्या कालावधीत फेलो कुठल्याही राजकीय चळवळीत भाग घेऊ शकणार नाही.
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेची अधिकृत वेबसाईट व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करून पहा